Trending News

No trending news found.

Friday, 15 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

Rupali Chakankar : महिला म्हणून मला सॉफ्ट टार्गेट केले गेले; खरातला मी गुरू मानले होते, दुसरी बाजू माहीत नव्हती; रूपाली चाकणकरांची पहिली प्रतिक्रिया

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की एक महिला म्हणून मला सॉफ्ट टार्गेट केले जात आहे. मी व माझ्या कुटुंबाने खरातला गुरु मानले होते. परंतु, त्यांची दुसरी बाजू आम्हाला माहीत नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Rupali Chakankar भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की एक महिला म्हणून मला सॉफ्ट टार्गेट केले जात आहे. मी व माझ्या कुटुंबाने खरातला गुरु मानले होते. परंतु, त्यांची दुसरी बाजू आम्हाला माहीत नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.Rupali Chakankar

रुपाली चाकणकर म्हणाल्या, शिवनिका संस्थान या संस्थानात जे महादेव मंदिराचे ट्रस्ट आहे, मी प्रदेशाध्यक्ष होते तेव्हापासून सदस्य म्हणून काम केले आहे. माझ्यासमवेत समाजातील अनेक प्रतिष्ठित नागरिक, अनेक मान्यवर ट्रस्टवर होते. त्यानंतर मी आयोगाची अध्यक्षा झाले. आणि मला हे सांगायचे आहे की या ट्रस्टचा कार्यकाल हा 8 ऑगस्ट 2025 रोजी संपलेला आहे.Rupali Chakankar



 

खरात पती-पत्नीला आमच्या कुटुंबाने गुरु मानले होते

पुढे बोलताना रुपाली चाकणकर म्हणाल्या, समाजात आपण आयुष्य जगत असताना कोणाला तरी गुरु मानत असतो. खरात पती-पत्नीला आमच्या कुटुंबाने गुरु मानले होते. काही वेळा तिथे होत असलेला कार्यक्रम, मग तो महाशिवरात्रीचा असेल, गुरुपौर्णिमेचा असेल, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्याचे वाटप असेल, या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित राहत होतो. यात एखाद्या व्यक्तीला आपण गुरु मानले आहे आणि त्या निमित्ताने आम्ही संपूर्ण कुटुंब तिथे उपस्थित राहत होतो.

पोलिसांनी खोलवर निष्पक्ष तपास करावा

माध्यमांमधून सातत्याने दाखवले जाणारे फोटो किंवा व्हिडिओ हे काही वर्षांपूर्वीचे आहेत. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अनेकांनी पाद्यपूजा केली, तशी मी माझ्या पतीने देखील केली होती. 5-6 वर्षांपूर्वी ज्यावेळेस आपण ज्या लोकांच्या संपर्कात असतो, ते 5-6 वर्षानंतर एखाद्याचे आयुष्य, कृत्य, वागणूक याबाबत आपल्याला कल्पना नसते. आज आपण ज्यांच्यासोबत असतो, ते पुढे जाऊन कसे वागणार आहेत, ही कल्पना आपल्या कोणाला नसते. त्यामुळे मी ही घटना समजली तेव्हा मला धक्का बसला. त्यामुळे मी सुरुवातीला ट्विट देखील केले होते की या ट्रस्टसोबत आमचे संबंध आहे. पण खरात आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही माहीत असायचे कारण नव्हते. यात पोलिसांनी खोलवर निष्पक्ष तपास करावा. त्यासाठी आज मी पोलिस महासंचालकांची भेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. या घटनेचा तपास पारदर्शकपणे व्हावा, अशी मागणी केल्याची माहिती रुपाली चाकणकर यांनी केली.

आरोपीला कठोर कारवाई करावी

रुपाली चाकणकर म्हणाल्या, आपण काही लोकांवर विश्वास ठेवतो, एक आध्यात्मिक श्रद्धा असते. माझे संपूर्ण कुटुंब हे वारकरी कुटुंब आहे, त्यामुळे आमची जी श्रद्धा होती ती आध्यात्मिक दृष्टीने होती आणि त्यामुळेच आम्ही त्या देवस्थानशी जोडले गेलो होतो. पण याची दुसरी जी बाजू आहे, ती कधी आमच्यासमोर आली नाही. आम्ही कार्यक्रमांसाठी काही काळासाठीच तिथे असायचो. त्यामुळे जे काही घडले आहे, ते अत्यंत चुकीचे आणि घाणेरडे कृत्य आहे. पोलिसांनी सखोल तपास करावा आणि आरोपीला कठोर कारवाई करावी, अशी मागणी चाकणकर यांनी केली.

चुकीच्या बातम्या चालवल्या त्याचा निषेध

पुढे बोलताना रुपाली चाकणकर म्हणाल्या, एका दैनिकाचे पत्रकार आहेत, त्यांनी त्यांच्या वर्तमानपत्रात एक बातमी दिली होती 19.03.2025 रोजी. ही बातमी आमच्या समुपदेशकांकडे आली. त्यानंतर समुपदेशकाने त्यांना एक पत्र पाठवले होते 8 तारखेला. त्या पत्रात स्पष्ट दिले आहे की, आपल्या बातमीमध्ये काही मोघम गोष्टी आल्या आहेत. या संदर्भात तुमच्याकडे काही माहिती असेल तर सविस्तर आयोगाला कळवावी. दुसरे पत्र आहे पोलिस आधीक्षकांना, त्यांच्याकडे जी काही माहिती असेल त्यानुसार कारवाई करावी. तसेच आम्ही कोणाला काही अडचण असेल तर थेट पोलिसांकडे जाऊन तक्रार करावी. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी आम्हाला सांगितले की कोणतीही तक्रार आली नाही, कोणत्याही महिलेची तक्रार नाही. त्यानंतर त्या पत्रकाराने पत्र पाठवले की आमच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत. मागील दोन दिवसांपासून ज्या बातम्या चालवल्या, त्याचा मी तीव्र निषेध करते.

आलेल्या तक्रारींवर कारवाईच्या सूचना

रुपाली चाकणकर म्हणाल्या, दुसरी गोष्ट मला दाखवायची आहे म्हणजे माझ्याकडे 5 तारखेला एका मुलीचा मेल आला. या मेलमध्ये त्या मुलीने खरातच्या ऑफिसमध्ये पूर्वी काम करणाऱ्या एका माणसाच्या संदर्भात तक्रार होती. खरातचा यात कुठेही उल्लेख नाही. तातडीने त्याच दिवशी आमचे पत्र पोलिसांना गेले आहे. मी स्वतः हे पत्र पाठवले. यात जे कोणी असेल त्याचा तपास करावा, अशी सूचना आम्ही दिली. त्यानंतर पोलिसांनी स्वतः पत्र दिले की आम्ही कारवाई करत आहोत. कोणालाही, कुठल्याही संस्थेला पाठीशी घातले नाही. तोपर्यंत खरातचे कुठेही नाव नव्हते. त्यानंतर 17 तारखेला तेजस्वी सातपुते यांचे पत्र आले आणि त्यांनी सांगितले की आम्ही कारवाई करत आहोत.

पत्रकार परिषद घेऊन चुकीच्या बातम्या पसरवणाऱ्यांना कायदेशीर नोटीस पाठवणार

चुकीच्या बातम्या सुरू आहेत. त्या व्यक्तीसोबत अनेकांचे फोटो आहेत. पण केवळ महिला म्हणून सॉफ्ट टार्गेट केले जात आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. काही लोकांनी पत्रकार परिषद घेत चुकीच्या बातम्या पसरवल्या, असे म्हणत रुपाली चाकणकर यांनी सुषमा अंधारे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. माझे फोटो चुकीच्या तारखेला दाखवण्यात आले आहेत. माझ्या सोशल मीडियावर अजूनही ते फोटो आहेत, तुम्ही पाहू शकता. कायद्याच्या चौकटीतून आम्ही या लोकांना नोटीस पाठवू, खोट्या बातम्या पसरवणे या विरोधात आम्ही कायदेशीर कारवाई करू, असा इशारा चाकणकर यांनी दिला आहे.

“I Was Made a Soft Target”: Rupali Chakankar on Resigning Over Ashok Kharat Case VIDEOS

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment