Trending News

No trending news found.

Thursday, 14 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

महा-साधना सप्ताह 2026 : भविष्याभिमुख सुशासनासाठी सक्षम प्रशासनिक तंत्र; 8.8 लाखांहून अधिक सरकारी कर्मचारी सहभागी

महा-साधना सप्ताह 2026 हा मिशन कर्मयोगी अंतर्गत आयोजित देशातील सर्वात मोठ्या टेक-लर्निंग आठवड्यापैकी एक असून, शिक्षण, आत्मचिंतन व दैनंदिन शासकीय कामकाजात ज्ञानाच्या प्रभावी वापरावर भर देतो.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महा-साधना सप्ताह 2026 हा मिशन कर्मयोगी अंतर्गत आयोजित देशातील सर्वात मोठ्या टेक-लर्निंग आठवड्यापैकी एक असून, शिक्षण, आत्मचिंतन व दैनंदिन शासकीय कामकाजात ज्ञानाच्या प्रभावी वापरावर भर देतो.

2 ते 8 एप्रिल दरम्यान, या उपक्रमात 32 विभागांमधील 8.8 लाखांहून अधिक सरकारी कर्मचारी सहभागी होणार असून, 50 निवडक अभ्यासक्रमांच्या माध्यमातून iGOT द्वारे प्रत्येकी 4 तासांचे मिळून सर्वांना सरासरी 35.2 लाख तास शिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे.



थीमॅटिक बेबिनार

या उपक्रमाच्या माध्यमातून शासकीय कर्मचाऱ्यांना अभ्यासक्रम, थीमॅटिक वेबिनार आणि इतर शिक्षणात्मक उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत असून, त्यामुळे कार्यक्षम, प्रतिसादक्षम आणि भविष्यासाठी सज्ज अशा नागरी सेवाव्यवस्थेच्या उभारणीत योगदान दिले जात आहे.

आधुनिक काळात प्रशासनासमोर निर्माण होणाऱ्या विविध तंत्रज्ञानात्मक आव्हानांना सामोरे जाण्याची मानसिकता त्याचबरोबर समस्यांचा सोडवणुकीच्या दृष्टीने विचार करण्याची क्षमता विकसित करण्यासाठी या प्रशिक्षणाची गरज आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणूनच सरकारने महा-साधना उपक्रम असल्याचे ट्विट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Maha-Sadhana Week 2026

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment