Trending News

No trending news found.

Friday, 15 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

महाराष्ट्रात 4537 अंगीकृत रुग्णालयांमध्ये 2399 रोग आणि विकारांवर मोफत उपचार; मुख्यमंत्र्यांकडून ऑनलाईन शुभारंभ

केंद्रातल्या मोदी सरकारने आणि महाराष्ट्रातल्या फडणवीस सरकारने सार्वजनिक आरोग्य प्रणालीवर विशेष लक्ष केंद्रित केले असून प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना यांचा विस्तार केला आहे. अनेक खर्चिक आणि दुर्मिळ आजारांवर या दोन्ही योजनांद्वारे सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार होतात.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : केंद्रातल्या मोदी सरकारने आणि महाराष्ट्रातल्या फडणवीस सरकारने सार्वजनिक आरोग्य प्रणालीवर विशेष लक्ष केंद्रित केले असून प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना यांचा विस्तार केला आहे. अनेक खर्चिक आणि दुर्मिळ आजारांवर या दोन्ही योजनांद्वारे सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार होतात.



या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान भवन, मुंबई येथे आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत राज्यातील 4537 अंगीकृत रुग्णालयांमध्ये 2399 रोग आणि विकारांवर मोफत उपचारांचा शुभारंभ (ऑनलाईन) केला. यावेळी मुख्यमंत्री यांच्या हस्ते TMS 2.0 या अद्ययावत संगणक प्रणालीचे लोकार्पण करण्यात आले. या प्रणालीमुळे रुग्ण नोंदणीपासून उपचार मंजुरीपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया सहज आणि सोपी होणार आहे. याचा लाभ महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य रुग्णांना होणार आहे.

या कार्यक्रमाला मंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, राज्यमंत्री योगेश कदम आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Free treatment for 2399 diseases and disorders in 4537 affiliated hospitals in Maharashtra; Online launch by Chief Minister

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment