Trending News

No trending news found.

Friday, 15 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

Maharashtra Cabinet : महाराष्ट्रात धर्मांतरविरोधी विधेयकाला मंजुरी; मंत्रिमंडळाच्या निर्णयाचे नितेश राणे यांच्याकडून स्वागत

आज महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने धर्मांतर विरोधी विधेयकाला मंजुरी देऊन एक अत्यंत महत्त्वपूर्ण कायदेशीर पाऊल उचलले असून, भाजप आमदार व मंत्री नितेश राणे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. विधानभवनाबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी या निर्णयाचे स्वागत करताना म्हटले की, हा राज्यासाठी ऐतिहासिक दिवस आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Maharashtra Cabinet  आज महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने धर्मांतर विरोधी विधेयकाला मंजुरी देऊन एक अत्यंत महत्त्वपूर्ण कायदेशीर पाऊल उचलले असून, भाजप आमदार व मंत्री नितेश राणे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. विधानभवनाबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी या निर्णयाचे स्वागत करताना म्हटले की, हा राज्यासाठी ऐतिहासिक दिवस आहे.Maharashtra Cabinet

नितेश राणे म्हणाले, आमच्या देवा भाऊंच्या महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा आणि विविध संघटनांचा संघर्ष आता फळाला आला आहे. हा नवीन कायदा केवळ मध्य प्रदेश आणि गुजरातसारख्या राज्यांमधील कायद्यांसारखाच नाही तर काही बाबतीत अधिक कठोर आणि प्रभावी आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीनंतर महाराष्ट्रात धर्मांतराला जबरदस्ती करण्याचा किंवा प्रवृत्त करण्याचा कोणताही प्रयत्न हा अजामीनपात्र गुन्हा मानला जाईल. जबाबदार असलेल्यांना ताबडतोब अटक केली जाईल, असे राणे म्हणाले.Maharashtra Cabinet



नितेश राणे यांनी विधेयकातील तरतुदींवर स्पष्ट करताना म्हटले की, ख्रिश्चन मिशनरी आणि इतर गटांवर आर्थिक मदत, आरोग्यसेवा किंवा शिक्षणाच्या नावाखाली सामूहिक धर्मांतराचे आरोप अनेकदा केले जातात. या कायद्यामुळे आता अशा कारवायांना आळा बसेल. कायदा ‘घर वापसी’साठी विशेष तरतुदी आणि मार्ग देखील प्रदान करतो. जेणेकरून स्वेच्छेने त्यांच्या मूळ हिंदू धर्मात परतणाऱ्यांना पूर्ण सरकारी पाठिंबा आणि संरक्षण मिळू शकेल.

हा कायदा आपल्या माता-भगिनींच्या फसवणुकी आणि धर्मांतरापासून संरक्षण करेल, असे नितेश राणे म्हणाले. ते म्हणाले, आता महाराष्ट्रात कोणीही धर्मांतर करण्याचे धाडस करणार नाही. घटनात्मक वैधतेच्या प्रश्नाबाबत त्यांनी स्पष्ट केले की मंत्रिमंडळाने यावर सखोल चर्चा केली आहे आणि हा कायदा पूर्णपणे घटनात्मक चौकटीत आहे, ज्याला सर्वोच्च न्यायालयाचाही पाठिंबा आहे, अशी माहिती राणे यांनी दिली.

याच पत्रकार परिषदेत बोलताना नितेश राणे यांनी विमानतळांसारख्या संवेदनशील ठिकाणी खुल्या नमाज पठणाची परवानगी नाकारणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे जोरदार स्वागत केले. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगत त्यांनी स्पष्ट केले की, नमाज पठणासाठी सार्वजनिक जागांऐवजी मशिदींचाच वापर व्हायला हवा. तसेच, जर सार्वजनिक ठिकाणी नमाज पठण करायचे असेल, तर मशिदींचा वापर शाळा किंवा सामाजिक संस्थांसाठी करण्यात यावा, असेही त्यांनी यावेळी सुचवले.

Maharashtra Cabinet Approves Anti-Conversion Bill; 7-Year Jail for Forced Conversion VIDEOS

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment