Trending News

No trending news found.

Wednesday, 17 June
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
भारत माझा देश

5 राज्यांमध्ये एप्रिल महिन्यात निवडणुकीचा धडाका, मतदान आणि मतमोजणीच्या तारखा जाहीर!!

केंद्रीय निवडणूक आयोगाने बहुप्रतिक्षित अशा पाच राज्यांमध्ये आज रविवार दिनांक 15 मार्च रोजी विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने बहुप्रतिक्षित अशा पाच राज्यांमध्ये आज रविवार दिनांक 15 मार्च रोजी विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळम्, पुदुचेरी आणि आसाम या पाच राज्यांमध्ये एप्रिल महिन्यात विधानसभा निवडणुकांचा धडाका होणार असून लोकसभा निवडणुकीपूर्वीची उपांत्य फेरी म्हणून या निवडणुकीकडे बघितले जात आहे. Election Commission

आसाम मध्ये 9 एप्रिल रोजी मतदान होणार असून, तामिळनाडू मध्ये 23 एप्रिल पश्चिम बंगालमध्ये 23 एप्रिल आणि 29 एप्रिल तर केरळ आणि पुदुचेरीमध्ये 9 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. एकट्या पश्चिम बंगाल मध्ये दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. सर्वच्या सर्व म्हणजे पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल 4 मे 2026 या दिवशी लागणार आहेत.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासह अन्य निवडणूक आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. या निवडणुकांपूर्वी सर्व राज्यांमध्ये निवडणूक आयोगाने मतदार याद्यांचे पुन:निरीक्षण करून त्यातली अनावश्यक नावे काढून टाकली त्यामुळे साधारणपणे एक ते दीड कोटी मतदारांची नावे मतदार यादी मधून हटली. पश्चिम बंगाल मध्ये तृणमूळ काँग्रेस, तामिळनाडूमध्ये द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षांनी निवडणूक आयोगाच्या मतदार यादी निरीक्षणाच्या मुद्द्यावर तीव्र आक्षेप घेतला होता पण सुप्रीम कोर्टाने हा आक्षेप हाणून पाडला. त्यामुळे सुधारित मतदार यादी यांच्या आधारावरच विधानसभा निवडणूक होणार आहे.

– तीन राज्यांमध्ये आव्हानात्मक निवडणूक

पश्चिम बंगाल मध्ये तृणमूळ काँग्रेस, केरळममध्ये कम्युनिस्ट पार्टी, तामिळनाडू द्रविड मुन्नेत्र कळघम असे तीन मजबूत विरोधी पक्ष सत्तेवर असल्याने या तिन्ही राज्यांमध्ये केंद्रातल्या सत्ताधारी भाजप समोर प्रचंड मोठे आव्हान असेल. अर्थात या तिन्ही राज्यांमध्ये भाजपची स्थिती एक संघर्षशील पक्ष अशीच असून भाजपला त्या राज्यांमध्ये फारसे यश कधी मिळालेले नाही पण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नियोजनाखाली भाजपने तिथे प्रचंड यंत्रणा राबवून वातावरण निर्मिती करायचा प्रयत्न चालविला आहे. त्यामुळे या तिन्ही राज्यांमध्ये 2026 मध्ये खऱ्या अर्थाने मोठी आव्हानात्मक निवडणूक होणे अपेक्षित आहे.

आसाम मध्ये भाजप सत्तेवर आहे तर पुदुचेरीमध्ये भाजप आणि मित्र पक्ष यांची सत्ता आहे त्यामुळे त्या राज्यांमध्ये भाजप आणि मित्र पक्षांपुढे सत्ता टिकविण्याचे आव्हान आहे.

Election Commission of India announces dates for Assembly elections in 5 states/UTs.

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment