Trending News

No trending news found.

Friday, 15 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

Rohit Pawar : पायलटच्या मदतीनेच अजित पवारांचा घातपात; रोहित पवारांचा थेट आरोप, अवाजवी इंधनामुळे स्फोट; अपघातावर नवे प्रश्न

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी बारामतीजवळ झालेल्या विमान दुर्घटनेत निधन झाले. मुंबईहून सभेसाठी निघालेल्या त्यांच्या विमानाने बारामती विमानतळाजवळ येताना अचानक एका बाजूला झुकत खाली कोसळल्याची माहिती समोर आली होती. विमान जमिनीवर आदळल्यानंतर मोठा स्फोट झाला आणि त्यानंतर आगीने भीषण रूप घेतले. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह त्यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव, पायलट सुमीत कपूर, शांभवी पाठक आणि विमान परिचारिका पिंकी माळी यांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण राज्याला मोठा धक्का बसला होता.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Rohit Pawar राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी बारामतीजवळ झालेल्या विमान दुर्घटनेत निधन झाले. मुंबईहून सभेसाठी निघालेल्या त्यांच्या विमानाने बारामती विमानतळाजवळ येताना अचानक एका बाजूला झुकत खाली कोसळल्याची माहिती समोर आली होती. विमान जमिनीवर आदळल्यानंतर मोठा स्फोट झाला आणि त्यानंतर आगीने भीषण रूप घेतले. या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह त्यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव, पायलट सुमीत कपूर, शांभवी पाठक आणि विमान परिचारिका पिंकी माळी यांचा मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण राज्याला मोठा धक्का बसला होता.Rohit Pawar

मात्र ही केवळ दुर्घटना नसून यामागे घातपात असू शकतो, अशी शंका राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी या प्रकरणी अनेक मुद्दे उपस्थित केले असून मुंबई आणि दिल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली होती. आज मुंबईतील वाय बी चव्हाण सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पुन्हा एकदा हा अपघात नसून नियोजित कट असल्याचा दावा केला. पायलटच्या मदतीनेच हा घातपात घडवण्यात आला असावा, असा गंभीर आरोप त्यांनी केला.Rohit Pawar



रोहित पवार यांनी सांगितले की, अपघाताच्या ठिकाणाची पाहणी केल्यावर काही बाबी संशयास्पद वाटतात. एखादा चेंडू मऊ मातीत पडला तर कमी उसळी घेतो, पण कठीण रस्त्यावर पडला तर जास्त उड्या घेतो, असे उदाहरण देत त्यांनी सांगितले की विमान धावपट्टीवर न पडता बाजूच्या कठीण पृष्ठभागावर आदळले. त्यामुळे त्याचा धक्का अधिक तीव्र झाला. स्फोटाचे मुख्य कारण विमानातील जादा इंधन असू शकते, अशी शंका त्यांनी व्यक्त केली.

त्यांच्या मते, या विमानातील इंधन टाक्या नेहमीपेक्षा जास्त भरलेल्या होत्या. सामान्यतः अशा विमानांमध्ये प्रसाधनगृहाजवळ इंधन टाक्या असतात आणि त्याच्या जवळच उड्डाण नोंद यंत्र असते, अशी माहिती त्यांनी दिली. मुंबईहून बारामतीकडे जाताना इंधन पूर्ण क्षमतेने भरले गेले होते. मात्र बारामतीला पोहोचल्यानंतर विमान पुढे जाणार होते, तर तेथेच पूर्ण इंधन भरण्याची गरज काय होती, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

रोहित पवार यांनी पुढे सांगितले की, जर महाराष्ट्रात इंधन स्वस्त आहे म्हणून ते भरले असेल, तर गुजरातमध्ये त्याहून स्वस्त इंधन उपलब्ध होते, असा युक्तिवादही त्यांनी मांडला. त्यामुळे एवढ्या अल्प अंतराच्या प्रवासासाठी टाक्या पूर्ण भरण्याचा निर्णय का घेतला गेला, हे तपासले पाहिजे, असे त्यांनी म्हटले. जादा इंधन असल्यास स्फोटाची तीव्रता वाढते, ही शंका आता खरी ठरत असल्याचे ते म्हणाले.

तपासातून काय निष्पन्न होते, याकडे राज्याचे लक्ष

या सर्व बाबींचा विचार करता हा अपघात नसून नियोजित कट असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असा ठाम दावा रोहित पवार यांनी केला. पायलटची भूमिका संशयास्पद असल्याचे सांगत त्यांनी सखोल आणि निष्पक्ष चौकशीची मागणी केली. या प्रकरणातील प्रत्येक तांत्रिक बाबीची तपासणी झाली पाहिजे, तसेच इंधन भरण्याच्या निर्णयामागील कारणांचा शोध घेतला पाहिजे, असे ते म्हणाले. अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर आधीच राज्यात भावनिक वातावरण निर्माण झाले आहे. त्यात आता घातपाताच्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. रोहित पवार यांनी केलेल्या दाव्यांमुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, पुढील तपासातून नेमके काय निष्पन्न होते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

VSR कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न सुरू

आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या (घातपाताच्या) मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केल्यानंतर भाजपशी संबंधित ट्रोलर्स त्यांना लक्ष्य करत असल्याचा आरोप केला आहे. सलग दुसऱ्यांदा व्हिडिओ सादरीकरण करत त्यांनी VSR कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर दावा केला. विमानाची नोंदणीही बेकायदेशीर असल्याचे त्यांनी म्हटले. ट्रोल करणारे लोक भाजपमधील मोठ्या नेत्यांशी संबंधित असल्याचा आरोप त्यांनी केला.

महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होईल, असा संदेश

या ट्रोलर्सना त्यांनी “पैसे घेऊन काम करणारे” आणि “थर्ड क्लास” असे संबोधले. सामाजिक माध्यमांवर काही ठरावीक पानांवरून मोहिम राबवली जाते, असा दावा करत त्यांनी सुमीत ठक्कर यांचा उल्लेख केला. 28 तारखेच्या घटनेच्या दोन दिवस आधी महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप होईल, असा संदेश टाकून काही मिनिटांत तो काढून टाकल्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचे त्यांनी सांगितले.

श्वेता सिंग नावाच्या अधिकाऱ्याचा उल्लेख

रोहित पवार यांनी आणखी गंभीर आरोप करत म्हटले की, विमानतळ प्राधिकरणाकडे दिलेली त्यांची गोपनीय माहिती या ट्रोलर्सपर्यंत पोहोचते. यामागे कोणाची शक्ती आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. Directorate General of Civil Aviation मधील श्वेता सिंग नावाच्या अधिकाऱ्याचा उल्लेख करत संपर्कांचा वापर करून मोठे जाळे चालते, असा दावा त्यांनी केला. VSR कंपनीचा मालक रोहित सिंग आणि भाजप नेत्यांचे संबंध असल्याचे सांगत, त्याच्या लग्नाला प्रमुख नेते उपस्थित होते, मग पारदर्शक चौकशीची अपेक्षा कशी करायची, असा सवाल त्यांनी केला. तुमच्याकडे पैसेवाले लोक असतील, पण आमच्याकडे स्वाभिमानी मराठी माणसं आहेत, असे आव्हानही त्यांनी दिले.

‘Plot to Kill Ajit Pawar’: Rohit Pawar Alleges Pilot Involvement in Crash

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment