Trending News

No trending news found.

Thursday, 14 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

CM Fadnavis : CM देवेंद्र फडणवीसांची भूमिका- CDR मिळवण्याचा अधिकार कोणालाही नाही; दमानियांकडे तो कसा गेला याची चौकशी होईल

अशोक खरातला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॉल केले होते तसेच अनेक नेत्यांनी खरातला कॉल केल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिली होती. या संदर्भातील सीडीआर देखील त्यांनी समोर आणल्याचा दावा केला होता. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : CM Fadnavis अशोक खरातला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॉल केले होते तसेच अनेक नेत्यांनी खरातला कॉल केल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिली होती. या संदर्भातील सीडीआर देखील त्यांनी समोर आणल्याचा दावा केला होता. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.CM Fadnavis

देवेंद्र फडणवीस म्हणाले, पहिली गोष्ट तर अशी आहे अशा प्रकारचा सीडीआर प्राप्त करून घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. तो फक्त जी काही तपास यंत्रणा आहेत, तपास करत आहेत, त्यांना तो अधिकार आहे. त्यामुळे अशा पद्धतीचा हा सीडीआर कशा पद्धतीने लीक झाला, तो कोणी लीक केला, या संदर्भातली चौकशी राज्य सरकार करेल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.CM Fadnavis



पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला असे वाटते की अशा प्रकारच्या सेन्सिटिव्ह केसमध्ये शेवटी केवळ आरोप प्रत्यारोप करून चालत नाही. ज्यांच्याविरोधात सबळ पुरावा असेल, त्यांच्या विरुद्ध कारवाई होईल. कोण कोणाशी बोलले, कोणी कोणाशी काय केले याच्या आधारावर आपली क्रिमिनल जस्टीस सिस्टम चालत नाही. अशोक खरातने केलेल्या जी काहीह घानेरडी कामे आहेत, यात जर कोणी सामील असेल तर कोणालाही आम्ही सोडणार नाही.

सगळी पाळं मुळं खोदल्याशिवाय आम्ही राहणार नाही

देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशोक खरात प्रकरणातला संपूर्ण तपास आम्ही करणार आहोत. त्याने जे वेगवेगळे खाते उघडले आहेत, तेही आमच्या लक्षात आले आहे. त्याने जे ट्रान्सॅक्शन केले आहेत, तेही आमच्या लक्षात आले आहे. आणि आता लोकांचा कॉन्फिडन्स वाढल्याने ते स्वतः समोर येऊन माहिती देत आहेत. एसआयटीकडे भरपूर माहिती जमा झाली आहे. त्यामुळे सगळी पाळं मुळं खोदल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत, असे फडणवीस यांनी आश्वासन दिले आहे.

एसआयटीवर सगळ्यांनी विश्वास ठेवावा

एसआयटीचा तपास मंदावला आहे का? असा प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, मला असे वाटते की 12 गुन्हे दाखल झाली आहेत. रोज नवीन माहिती समोर येत आहे. आता एसआयटी काय तपास करत आहे हे रोज सांगता येत नाही. एसआयटी योग्यवेळी त्या संदर्भातली माहिती सांगेल. मला असे वाटते की एसआयटीवर सगळ्यांनी विश्वास ठेवावा, ती योग्यप्रकारे काम करत आहे.

खरातची ईडी चौकशी होणार का?

अशोक खरातची ईडी चौकशी होणार का? असा प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, निश्चितपणे याची ईडी चौकशी होणार. ईडीने कारवाई सुरू केली आहे. एकदा जमीन त्या ठिकाणी निश्चित झाली की नियमानुसार योग्य कारवाई केली जाणार आहे.

नाशिक कुंभमेळ्यासाठी 35 हजार कोटी

दरम्यान, अखिल भारतीय संत संमेलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी सिंहस्थ कुंभमेळा अत्यंत भव्य-दिव्य स्वरूपात साजरा करण्याची घोषणा केली असून, त्यासाठी तब्बल 35 हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचा आराखडा सादर केला आहे. प्रभू श्रीराम यांची भूमी असलेल्या नाशिक आणि त्र्यंबकेश्वर नगरीत सर्व संत-महंतांचे स्वागत करताना मुख्यमंत्र्यांनी सनातन संस्कृतीच्या जतनावर विशेष भर दिला, ज्यामुळे या धार्मिक उत्सवाच्या माध्यमातून सांस्कृतिक वारसा अधिक सक्षमपणे जोपासण्याचा राज्य सरकारचा संकल्प अधोरेखित झाला आहे.

यंदाचा कुंभ भव्य -दिव्य करण्याचा प्रयत्न

देवेंद्र फडणवीस म्हणाले, सनातन संस्कृतीने सर्व टिकून ठेवले. कित्येक आक्रमणांच्या नंतर ती आजही टिकून आहे. आपली महाराष्ट्राची वारकरी संप्रदाय परंपरा आहे. औरंगजेबाने किती अडचणी आणल्या तरी आपली वारी परंपरा सुरू आहे. संतांच्या विचारांनी फक्त स्नान नाही तर आपले मन देखील शुद्ध होते. यासाठी कुंभमेळा महत्त्वाचा पर्व आहे. सर्व संत महंत यांनी आम्हाला आपलेसे केले आहे. त्यामुळे यंदाचा कुंभ भव्य -दिव्य करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

साधुग्रामसाठी शेतकऱ्यांकडून जमीन थेट खरेदी करण्याचा निर्णय

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी रस्ते, रेल्वे आणि विमानतळ सुविधा वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. गोदावरी नदी स्वच्छ ठेवण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येणार असून त्र्यंबकेश्वर येथे वर्षभर पाणी वाहत राहील यासाठीही काम सुरू आहे. तसेच आतापर्यंत साधुग्रामसाठी शेतकऱ्यांकडून भाडे तत्वावर जमीन घेतली जात होती. मात्र आता ती जमीन थेट खरेदी करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

“No One Has Right to CDR”: CM Fadnavis Orders Probe into Anjali Damania’s Leak

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment