Trending News

No trending news found.

Thursday, 14 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
भारत माझा देश

ममता बॅनर्जींनी कितीही जोर लावू द्या, आम्ही बंगालमध्ये बाबरी मशीद बांधू देणार नाही; अमित शाहांचा इशारा

पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात बाबरी मशिदीच्या मुद्द्यावर तापली. ममता बॅनर्जींनी कितीही जोर लावला, तरी आम्ही बंगालमध्ये त्यांना बाबरी मशिद बांधू देणार नाही

विशेष प्रतिनिधी

कोलकाता : पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक शेवटच्या टप्प्यात बाबरी मशिदीच्या मुद्द्यावर तापली. ममता बॅनर्जींनी कितीही जोर लावला, तरी आम्ही बंगालमध्ये त्यांना बाबरी मशिद बांधू देणार नाही, असा स्पष्ट इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगालमधल्या निवडणुकीत भाजपच्या प्रचारादरम्यान दिला. Amit Shah

– हुमायून कबीरचा बाबरी पक्ष

पश्चिम बंगाल मध्ये बाबरी मशीद बांधण्याच्या मुद्द्यावर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूळ काँग्रेसचे आमदार हुमायून कबीर यांनी त्यांची साथ सोडून स्वतंत्र पक्ष काढला. त्यांच्या पक्षाने 80 पेक्षा जास्त उमेदवार उभे केले. त्यांच्या पक्षाने सुरुवातीला असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्षाशी युती केली. पण लवकरच हुमायून कबीर आणि असदुद्दीन ओवेसी यांच्या फाटले त्यामुळे दोघांची युती तुटली. तरीसुद्धा हुमायून कबीर यांनी त्यांचा बाबरी मशीद बांधायचा इरादा सोडला नाही. त्यांनी आपल्या पक्षाच्या प्रचारात तो मुद्दा लावून धरला.



ममता बॅनर्जींचा “डाव”

ममता बॅनर्जी यांनीच हुमायून कबीर यांना पक्षातून बाहेर काढले. त्यांना मुस्लिमांची मते एकागठ्ठा मिळावीत, अशी “व्यवस्था” केली. मुस्लिमांची मते जर तृणमूळ काँग्रेसला मिळणार नसतील, तर ती काँग्रेसकडे किंवा कम्युनिस्टांकडे जाऊ नयेत यासाठीच हुमायुन कबीर यांना वेगळे काढले‌. पण निवडणुकीनंतर ममता बॅनर्जी आणि हुमायून कबीर हे दोन्ही नेते पुन्हा एकत्र येतील, अशी राजकीय मांडणी अनेकांनी केली. त्याचवेळी काहीजणांनी हुमायून कबीर यांच्या पक्षाला भाजपची “बी टीम” म्हटले.

– अमित शाहांचा इशारा

या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी बंगाल मधल्या बाबरी मशिदीचा मुद्दा अखेरच्या टप्प्यात तापविला. ममता बॅनर्जी यांनी कितीही जोर लावला, तरी त्यांना आम्ही पश्चिम बंगाल मध्ये बाबरी मशीद बांधू देणार नाही, असा इशारा दिला.

Amit Shah challenges mamata banerjee

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment