विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उपस्थित असलेल्या वॉशिंग्टनमधील हिल्टन हॉटेलमधील एका कार्यक्रमात शनिवारी रात्री गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. ‘व्हाईट हाऊस कॉरस्पॉन्डंट्स डिनर’ सुरू असताना मोठे आवाज ऐकू आले, ज्यामुळे एकच खळबळ उडाली. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषद घेऊन सुरक्षा रक्षकांच्या तत्परतेचे कौतुक केले. पण तरीही या गोळीबाराच्या घटनेने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षा व्यवस्थेवरचे प्रश्नचिन्ह गडद झाले.
या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत भारताची भूमिका स्पष्ट केली असून ट्रम्प सुरक्षित असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
- पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया
या घटनेवर प्रतिक्रिया देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प आणि उपराष्ट्रपती हे वॉशिंग्टन डीसीमधील घटनेनंतर सुरक्षित आहेत, हे जाणून समाधान वाटले. मी त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देतो. लोकशाहीत हिंसेला कोणतेही स्थान नाही आणि अशा कृत्यांचा पूर्णपणे निषेध केला पाहिजे,” असे त्यांनी म्हटले.
#WATCH | Shots fired at White House Correspondents' Dinner in Washington, DC | When asked for a message that he wants to give to the world, US President Donald Trump says, "…We have the greatest security in history. If you have a whack job that's got a brain, but it's a little… pic.twitter.com/r2skohb4gl
— ANI (@ANI) April 26, 2026
- नेमकं काय घडलं?
शनिवारी रात्री वॉशिंग्टनच्या हिल्टन हॉटेलमध्ये रात्रीच्या भोजनाचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी अचानक मोठे आवाज झाले. सुरक्षेचा धोका ओळखून ‘सीक्रेट सर्व्हिस’च्या अधिकाऱ्यांनी तात्काळ डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया ट्रम्प यांना सुरक्षित ठिकाणी हलविले. अनेकजण टेबलांखाली लपले. सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत एका सशस्त्र संशयित हल्लेखोराला गोळ्या घालून ठार करण्यात आले असून दुसऱ्या एका संशयिताला ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे.
- ट्रम्प यांची पत्रकार परिषद
या हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषद घेऊन सुरक्षा दलांच्या तत्परतेचे कौतुक केले. ट्रम्प म्हणाले, “हा हल्ला अनपेक्षित होता, मात्र सीक्रेट सर्व्हिसने अतिशय वेगाने कारवाई केली. एका सशस्त्र व्यक्तीने सुरक्षा चौकीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण आमच्या शूर जवानांनी त्याला रोखले. या घटनेत एका सुरक्षा अधिकाऱ्याला जवळून गोळी लागली, मात्र बुलेटप्रूफ जॅकेटमुळे त्याचे प्राण वाचले.” ट्रम्प यांनी या घटनेचा व्हिडिओ सार्वजनिक करण्याचे आदेशही दिले आहेत. या घटनेमुळे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह अधिक गडद झाले आहे.
When asked for a message that he wants to give to the world, US President Donald Trump
महत्वाच्या बातम्या
- PM Netanyahu : इस्रायली पंतप्रधानांना प्रोस्टेट कॅन्सर झाला, गुपचूप उपचार केले; 2 महिने माहिती लपवली
- फडणवीस – ठाकरे भेटीची सोडली पुडी; पण संशय पेरणी दोघांपैकी कुणाविषयी??
- आप फुटली, काँग्रेस हसली, ठाकरे सेना रुसली!!
- Raghav Chadha : ‘आप’चे राज्यसभा खासदार राघव चड्ढा भाजपत; म्हणाले- 10 पैकी 7 खासदार सोबत


Post Your Comment