Trending News

No trending news found.

Thursday, 14 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

Sunetra pawar : बारामतीत सुनेत्रा पवारांच्या मताधिक्याची उत्सुकता, अजित पवार यांचा विक्रम मोडणार!

बारामती विधानसभा मतदारसंघ हा १९६७ पासून पवार कुटुंबीयांचा बालेकिल्ला राहिला आहे. आता होणाऱ्या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमोर प्रभावी विरोधक नसल्याने त्या किती मताधिक्याने विजयी होणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात वाढली आहे. विशेष म्हणजे, या मतदारसंघातील सर्वाधिक मताधिक्याचा विक्रम दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावावर असून, २०१९ मध्ये त्यांनी १ लाख ६५ हजार २६५ मतांनी विजय मिळवला होता. हा विक्रम सुनेत्रा पवार मोडतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विशेष प्रतिनिधी

पुणे : Sunetra pawar बारामती विधानसभा मतदारसंघ हा १९६७ पासून पवार कुटुंबीयांचा बालेकिल्ला राहिला आहे. आता होणाऱ्या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमोर प्रभावी विरोधक नसल्याने त्या किती मताधिक्याने विजयी होणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात वाढली आहे. विशेष म्हणजे, या मतदारसंघातील सर्वाधिक मताधिक्याचा विक्रम दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावावर असून, २०१९ मध्ये त्यांनी १ लाख ६५ हजार २६५ मतांनी विजय मिळवला होता. हा विक्रम सुनेत्रा पवार मोडतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.Sunetra pawar

काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी उमेदवारी मागे घेतल्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या विरोधात कोणत्याही प्रमुख राष्ट्रीय किंवा राज्यस्तरीय पक्षाचा उमेदवार उरलेला नाही. सध्या नोंदणीकृत पक्षांकडून आर. वाय. घुटुकडे आणि सतीश कदम हे दोन उमेदवार रिंगणात आहेत, तर उर्वरित २१ उमेदवार अपक्ष आहेत. यामध्ये करुणा मुंडे, अभिजित बिचुकले यांसारख्या काही चर्चेत असलेल्या नावांचा समावेश आहे; मात्र बहुतांश उमेदवार बारामतीबाहेरील असल्याने लढत एकतर्फी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.Sunetra pawar



या मतदारसंघाचा इतिहास पाहता, शरद पवार यांनी १९६७ मध्ये प्रथमच येथून विजय मिळवला आणि सलग सहा वेळा प्रतिनिधित्व केले. त्यानंतर १९९१ मध्ये नेतृत्व अजित पवार यांच्याकडे देण्यात आले. त्यांनी पहिल्याच निवडणुकीत ८६ हजार मतांनी विजय मिळवला आणि पुढील आठ निवडणुकांमध्ये सातत्याने मतदारांचा कौल मिळवला. तीन निवडणुकांमध्ये त्यांनी एक लाखांहून अधिक मताधिक्याने विजय मिळवण्याची कामगिरी केली.

२००९ मध्ये अजित पवार यांनी पहिल्यांदा एक लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने विजय मिळवला होता. २०१४ मध्ये त्यांचे मताधिक्य काहीसे घटले, तरी त्यांनी भाजपचे बाळासाहेब गावडे यांचा पराभव केला. मात्र, २०१९ मध्ये त्यांनी विक्रमी १ लाख ६५ हजार २६५ मतांनी विजय मिळवत नवा उच्चांक प्रस्थापित केला. २०२४ च्या निवडणुकीतही त्यांनी एक लाखांहून अधिक मताधिक्याने विजय कायम ठेवला.

या पार्श्वभूमीवर, आता उपमुख्यमंत्री Sunetra Pawar यांना किती मताधिक्य मिळेल आणि त्या अजित पवार यांच्या विक्रमाला मागे टाकतील का, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

Sunetra pawar’s margin in baramati sparks buzz, will she break ajit pawar’s record?

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment