Trending News

No trending news found.

Thursday, 14 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेला दिलासा; ई-केवायसीसाठी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ, आदिती तटकरे यांची माहिती

राज्यातील महिलांसाठी महत्त्वाच्या ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात राज्य सरकारने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ई-केवायसी प्रक्रियेसाठीची अंतिम मुदत वाढवण्याची घोषणा केली. यापूर्वी 31 मार्चपर्यंत असलेली ही मुदत आता 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांना आवश्यक कागदपत्रे दुरुस्त करण्यासाठी अधिक वेळ मिळणार आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Ladki Bahin राज्यातील महिलांसाठी महत्त्वाच्या ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात राज्य सरकारने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ई-केवायसी प्रक्रियेसाठीची अंतिम मुदत वाढवण्याची घोषणा केली. यापूर्वी 31 मार्चपर्यंत असलेली ही मुदत आता 30 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांना आवश्यक कागदपत्रे दुरुस्त करण्यासाठी अधिक वेळ मिळणार आहे.Ladki Bahin

सरकारचा उद्देश – एकही महिला वंचित राहू नये

या निर्णयामागे राज्य सरकारची स्पष्ट भूमिका असल्याचे तटकरे यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांच्या मार्गदर्शनानुसार ही मुदतवाढ देण्यात आली आहे. तांत्रिक अडचणींमुळे कोणतीही पात्र महिला योजनेपासून वंचित राहू नये, हा यामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.Ladki Bahin



योजनेचा लाभ आणि पार्श्वभूमी

जुलै 2024 पासून सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा ₹1500 आर्थिक मदत दिली जाते. या योजनेमुळे राज्यातील अनेक महिलांना आर्थिक आधार मिळाला असून त्यांच्या सक्षमीकरणाला चालना मिळाली आहे. मात्र, ई-केवायसी प्रक्रियेत काही त्रुटी राहिल्याने अनेक महिलांना अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे ही मुदतवाढ “शेवटची संधी” असल्याचेही तटकरे यांनी नमूद केले.

अशोक खरात प्रकरणावर सडेतोड प्रतिक्रिया

दरम्यान, भोंदू अशोक खरात प्रकरणावरून सुरू असलेल्या टीकेलाही तटकरे यांनी स्पष्ट उत्तर दिले. या प्रकरणावर होत असलेली टीका दुर्दैवी असल्याचे सांगत, घटना उघडकीस आल्यानंतर तत्काळ प्रतिक्रिया देणाऱ्यांमध्ये आपण अग्रस्थानी होतो, असे त्यांनी म्हटले.

SIT तपास आणि सरकारची भूमिका ठाम

या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष तपास पथक (SIT) स्थापन केले असून त्याचे नेतृत्व अनुभवी महिला पोलिस अधिकाऱ्याकडे देण्यात आले आहे. पीडित महिलांना न्याय मिळवून देणे हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.

तसेच, दोषींवर कठोर कारवाई होणारच, असा विश्वास व्यक्त करत तपासात कोणतीही ढिलाई होणार नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. महिलांवरील अन्यायाविरुद्ध सरकारची भूमिका कणखर असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

Relief for Ladki Bahin Beneficiaries: e-KYC Deadline Extended to April 30

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment