Trending News

No trending news found.

Friday, 15 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

CM Fadnavis : CM देवेंद्र फडणवीसांचा सपकाळांवर हल्लाबोल- टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवरायांशी! हर्षवर्धन सपकाळांना लाज वाटली पाहिजे, त्यांनी माफी मागावी

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रमाणेच टिपू सुलतान यांनाही मान दिला गेला पाहिजे असे वादग्रस्त विधान केले आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली असून, त्यांना लाज वाटली पाहिजे. टिपू सुलतानसारख्या नराधमाची तुलना छत्रपती शिवरायांशी करण्याचे जे काम त्यांनी केले आहे ते अतिशय निंदनीय असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.

विशेष प्रतिनिधी

नागपूर : CM Fadnavis कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रमाणेच टिपू सुलतान यांनाही मान दिला गेला पाहिजे असे वादग्रस्त विधान केले आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली असून, त्यांना लाज वाटली पाहिजे. टिपू सुलतानसारख्या नराधमाची तुलना छत्रपती शिवरायांशी करण्याचे जे काम त्यांनी केले आहे ते अतिशय निंदनीय असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.CM Fadnavis

देवेंद्र फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवरायांनी स्वराज्य तयार केले. मुघलांच्या जोखडातून सामान्य जनतेला मुक्त करण्याचे काम केले. खऱ्या अर्थाने सामान्य रयतेचे राज्य तयार करणारे छत्रपती शिवराय होते. आणि त्याच वेळी हजारो लाखो हिंदूंची हत्या करणे टिपू सुलतान. या दोघांची तुलना करून दोघांना सारखे सन्मान द्या म्हणणे यापेक्षा जास्त लांगूलचालन, जोडे चाटणे मी या जन्मान बघितले नाही. आम्ही हे बिलकुल सहन करणार नाही. टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवरायांशी केळकी त्याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. तसेच अशा पद्धतीने ते बोलत असतील आणि कॉंग्रेस पक्षाने जरा जरी थोडी जरी नैतिकता राहिली असेल तर त्यांनी त्यांची भूमिका मांडली पाहिजे.CM Fadnavis



मुलुंड अपघातावर प्रतिक्रिया

तसेच मुलुंडमध्ये जो अपघात झाला त्याविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुलुंडमध्ये जो अपघात झाला हा अत्यंत दुर्दैवी आहे. त्या ठिकाणी जे काम चालले होते, त्यात स्लॅब पडला. त्यात दुर्दैवी मृत्यू देखील झाला आहे, त्यांच्या कुटुंबीयांसोबत आमच्या प्रार्थना आहेत. जे जखमी झाले आहेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची सगळी काळजी ही एमएमआरडीएच्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

मृतकांच्या परिवाराला शासनाकडून मदत

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, हा जो संपूर्ण प्रकार घडलेला आहे, यात आवश्यक ती काळजी घेतली गेली आहे की नाही याची चौकशी केली जाईल. अर्थातच काळजी घेतली असती तर अशी परिस्थिती आली नसती. याला कोण जबाबदार आहे, त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. आणि तात्काळ जिथे जिथे काम चालू आहे तिथे सेफ्टी ऑडिट करून त्या ठिकाणी अशी घटना घडणार नाही या प्रकारचे प्रयत्न केले जातील. मृतकांच्या परिवाराला शासनाकडून मदत केली जाणार असल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.

CM Fadnavis Slams Harshvardhan Sapkal Over Tipu-Shivaji Maharaj Comparison

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment