Trending News

No trending news found.

Friday, 15 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

Amit Satam : हर्षवर्धन सपकाळांनी नाक घासून माफी मागावी; भाजप नेते अमित साटम यांची मागणी, म्हणाले- हा शिवप्रेमींच्या श्रद्धेवर घाला

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शनिवारी केलेल्या वादग्रस्त विधानचे पडसाद आता उमटण्यास सुरू झाले आहे. सपकाळ यांनी टिपू सुलतानला छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष मानले गेले पाहिजे, असे विधान केले होते. यावरून भाजपने कॉंग्रेससह सपकाळ यांच्यावर हल्लाबोल सुरू केला आहे. भाजप नेते अमित साटम यांनी ट्विट करत सपकाळ यांच्यावर टीका केली आहे. सपकाळ यांनी तात्काळ नाक घासून माफी मागावी, अशी मागणी साटम यांनी केली आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई :Amit Satam  कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शनिवारी केलेल्या वादग्रस्त विधानचे पडसाद आता उमटण्यास सुरू झाले आहे. सपकाळ यांनी टिपू सुलतानला छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकक्ष मानले गेले पाहिजे, असे विधान केले होते. यावरून भाजपने कॉंग्रेससह सपकाळ यांच्यावर हल्लाबोल सुरू केला आहे. भाजप नेते अमित साटम यांनी ट्विट करत सपकाळ यांच्यावर टीका केली आहे. सपकाळ यांनी तात्काळ नाक घासून माफी मागावी, अशी मागणी साटम यांनी केली आहे.Amit Satam

अमित साटम यांनी ट्विट करत म्हटले की, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे वक्तव्य केवळ निंदनीय नाही, तर संतापाच्या पलीकडचे आहे. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतानाशी करणे हा इतिहासद्रोह आहे, शिवप्रेमींच्या श्रद्धेवर घाला आहे आणि करोडो देशभक्तांच्या भावनांचा अपमान आहे. हा प्रकार महाराष्ट्राच्या अस्मितेवर थेट वार करणारा आहे.Amit Satam



पुढे अमित साटम म्हणाले, काँग्रेसची तुष्टीकरणाची आणि लांगूलचालनाची राजकारणाची परंपरा सर्वश्रुत आहे; पण मतांच्या लालसेपोटी शिवरायांचा अवमान करण्याइतकी नीच पातळी गाठणे हे अत्यंत घृणास्पद आहे. या वक्तव्यातून काँग्रेसची मूळ मानसिकता उघडी पडली आहे. सपकाळ यांनी तात्काळ नाक घासून माफी मागावीच, शिवाय त्यांचे नेते राहुल गांधी यांनीही याबाबत स्पष्ट भूमिका घेत शिवप्रेमींची माफी मागितली पाहिजे. प्रदेशाध्यक्षपदावरून सपकाळ यांची त्वरित हकालपट्टी झाली पाहिजे.

काँग्रेससोबत सत्तेची चूल मांडणाऱ्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांनीदेखील आपली भूमिका स्पष्ट करावी. शिवरायांच्या अपमानावर मौन बाळगणे म्हणजे त्या अपमानाला मूक समर्थन देणे होय, असे म्हणत अमित साटम यांनी ठाकरे गटावर व शरद पवार गटावरही निशाणा साधला आहे.

इतिहासाचे विकृतीकरण करणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला तिलांजली देणाऱ्या विचारसरणीला जनतेने आधीच धडा शिकवला आहे. भविष्यातही अशा प्रवृत्तीला लोकशाहीच्या माध्यमातून मूळापासून उखडून टाकल्याशिवाय महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही. आम्ही सर्व शिवप्रेमी या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करतो, असे अमित साटम यांनी ट्विट करत म्हटले आहे.

हर्षवर्धन सपकाळ यांनी जाहीर माफी मागावी – मनसे

 

तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून देखील हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या विधानावर आपली भूमिका मांडली आहे. मनसेच्या अधिकृत पेजवर ट्विट करत म्हटले की, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानाशी केली. ही अत्यंत निंदनीय बाब आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना याचा तीव्र निषेध नोंदवत आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्राची आणि शिवप्रेमींची जाहीर माफी मागावी.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारीच पत्रकारांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या विधानावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. हर्षवर्धन सपकाळ यांना लाज वाटली पाहिजे, तसेच त्यांनी माफी मागावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.

माझ्या वक्तव्याची मोडतोड- हर्षवर्धन सपकाळ

दरम्यान, वादग्रस्त विधान केल्यानंतर आता हर्षवर्धन सपकाळ यांनी एक्सवर ट्विट करत म्हटले की, माझ्या वक्तव्याची मोडतोड करून ‘ध’ चा ‘मा’ करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत, असा आरोप सपकाळ यांनी केलया आहे.

BJP Leader Amit Satam Demands Harshvardhan Sapkal’s Apology Over Tipu Row

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment