Trending News

No trending news found.

Thursday, 14 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

CM Fadnavis : भाडेतत्त्वावर परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाडेतत्त्वावर परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबईमध्ये नोकरी, व्यवसाय निमित्ताने बाहेरून मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. त्यांच्याकरिता मोठ्या प्रमाणावर घरांची आवश्यकता असल्याने भाडेतत्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा उभारून कार्यान्वित करावी, असे निर्देश फडणवीस यांनी दिले आहेत. तसेच यासाठी एक पोर्टल विकसित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : CM Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाडेतत्त्वावर परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबईमध्ये नोकरी, व्यवसाय निमित्ताने बाहेरून मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. त्यांच्याकरिता मोठ्या प्रमाणावर घरांची आवश्यकता असल्याने भाडेतत्वावरील परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा उभारून कार्यान्वित करावी, असे निर्देश फडणवीस यांनी दिले आहेत. तसेच यासाठी एक पोर्टल विकसित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.CM Fadnavis

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबईसह अन्य महानगरांमध्ये नोकरी, व्यवसायानिमित्त आलेल्या नागरिकांसाठी परवडणाऱ्या दरात भाडेतत्वावरील घरे असली पाहिजेत. मागणीनुसार पुरवठा या तत्त्वावर भाडेतत्वाने घरे उपलब्ध होतील, याची काळजी घेण्यात यावी. घरांसाठी मागण्यांसंदर्भातील करारानुसार सर्व कार्यवाही होईल. याबाबत यंत्रणेने दक्षता घेतली पाहिजे. उपलब्ध असलेल्या भाडेतत्वावरील घरांबाबत यंत्रणेने समन्वयाने कार्यवाही केल्यास मालक व भाडेकरू या दोघांनाही अडचण येणार नाही, असे फडणवीस यांनी सांगितले.CM Fadnavis



तसेच पुढे बोलताना महाराष्ट्र भाडे नियंत्रण अधिनियम 1999 अंमलबजावणीच्या सक्षमीकरण व सुलभी करणाबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले, या कायद्याअंतर्गत सक्षम प्राधिकारी म्हणून पोलीस उपायुक्त यांना नियुक्त करावे. पोलिस स्टेशन अथवा पोलिसांचे परिक्षेत्र वाढल्यास त्यानुसार आपोआप सक्षम अधिकारी वाढतील, अशी व्यवस्था करावी. पोलिस उपायुक्तांच्या कामकाज यादीमध्ये सक्षम प्राधिकारी म्हणून काम पाहण्याच्या कामकाजाचा समावेश करण्यासाठी अधिसूचना काढण्याची कार्यवाही करावी. भाडेदर संदर्भातील न्यायालयीन प्रकरणे निकाली काढण्यासाठी 100 विशेष न्यायालये स्थापन करावी. यासाठी सेवानिवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती करावी, असे निर्देशही फडणवीस यांनी दिले.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, न्यायालयाच्या परवानगीने भाडेदर संदर्भातील प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी सायंकाळचे न्यायालय सुरू करावे, या न्यायालयांसाठी जागा नसल्यास भाडेतत्त्वावर जागा घेण्यात याव्यात. यामुळे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली प्रकरणे निकाली निघतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.

दारम्यान, या बैठकीला गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, पोलिस आयुक्त देवेन भारती, गृह विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार सिंग, राधिका रस्तोगी, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव दिलीप घुमरे म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल उपस्थित होते.

Mumbai Rental Reform: CM Fadnavis Orders New Portal & 100 Special Courts

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment