Trending News

No trending news found.

Thursday, 14 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

विलीनीकरणानंतर सुनेत्रा पवारांनाच नेता निवडा, असे शरद पवारांचे कोणीही नेते म्हटले नाहीत; सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट

दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचा धोशा लावणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांनी कधीच विलीनीकरणानंतर सुनेत्रा पवारांना नेता निवडा असे म्हटले नव्हते

विशेष प्रतिनिधी

मुंबई : दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचा धोशा लावणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांनी कधीच विलीनीकरणानंतर सुनेत्रा पवारांना नेता निवडा असे म्हटले नव्हते, असा गौप्यस्फोट अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी करून शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांवर निशाणा साधला. Sunil Tatkare

अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर घडलेल्या सगळ्या राजकारणावर सुनील तटकरे यांनी सविस्तर भाष्य केले. शरद पवारांचा राष्ट्रवादी कडून फक्त सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनाच का टार्गेट केले जाते??, याचा स्पष्ट खुलासा तटकरे यांनी केला.

दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणानंतर अखंड राष्ट्रवादी काँग्रेस मधले राजकीय चित्र बदलले असते. त्याचवेळी आम्ही सावधानतेने एकत्र राजकारण करून सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री पदावर निवडले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर निवडले, पण दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणानंतर सुनेत्रा पवारांना नेतृत्वपदी निवडा असे समोरच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांनी कधीही म्हटले नव्हते, असा गौप्यस्फोट सुनील तटकरे यांनी केला. दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेस मधले सगळे राजकीय चित्र बदलले असते, याकडे तटकरे यांनी लक्ष वेधले.

सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांविरुद्ध पेड कॅम्पेन सुरू आहे. कारण समोरच्यांना राजकारण करण्यात अपयश आले. राष्ट्रवादीच्या घटनेवरून सुद्धा घाणेरडे राजकारण सुरू आहे, असा आरोप सुनील तटकरे यांनी केला.

Sunil Tatkare’s Revelation

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment