Trending News

No trending news found.

Friday, 15 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

महाराष्ट्रातला सस्पेन्स कायम ठेवत भाजपची राज्यसभेच्या 9 उमेदवारांची यादी जाहीर; राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांचा समावेश

भाजपने आज सहा राज्यांमधल्या राज्यसभेच्या 9 उमेदवारांची यादी जाहीर केली, पण महाराष्ट्रातल्या 6 उमेदवारांच्या नावाबद्दल मात्र सस्पेन्स कायम ठेवला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची बिहार मधून राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर केली.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : भाजपने आज सहा राज्यांमधल्या राज्यसभेच्या 9 उमेदवारांची यादी जाहीर केली, पण महाराष्ट्रातल्या 6 उमेदवारांच्या नावाबद्दल मात्र सस्पेन्स कायम ठेवला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची बिहार मधून राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर केली.

राज्यसभेसाठी एकूण 37 जागांची निवडणूक होत असून पाच मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करायची मुदत आहे त्यामुळे त्याच्या आत मध्येच म्हणजे उद्या सायंकाळपर्यंत भाजप सह सर्व पक्षांची यादी येणे अपेक्षित आहे. त्यानुसार भाजपने आज 6 राज्यांमधल्या 9 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या नावाचाही समावेश केला. त्यामुळे भाजपचे पुढच्या पिढीतले नेतृत्व आता राज्यसभेत दिसणार आहे.



– पवारांची उमेदवारी लटकली

पण एकीकडे भाजपने असे आपले पुढच्या पिढीतले नेतृत्व राज्यसभेत पाठवायचा निर्णय घेतला असताना दुसरीकडे शरद पवारांची उमेदवारी मात्र महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या खुंटीला लटकून पडली आहे. संजय राऊत यांच्या मार्फत शरद पवारांनी राज्यसभेसाठी इच्छा जाहीर केली असली, तरी संजय राऊतांच्याच पक्षातून त्यांच्या उमेदवारीला शिवसेनेच्या दोन तरुण आमदारांनी खोडा घातलाय. त्यामुळे शरद पवारांची उमेदवारी महाविकास आघाडीच्या खुंटीला लटकून पडली आहे.

– भाजपचा महाराष्ट्रातल्या नावांवर सस्पेन्स

भाजपने सुद्धा महाराष्ट्रातल्या राज्यसभेच्या उमेदवारांच्या नावावर सस्पेन्स कायम ठेवला असून त्यामध्ये मराठी माध्यमांनी चर्चेत आणलेली नावे यादीत ठेवणार की वेगळेच सरप्राईज एलिमेंट त्यात आणणार याविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

भाजपच्या 9 उमेदवारांच्या यादीत नितीन नवीन, शिवेश कुमार तेराश गोवाल, जगन मोहन, लक्ष्मी वर्मा, संजय भाटिया, मनमोहन सामल, सुजित कुमार आणि राहुल सिन्हा यांचा समावेश आहे.

BJP announces list of 9 Rajya Sabha candidates, maintaining suspense in Maharashtra; National President Nitin Naveen included

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment