Trending News

No trending news found.

Thursday, 14 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
भारत माझा देश

आप फुटली, काँग्रेस हसली, ठाकरे सेना रुसली!!

नाशिक : आप फुटली, काँग्रेस हसली, ठाकरे सेना रुसली!!, हेच राजकीय वास्तव आज समोर आले. राघव चढ्ढा यांच्यासह आम आदमी पार्टीचे सात खासदार पक्षातून फुटले. ते भाजपमध्ये सामील झाले. त्यामुळे भाजपची राजकीय ताकद वाढली. आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी आदळआपट केली. पण या सगळ्यांमध्ये काँग्रेस हसली. त्यानंतर ठाकरे सेना रुसली. अण्णांची चिडचिड राघव चढ्ढा यांच्यासह आम आदमी पार्टीचे सात खासदार फुटल्यानंतर अण्णा हजारे यांनी सुद्धा चिडचिड केली. त्यांनी राजकारणातल्या नैतिकतेविषयी प्रश्न उपस्थित केले. पक्षांतराच्या विरोधातला कठोर कायदा मागितला. लोकांनीच आता चारित्र्यवान उमेदवारांना निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. आम आदमी पार्टीने राज्यसभेच्या अध्यक्षांकडे पत्र पाठवून कुटीर खासदारांची खासदारकी रद्द करायची मागणी […]

नाशिक : आप फुटली, काँग्रेस हसली, ठाकरे सेना रुसली!!, हेच राजकीय वास्तव आज समोर आले.

राघव चढ्ढा यांच्यासह आम आदमी पार्टीचे सात खासदार पक्षातून फुटले. ते भाजपमध्ये सामील झाले. त्यामुळे भाजपची राजकीय ताकद वाढली. आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी आदळआपट केली. पण या सगळ्यांमध्ये काँग्रेस हसली. त्यानंतर ठाकरे सेना रुसली.

अण्णांची चिडचिड

राघव चढ्ढा यांच्यासह आम आदमी पार्टीचे सात खासदार फुटल्यानंतर अण्णा हजारे यांनी सुद्धा चिडचिड केली. त्यांनी राजकारणातल्या नैतिकतेविषयी प्रश्न उपस्थित केले. पक्षांतराच्या विरोधातला कठोर कायदा मागितला. लोकांनीच आता चारित्र्यवान उमेदवारांना निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

आम आदमी पार्टीने राज्यसभेच्या अध्यक्षांकडे पत्र पाठवून कुटीर खासदारांची खासदारकी रद्द करायची मागणी केली.



काँग्रेस हसली

पण एवढे सगळे झाल्यानंतर सुद्धा काँग्रेस मात्र हसली. आम आदमी पार्टी फुटल्याचा राजकीय लाभ भाजपला झाला असला, तरी आनंद मात्र काँग्रेसला झाला. काँग्रेसच्या दिल्लीतल्या आणि पंजाब मधल्या नेत्यांनी आम आदमी पार्टीच्या नेत्यांनाच फुटीबद्दल दोष दिला. आम आदमी पार्टीकडे स्वतःचे कुठे नेते नव्हते ते बाहेरच्या पक्षांमधूनच त्यांनी आयात केले होते. आता ते फुटले, तर त्यामध्ये वाईट वाटण्यासारखे काय आहे असा खोचक सवाल संदीप दीक्षित यांनी केला. आम आदमी पार्टीचे आता फक्त सातच खासदार फुटले आहेत. पण पंजाब मधले पन्नास आमदार लवकरच फुटतील, असा टोमणा दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष राजेंद्र यादव यांनी हाणला.

ठाकरे सेना रुसली

पण आम आदमी पार्टी फुटल्याचा आनंद काँग्रेसला झाला असता तरी ठाकरे सिनेमा मात्र त्याचे दुःख झाले. आम आदमी पार्टी कुठली म्हणून ठाकरे सेना रुसली.

ठाकरे सेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपला बकासुराची उपमा दिली. बकासुराला जसे कितीही अन्न दिले तरी त्याचे पोट भरायचे नाही तसेच भाजपचे झाले आहे भाजपने कितीही अन्य पक्ष फोडले तरी त्यांचे समाधान होत नाही, असा टोमणा संजय राऊत यांनी मारला. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला नरक का म्हटले हे आता तुम्हाला समजले असेल अशी मखलाशी सुद्धा संजय राऊत यांनी केली.

संजय राऊत यांच्या या प्रतिक्रियेतील ठाकरे सेना रुसल्याचे दिसून आले. पण आम आदमी पार्टी फुटल्यानंतर ठाकरे सेनेच्याच मित्र पक्षाला म्हणजे काँग्रेसला आनंद झाला या बाबीकडे संजय राऊत यांचे दुर्लक्ष झाले किंवा त्यांचे त्याकडे कुणी लक्ष वेधले नाही.

Raghav Chadha, along with 2/3 AAP Rajya Sabha MPs joining BJP, Congress leader Sandeep Dikshit

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment