Trending News

No trending news found.

Thursday, 14 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

पल्स 2026 : महाराष्ट्राच्या आरोग्य क्षेत्रातील नव्या परिवर्तनाचा राजमार्ग; आरोग्य सेवेतील गुणवत्तेवर भर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बीकेसी, मुंबई येथे 'पल्स – प्लॅटफॉर्म फॉर युनिफाइड लर्निंग, स्किल्स, हेल्थ अँड एज्युकेशन' चे उदघाटन केले.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बीकेसी, मुंबई येथे ‘पल्स – प्लॅटफॉर्म फॉर युनिफाइड लर्निंग, स्किल्स, हेल्थ अँड एज्युकेशन’ चे उदघाटन केले. Devendra Fadnavis

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘पल्स’ या परिषदेमुळे महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्थेच्या पुढील दशकाची दिशा निश्चित होणार आहे. आरोग्य सेवा आणि वैद्यकीय शिक्षणामध्ये गुणवत्ता, सातत्य आणि परवडणारी सेवा यांचा प्रभावी समावेश करण्यावर या माध्यमातून भर देण्यात येत आहे. या परिषदेत सहभागी झालेल्या तज्ज्ञांच्या माध्यमातून केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर देश आणि जागतिक स्तरावर आरोग्य क्षेत्रात नवे परिवर्तन घडेल. आरोग्य क्षेत्रातील बदल आता पर्याय नसून काळाची गरज बनली असल्याचे यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.



राज्यातील प्रत्येक नागरिकाला त्यांच्या घरापासून 5 ते 8 किलोमीटर पर्यंतच्या परिसरात परवडणारी आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे. राज्यात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वापर करून क्षयरोग नियंत्रण, मातृ-शिशू आरोग्य आणि प्राथमिक आरोग्य सेवा अधिक प्रभावी करण्याचे काम सुरू असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

कर्करोग उपचारासाठी ‘महाकेअर (MahaCare)’ या तीन स्तरांच्या मॉडेलची अंमलबजावणी करण्यात येत असून जिल्हास्तरावर निदान, प्रादेशिक स्तरावर उपचार आणि उच्चस्तरीय केंद्रांमध्ये प्रगत उपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. टेलिमेडिसिन आणि ई-संजीवनी सारख्या प्लॅटफॉर्मद्वारे ग्रामीण भागातही दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचत आहे. नागपूर येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ स्थापन करण्याचा प्रस्ताव असून सार्वजनिक आरोग्य, संशोधन आणि धोरणात्मक नियोजनासाठी हे केंद्र महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

महाराष्ट्राकडे वैद्यकीय वेलनेस पर्यटन क्षेत्रात जागतिक केंद्र बनण्याची क्षमता असून ‘विकसित महाराष्ट्र 2047’ च्या दृष्टीने आरोग्य क्षेत्र हे सामाजिक जबाबदारीसोबतच गुंतवणूक, नवनिर्मिती आणि आर्थिक विकासाचे महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे. महाराष्ट्र आरोग्य क्षेत्रात भविष्याची वाट पाहणार नाही, तर ते भविष्य स्वतः घडवत नवे आदर्श निर्माण करेल, असा विश्वास याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

यावेळी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री मंगलप्रभात लोढा, राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Inauguration of ‘PULSE – Platform for Unified Learning, Skills, Health and Education’ at the hands of CM Devendra Fadnavis.

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment