Trending News

No trending news found.

Wednesday, 13 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

भाजपने एका झटक्यात दिले ५ उमेदवार, पण राष्ट्रवादीला त्यांच्या वाट्याचा एक उमेदवार ठरवता येईना!!

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजप निकाल एका झटक्यात पाच उमेदवारांची नावे जाहीर केली. पण अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला फक्त एक जागा येणार आहे, पण त्या जागेवरच उमेदवार ठरवताना सुद्धा राष्ट्रवादीची दमछाक झाली आहे.

नाशिक : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजप निकाल एका झटक्यात पाच उमेदवारांची नावे जाहीर केली. पण अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला फक्त एक जागा येणार आहे, पण त्या जागेवरच उमेदवार ठरवताना सुद्धा राष्ट्रवादीची दमछाक झाली आहे.

– भाजपचे पाच उमेदवार जाहीर

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र भाजपने 30 30 इच्छुकांची भली मोठी यादी दिल्ली पार्लमेंटरी बोर्डाकडे पाठवून दिली होती. पण पार्लमेंटरी बोर्डाने ती यादी महाराष्ट्र भाजपला परत पाठवून यादी निम्मी करून पाठवा असे आदेश दिल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या. पण प्रत्यक्षात भाजपने काल रात्री उशिरा आज उमेदवारांची यादी जाहीर करून टाकली. यामध्ये प्रमोद जठार, विवेक कोल्हे, माधवी नाईक, संजय भेंडे आणि प्रज्ञा सातव यांचा समावेश केला.



– राष्ट्रवादीकडे एका जागेसाठी 75 इच्छुक

पण विधान परिषदेच्या एका जागेसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवारच ठरवता येईना. या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडे तब्बल 75 इच्छुक असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्वतःच दिली. त्यामुळे राष्ट्रवादीत विधान परिषदेच्या आमदारकीसाठी इतर पक्षांपेक्षा किती उतावळे आहेत हे त्यांनी स्वतःच कबूल करून टाकले.

– जय पवारांच्या नावाचे पुढे दामटले घोडे

याच दरम्यान अमोल मिटकरी यांनी जय पवारांच्या नावाचे घोडे पुढे दमटवले. जय पवारांचे नाव पुढे आले, तर इच्छुकांची संख्या झटक्यात कमी होईल, असा त्यांचा होरा होता, पण प्रत्यक्षात तो फसला. इच्छुकांची संख्या कमी झाली नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना अद्याप अंतिम निर्णय घेता आला नाही. राष्ट्रवादीतून आता भाजपचे माजी राज्यसभा खासदार संजय काकडे यांचे चिरंजीव विक्रम काकडे यांचे नाव पुढे आले आहे, पण त्या नावाला राष्ट्रवादीतल्या निष्ठावंत यांचा विरोध असल्याची बातमी सुद्धा मराठी माध्यमांनी दिली आहे. विक्रम काकडे यांची बालपणापासून पार्थ पवारांशी मैत्री आहे. त्यामुळेच त्या नावावर शिक्कामोर्तब होण्याचा मराठी माध्यमांचा होरा आहे. पण 75 इच्छुकांच्या गर्दीत सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादीच्या नेतृत्वाची मात्र निर्णय घेताना चांगलीच दमछाक झाली आहे.

The NCP could not even finalize a single candidate for its allotted share.

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment