Trending News

No trending news found.

Sunday, 8 March
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

Iran war effect : पुण्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा स्थगित; सरकारचे घरगुती गॅस पुरवठ्याला प्राधान्य

इराण विरोधात अमेरिका आणि इजरायलने सुरू केलेल्या आखाती युद्धामुळे व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असून, पुण्यात व्यावसायिक सिलेंडरचे वाटप थांबवण्यात आले आहे

विशेष प्रतिनिधी

पुणे : इराण विरोधात अमेरिका आणि इजरायलने सुरू केलेल्या आखाती युद्धामुळे व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर परिणाम झाला असून, पुण्यात व्यावसायिक सिलेंडरचे वाटप थांबवण्यात आले आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या वाटपाला सध्या प्राधान्य दिले जाणार आहे. वितरकांना शुक्रवारी सकाळपासून व्यावसायिक सिलेंडरच्या नवीन ऑर्डर न घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

एचपीसीएल (HPCL) आणि बीपीसीएल (BPCL) या प्रमुख गॅस वितरण कंपन्यांनी त्यांच्या वितरकांना चाकण आणि शिरूर येथील प्लांटमधून या सूचना दिल्या आहेत. ५, १९, ३५, ४७ आणि ४२७ किलो वजनाच्या व्यावसायिक सिलेंडरच्या ऑर्डर सध्या थांबविण्यात आल्या आहेत. पुढील सूचना मिळेपर्यंत वितरकांनी व्यावसायिक गॅससाठी वाहने पाठवू नयेत, असेही सांगण्यात आले आहे.



सिलेंडर वाटप काही दिवसांसाठी थांबवण्याचा निर्णय

या निर्णयामुळे हॉटेल आणि उद्योग क्षेत्रावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. आखाती युद्धामुळे गॅस वितरणावर परिणाम झाला असून, गॅसचा पुरवठा मर्यादित झाला आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या वाटपात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी व्यावसायिक सिलेंडरचे वाटप काही दिवसांसाठी थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कंपनीत गेलेले ट्रक गॅस न भरताच परत

याबाबत गॅस वितरण वितरक जीवन अल्हाट यांनी माहिती दिली की, औद्योगिक वापराचे व्यावसायिक सिलेंडर कंपनी भरणार नाही, केवळ घरगुती सिलेंडर भरले जातील असे त्यांना सांगण्यात आले आहे. सिलेंडर भरण्यासाठी चाकण येथील गॅस कंपनीत गेलेले ट्रक गॅस न भरताच परत पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे सध्या शिल्लक असलेल्या साठ्यानंतर व्यावसायिक गॅस वाटपास अडचण निर्माण होईल. औद्योगिक वापराच्या सिलेंडर वाटपावर बंदी आल्याने आगामी काळात त्याचा परिणाम सर्वसामान्यांनाही जाणवेल, असे अल्हाट यांनी नमूद केले.

Iran war effect  Supply of commercial gas cylinders suspended in New Delhi;

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment