Trending News

No trending news found.

Thursday, 16 October
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
Uncategorized

राहुल गांधी एवढे frustrate झालेत, की paid सल्लागारांचा सल्ला देखील विसरलेत, म्हणून मोदींना शिव्या देऊन राहिलेत!!

कुठल्याच निवडणुकीमध्ये कुठलेच यश मिळत नाही म्हणून राहुल गांधी आता एवढे frustrate झालेत, की paid सल्लागारांचा सल्ला देखील ते विसरलेत, म्हणून मोदींना शिव्या देऊन राहिलेत!!‌ बिहार मधल्या मतदार अधिकार यात्रेतून दिसलेल्या चित्राचा खरा अर्थ आहे.

नाशिक : कुठल्याच निवडणुकीमध्ये कुठलेच यश मिळत नाही म्हणून राहुल गांधी आता एवढे frustrate झालेत, की paid सल्लागारांचा सल्ला देखील ते विसरलेत, म्हणून मोदींना शिव्या देऊन राहिलेत!!‌ बिहार मधल्या मतदार अधिकार यात्रेतून दिसलेल्या चित्राचा खरा अर्थ आहे.Due to frustration Rahul Gandhi and his associates abusing Modi

राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांनी बिहारमध्ये काढलेल्या मतदार अधिकार यात्रेत दोघांच्याही स्टेजवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि त्यांच्या आईला शिव्या दिल्या गेल्या. त्या दोघांनी ऐकून घेतल्या त्यानंतर संपूर्ण देशभराच्या राजकीय वर्तुळात त्यावरून गरमागरम चर्चा सुरू झाली भाजपच्या नेत्यांनी एकवटून राहुल गांधी आणि काँग्रेसचा तीव्र निषेध केला. पण काँग्रेसच्या नेत्यांनी आणि बाकीच्या विरोधकांनी राहुल गांधींचे समर्थन केले. या सगळ्यात राहुल गांधींचे समर्थन करणारे नेत्यांचे काही जाणार नाही पण काँग्रेसचे नुकसान होईल असेच भाकीत वर्तविण्याची स्थिती उत्पन्न झाली आहे.



– Paid सल्लागारांचा सल्ला

वास्तविक काँग्रेसने नेमलेल्या paid सल्लागारांनी काँग्रेसच्या नेत्यांना विशेषत: राहुल गांधींना एक महत्त्वपूर्ण सल्ला दिला होता. तुम्ही भाजपवर जोरदार टीका करा मोदी सरकारच्या धोरणावर टीका करून त्याचे वाभाडे काढा पण पंतप्रधान नरेंद्र मोदींना वैयक्तिक पातळीवर बिलकुल शिव्या देऊ नका. किंवा त्यांच्याविषयी कुठलीही नकारात्मक बाब बोलू नका. कारण त्यामुळे मोदींचे प्रतिमा वर्धन होते आणि त्याचवेळी काँग्रेसची हानी होते हे संशोधनातून लक्षात आले आहे, असे काँग्रेसने नेमलेले सल्लागार म्हणाले होते.

या सल्लागारांमध्ये प्रशांत किशोर यांचा अग्रक्रमाने सहभाग होता. तुम्ही मोदींना जेवढ्या शिव्या द्याल, तेवढी मोदींची प्रतिमा उजळते हा अनुभव त्यांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना कथन केला होता. त्यावेळी सोनिया गांधी तिथे उपस्थित होत्या, याची आठवण प्रशांत किशोर यांनी सांगितली होती.

– राहुल गांधींचे frustration

प्रशांत किशोर आणि अन्य Paid सल्लागारांनी हा सल्ला दिल्यानंतर राहुल गांधी बरेच दिवस गप्प राहिले होते. त्यांनी मोदींच्या विरोधात वैयक्तिक कुठलाही हल्लाबोल केला नव्हता. त्याचा फायदा काही प्रमाणात लोकसभा निवडणुकीत होईल, अशी खूणगाठ त्यांनी बांधली होती. त्यानुसार काँग्रेसच्या लोकसभेतल्या जागा 54 वरून 99 वर गेल्या, पण राहुल गांधींना अपेक्षित असा राजकीय लाभ झाला नाही. त्यानंतर भाजप अल्पमतात आला तरी मोदी सरकार अतिशय सुरळीत चालू राहिले. ऑपरेशन सिंदूर देखील व्यवस्थित पार पडले. मोदी सरकार केंद्रातून हलण्याची कुठलीही चिन्हे तयार झाली नाहीत त्यामुळे राहुल गांधींना frustration आले. तिथून काँग्रेसची पुन्हा घसरण सुरू झाली. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान पाळलेले “राजकीय पथ्य” बिहार मध्ये पूर्णपणे विसरले गेले. मोदींना वैयक्तिक पातळीवर शिव्या सुरू झाल्या पण त्या फक्त मोदींपर्यंत थांबल्या नाहीत. मोदींच्या आईला देखील शिव्या द्यायला सुरुवात झाली. पण आता या सगळ्याचा परिणाम काय होईल आणि कुणावर होईल??, हे सांगण्यासाठी कुठल्या ज्योतिषाला विचारायची गरज आहे की त्याला व्हिडिओ शेअर करायची गरज आहे??

Due to frustration Rahul Gandhi and his associates abusing Modi

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment