वृत्तसंस्था
नवी दिल्ली : LPG Refill केंद्र सरकारने घरगुती एलपीजी सिलेंडरच्या रिफिल बुकिंगच्या नियमांमध्ये बदल केला आहे. आता ग्राहक एक सिलेंडर बुक केल्यानंतर दुसरा सिलेंडर 21 दिवसांऐवजी 25 दिवसांनंतरच बुक करू शकतील. म्हणजेच, सरकारने रिफिल बुकिंगचा किमान प्रतीक्षा कालावधी 4 दिवसांनी वाढवला आहे.LPG Refill
मध्य पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर सरकारने गॅसची साठेबाजी रोखण्यासाठी आणि सर्व ग्राहकांना समान पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. सरकारी सूत्रांनी वृत्तसंस्था पीटीआय (PTI) ला ही माहिती दिली आहे.LPG Refill
सरकारी सूत्रांनुसार, गेल्या काही काळापासून असे दिसून येत होते की, गरज नसतानाही लोक सिलेंडर बुक करून साठा करत होते. प्रतीक्षा कालावधी 25 दिवस केल्याने अनावश्यक बुकिंगला आळा बसेल. यामुळे ज्यांना खरोखर गरज आहे, त्यांना सहजपणे सिलेंडर मिळू शकेल.LPG Refill
पेट्रोल-डिझेलच्या किमती सध्या स्थिर राहतील
सरकारी सूत्रांनुसार, पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये सध्या वाढ होण्याची शक्यता नाही. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, जोपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत 130 डॉलर प्रति बॅरलच्या पुढे जात नाही, तोपर्यंत देशांतर्गत बाजारात किमती स्थिर राहतील. सध्याच्या अंदाजानुसार, कच्चे तेल 100 डॉलर प्रति बॅरलच्या आसपास राहण्याची अपेक्षा आहे.
देशात इंधनाची कोणतीही कमतरता नाही
इंधनाच्या पुरवठ्याबाबत सरकारने स्पष्ट केले आहे की, देशातील कोणत्याही पेट्रोल पंपावर तेलाची टंचाई नाही. पुरवठा साखळी पूर्णपणे सामान्य आहे. भविष्यातील कोणत्याही संभाव्य संकटाचा सामना करण्यासाठी भारताने ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ व्यतिरिक्त इतर मार्गांनी कच्च्या तेलाची खरेदी (सोर्सिंग) वाढवली आहे. यामुळे सागरी मार्गात कोणत्याही तणावाच्या स्थितीत पुरवठ्यात अडथळा येणार नाही.
एव्हिएशन टर्बाइन इंधनाचाही पुरेसा साठा
विमानांमध्ये वापरल्या जाणाऱ्या एव्हिएशन टर्बाइन फ्युएल म्हणजेच ATF बाबतही सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, देशाकडे ATF चा पुरेसा साठा आहे आणि घाबरण्याची गरज नाही. भारत केवळ ATF चा उत्पादक नाही, तर तो निर्यातही करतो. त्यामुळे विमान सेवांवर कोणताही परिणाम होणार नाही.
इतर देश भारताकडून सल्ला मागत आहेत
ऊर्जा व्यवस्थापनाच्या बाबतीत भारत जगातील अनेक देशांपेक्षा चांगल्या स्थितीत दिसत आहे. सरकारी सूत्रांनी सांगितले की, बदलत्या जागतिक परिस्थितीत भारताची तयारी पाहून अनेक देशांनी नवी दिल्लीशी संपर्क साधला आहे. त्यांना भारताचे स्टॉक व्यवस्थापन आणि पुरवठा साखळीची रणनीती समजून घ्यायची आहे.
LPG Refill Gap Increased to 25 Days to Prevent Panic Hoarding VIDEOS
महत्वाच्या बातम्या
- Avinash Jadhav : संजय शिरसाट यांच्या सामाजिक न्याय विभागात घोटाळा; मनसेच्या अविनाश जाधवांचा आरोप
- ‘‘पीएमपीएमएल’’ कर्मचाऱ्यांसाठी ‘‘गुड न्यूज’’; सातव्या वेतन आयोगातील थकीत रक्कम मिळणार लवकरच!!
- गोपीनाथ मुंडेंचा मतदारसंघ रेणापूरच्या पंचायत समितीत भाजपच्या मदतीने मनसेच्या सभापती!!
- Iran Claims : इराणचा दावा- ट्रम्प यांना युद्धासाठी भडकवण्यात आले; परराष्ट्र मंत्री अराघचींचा आरोप



Post Your Comment