Trending News

No trending news found.

Friday, 15 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

Dada Bhuse : अर्थसंकल्पीय अधिवेशन : दादा भुसे म्हणाले- मराठवाडा, विदर्भातील 255 मराठी शाळा बंद, राज्यात 65 हजार शाळांत अजूनही सीसीटीव्ही नाही

राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस मंत्रालयातील भ्रष्टाचाराच्या चिखलाने माखला. कथित लाचखोरीच्या प्रकरणावरून महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारला धारेवर धरले. “मंत्रालय चालते हप्त्याने, फाइल हलते पैशाने’’ अशा जळजळीत घोषणा देत विरोधकांनी मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या राजीनाम्यासाठी संपूर्ण परिसर दणाणून सोडला.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Dada Bhuse  राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस मंत्रालयातील भ्रष्टाचाराच्या चिखलाने माखला. कथित लाचखोरीच्या प्रकरणावरून महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारला धारेवर धरले. “मंत्रालय चालते हप्त्याने, फाइल हलते पैशाने’’ अशा जळजळीत घोषणा देत विरोधकांनी मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या राजीनाम्यासाठी संपूर्ण परिसर दणाणून सोडला.Dada Bhuse

काँग्रेसचे विजय वडेट्टीवार, सतेज पाटील आणि राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदारांनी आक्रमक पवित्रा घेत असे मंत्री पदावर राहता कामा नये, असे म्हणत घोषणाबाजी केली.Dada Bhuse



आश्वासन : शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा भार कमी करू

शिक्षकांना जनगणना, आपत्ती व्यवस्थापन, स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि लोकसभा निवडणुका आदी विविध अशैक्षणिक कामे दिली जातात. मात्र शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा भार कमी करण्याचा सरकारचा विचार आहे. परीक्षांच्या काळात शिक्षकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून काम देण्यात येणार नाही, असेही भोयर यांनी स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत अजूनही गांभीर्य नाही

दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये होणारे गैरप्रकार थांबवण्यासाठी परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही असणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र, मोठ्या संख्येने शाळांमध्ये अद्याप कॅमेरे नसल्याने “कॉपीमुक्त परीक्षा’ केवळ कागदावरच राहते की काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. सरकारी शाळांच्या तुलनेत खासगी अनुदानित शाळांनी सीसीटीव्ही बसवण्याबाबत अधिक तत्परता दाखवली आहे. त्यामुळे बदलापूरच्या घटनेनंतरही विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत अजूनही गांभीर्य दिसून येत नाही.

शिक्षकांना श्वान मोजणीचे काम दिलेले नाही : भोयर

राज्यातील शाळांमधील शिक्षकांना श्वान मोजणीचे काम देण्यात आलेले नाही, असे स्पष्टीकरण राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधान परिषदेत दिले. प्रश्नोत्तराच्या तासात राकाँपा (अजित पवार गट)चे आमदार विक्रम काळे यांनी शिक्षकांना श्वान मोजणीचे काम देण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. शिक्षकांवर आधीच अशैक्षणिक कामांचा मोठा बोजा असल्याचे सांगत आता सरकारने शिक्षकांना श्वान मोजणीचे काम दिल्याचा आरोप त्यांनी केला. या वेळी भोयर म्हणाले की, शिक्षकांना शाळा परिसरात श्वानांना रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे काम देण्यात आले आहे. श्वान मोजणीचे नाही.

राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षांमधील गैरप्रकार (कॉपी) रोखण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा परिसरात सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र राज्यातील तब्बल ६५,७०९ शाळांमध्ये अजूनही सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले नसल्याची माहिती शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधान परिषदेत दिली. विशेष म्हणजे यामध्ये राज्य सरकारच्या ४७ हजार शाळांचा समावेश आहे.

विधान परिषद सदस्य सुधाकर अडवाले, जयंत आसगावकर, सतेज पाटील आणि भाई जगताप आदींनी राज्यातील शाळांमधील सुरक्षा आणि कॉपीमुक्त अभियानाबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्र्यांनी ही आकडेवारी सादर केली.

Budget Session Dada Bhuse Marathi Schools Closed CCTV Footage

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment