Trending News

No trending news found.

Wednesday, 17 June
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
भारत माझा देश

PM Modi : मोदींच्या अध्यक्षतेखाली सीसीएसची महत्त्वाची बैठक; संकटकाळात सरकार सतर्क; साठेबाजी, काळाबाजार होऊ न देण्याचे पंतप्रधानांचे निर्देश

पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी उच्चस्तरीय बैठक घेऊन देशातील कच्चे तेल, गॅस, पेट्रोलियम उत्पादने, वीज व खतांच्या स्थितीचा आढावा घेतला. युद्धाच्या आडून जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी किंवा काळाबाजार होता कामा नये, असे निर्देश पंतप्रधानांनी दिले. घबराटीची स्थिती निर्माण होऊ नये यासाठी त्यांनी केंद्र व राज्यांमध्ये उत्तम समन्वयावर भर दिला.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : PM Modi  पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी उच्चस्तरीय बैठक घेऊन देशातील कच्चे तेल, गॅस, पेट्रोलियम उत्पादने, वीज व खतांच्या स्थितीचा आढावा घेतला. युद्धाच्या आडून जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी किंवा काळाबाजार होता कामा नये, असे निर्देश पंतप्रधानांनी दिले. घबराटीची स्थिती निर्माण होऊ नये यासाठी त्यांनी केंद्र व राज्यांमध्ये उत्तम समन्वयावर भर दिला.PM Modi

बैठकीत अल्पकालीन व दीर्घकालीन परिणामांचे मूल्यांकन केले. तसेतच सावरण्यासाठी तत्काळ व दूरगामी उपायांवर चर्चा झाली. वीज प्रकल्पांत पुरेसा कोळसा उपलब्ध अाहे. पंतप्रधानांनी मंत्री आणि सचिवांचा गट तयार करून ‘संपूर्ण सरकार’ या दृष्टिकोनातून काम करण्याचे निर्देश दिले. बैठकीला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, कृषिमंत्री शिवराज सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, आरोग्यमंत्री जेपी नड्डा आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर उपस्थित होते.PM Modi



पुरवठा साखळीचे पर्याय

होर्मुझ मार्गातील अडथळे पाहता कच्चे तेल आणि खरीप हंगामासाठी खतांचे पर्यायी स्रोत शोधण्यावर चर्चा झाली. सरकारने केमिकल, फार्मा आणि पेट्रोकेमिकल क्षेत्रासाठी आयातीचे नवे पर्याय आणि भारतीय उत्पादनांसाठी नवीन बाजारपेठा विकसित करण्यावर भर दिला.

PM Modi Chairs High-Level CCS Meeting; Orders Crackdown on Hoarding Amid War

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment