Trending News

No trending news found.

Friday, 15 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

Sanjay Raut : संजय राऊत म्हणाले- नीच कृत्य करणाऱ्यांना जात-धर्म नसतो; खरात अन् एरंडे हिंदू आहेत म्हणून संघटना गप्प का?

विशेष प्रतिनिधी मुंबई : Sanjay Raut  नाशिकमधील खरात बाबा काय मुस्लीम होता का? ऐंरडे काय मुस्लीम होते का? मौला, पादरी होते का? नीच कृत्य करणाऱ्यांना जात धर्म नसतो. खरात बाबा हिंदू आहे, एरंडे हिंदू आहेत म्हणून हिंदू संघटना नरमाईची भूमिका घेणार आणि इतर धर्मांचे कुणी सापडल्यावर रस्त्यावर येणार हे चालणार नाही, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी नाशिकमधील आयटी कंपनीत सुरू असलेल्या आयटी जिहादबद्दल बोलताना म्हटले आहे.Sanjay Raut संजय राऊत म्हणाले की, लव्ह जिहाद हा शब्द सर्वांना लागू झाला पाहिजे. महिलांचे शोषण करणाऱ्यांना हा शब्द लागू पडतो. मोदी संसदेत महिलांच्या न्याय हक्कासाठी बिल आणताय पण त्यांना कोणीतरी सांगितले पाहिजे असे […]

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Sanjay Raut  नाशिकमधील खरात बाबा काय मुस्लीम होता का? ऐंरडे काय मुस्लीम होते का? मौला, पादरी होते का? नीच कृत्य करणाऱ्यांना जात धर्म नसतो. खरात बाबा हिंदू आहे, एरंडे हिंदू आहेत म्हणून हिंदू संघटना नरमाईची भूमिका घेणार आणि इतर धर्मांचे कुणी सापडल्यावर रस्त्यावर येणार हे चालणार नाही, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी नाशिकमधील आयटी कंपनीत सुरू असलेल्या आयटी जिहादबद्दल बोलताना म्हटले आहे.Sanjay Raut

संजय राऊत म्हणाले की, लव्ह जिहाद हा शब्द सर्वांना लागू झाला पाहिजे. महिलांचे शोषण करणाऱ्यांना हा शब्द लागू पडतो. मोदी संसदेत महिलांच्या न्याय हक्कासाठी बिल आणताय पण त्यांना कोणीतरी सांगितले पाहिजे असे हक्क देणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे. शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांनी महिलांना असे हक्क दिले होते. याचे श्रेय महाराष्ट्राला जाते. अशा राज्यात बुआ उदयाला येत आहेत ते सर्व भाजपचे प्रचारक आहेत. याचा भाजपशी संबंध आहे त्यावर बोलले पाहिजे.Sanjay Raut



 

CM Fadnavis : बारामतीत सुनेत्रा पवारांच्या विरोधात तब्बल 55 उमेदवार; भाजप मोठा भाऊ म्हणून खंबीरपणे उभा, CM देवेंद्र फडणवीसांचा शब्द

FIR बद्दल मागणी सुनेत्रा पवारांनी करायला हवी

संजय राऊत म्हणाले की, अजित पवार यांच्या अपघतासंदर्भात महाराष्ट्रात FIR दाखल करा ही रोहित पवार यांची मागणी आहे. तीच मागणी हर्षवर्धन सपकाळ आणि आकाश मोरे करत आहेत. स्वत: मुख्यमंत्री सांगताय की अजित पवार यांच्या अपघाताबद्दल खोलपर्यंत जात तपास करू. त्यासाठी FIR नोंदवावा लागेल. विमान कंपनीवर गुन्हा दाखल करायला तुम्ही तयार नाहीत मग या प्रकरणी तुम्ही सखोल तपास कसा करणार? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. खरंतर ही मागणी सुनेत्रा पवार यांनी करायला पाहिजे. अजित पवारांच्या दोन्ही मुलांनी केली पाहिजे. पण ती मागणी रोहित पवार, काँग्रेस, आकाश मोरे आणि आम्ही सर्व जण करत आहोत. मोरे यांच्या मागणीचा विचार झाला तर उपकार होतील. कर नाही त्याला डर कशाला? असा सवाल राऊत यांनी केला आहे.

यामध्ये मोठ्या भावाचा हात आहे का?

संजय राऊत म्हणाले की, भाजपकडून विरोधकांवर धडाधड गुन्हे दाखल केले जातात, पण त्यांचा जवळचा सहकारी राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांचा जीवाभावाचा सहकाऱ्यांच्या मृत्यू संदर्भात गुन्हा का दाखल केला जात नाही. लहान भावाचा मृत्यू कसा झाला याचा तपास झाला पाहिजे की यामध्ये मोठ्या भावाचा हात आहे. बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यावर सर्वांचे एक मत होईल. पण जी मागणी आहे, FIR करा ती का सोडत आहेत. निवडणूक एक निमित्त आहे ही संधी आहे गुन्हा दाखल करूण घेण्याची. सुनेत्रा पवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील हे सांगायला कोणाची गरज नाही.

पार्थ पवारांना अभ्यास करावा लागेल

संजय राऊत म्हणाले की, पार्थ पवार यांना अभ्यास करावा लागेल. त्यांनी आजोबांकडून काही धडे घेतले पाहिजे. त्यांच्या वडीलांचा इतिहास त्यांनी चाळला पाहिजे. त्यांना राजकारणाची कौटुंबिक पार्श्वभूमी आहे, त्यांनी त्या पद्धतीने काम केले पाहिजे.

Evil Acts Have No Religion”: Sanjay Raut Attacks BJP over Nashik Godman Row

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment