Trending News

No trending news found.

Thursday, 14 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

शरद पवार गटाचा विलीनीकरणासाठी धडपडाट; पण सुनेत्रा पवारांच्या दिल्ली भेटीनंतरही सुनील तटकरेंची विलीनीकरणाला टांग!!

शरद पवार गटाचा विलीनीकरणासाठी धडपडाट; पण सुनेत्रा पवारांच्या दिल्ली भेटीनंतरही सुनील तटकरे यांची विलीनीकरणाला टांग!!, अशीच राजकीय घडामोडी आज राजधानीतून समोर आली.

नाशिक : शरद पवार गटाचा विलीनीकरणासाठी धडपडाट; पण सुनेत्रा पवारांच्या दिल्ली भेटीनंतरही सुनील तटकरे यांची विलीनीकरणाला टांग!!, अशीच राजकीय घडामोडी आज राजधानीतून समोर आली.Sunil tatkare downplays both NCPs unification

अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वात खोडा घालण्यासाठी शरद पवारांच्या गटाने दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुद्दा ऐरणीवर आणला. पण प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी तो हाणून पाडला. त्यासाठी भाजपच्या नेतृत्वाची सुद्धा त्यांना साथ मिळाली. सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतर तब्बल 14 दिवसांनी त्यांनी आज राजधानी नवी दिल्लीत येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या सदिच्छा भेटी घेतल्या. मोदी आणि शाह यांच्या सदिच्छा भेटी घेतल्याचे ट्विट स्वतः सुनेत्रा पवार यांनी केले.



– सुनेत्रा पवारांच्या गाठीभेटी, रोहित पवारांची पत्रकार परिषद

मात्र सुनेत्रा पवारांच्या दिल्लीतल्या या भेटीगाठी सुरू असतानाच रोहित पवारांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन अजित पवारांच्या विमान अपघाता विषयी मोठी संशय पेरणी केली. सुनेत्रा पवारांना अनिच्छेने उपमुख्यमंत्री पद स्वीकारायला लावल्याचा आरोप रोहित पवारांनी केला. त्याचबरोबर अजित पवारांच्या विमान अपघाताविषयी वेगवेगळे तर्कवितर्क लढविले. रोहित पवारांनी कालच मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये पत्रकार परिषद घेऊन प्रेझेंटेशन केले होते. तेच प्रेझेंटेशन त्यांनी आज दिल्लीत येऊन रिपीट केले. त्यानंतर त्यांनी उद्या पत्रकार परिषद घेऊन विलीनीकरणासंदर्भातले सगळे पुरावे आणि अजितदादांशी झालेली चर्चा यांचे तपशील तारीख वार यांच्यासह मांडणार असल्याचे जाहीर केले. यातून रोहित पवारांचा विलीनीकरणासाठी असलेला धडपडाट समोर आला. कारण या विलीनीकरणाचा लाभ मिळून राज्यात राज्यमंत्रीपद मिळायची त्यांना अपेक्षा आहे.

– रोहित पवारांच्या धडपडाटावर पाणी

या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी रोहित पवारांच्या धडपडाटावर पाणी फेरले. विलीनीकरण कोणाचे कोणाशी??, हा सवाल रिपीट करून त्यांनी रोहित पवारांचे म्हणणे अप्रत्यक्षपणे खोडून काढले. सुनेत्रा पवारांच्या आजच्या दिल्ली भेटीत कुणाशीही विलीनीकरणाचा विषय चर्चेला सुद्धा आला नाही. त्यांच्या फक्त सदिच्छा भेटी होत्या. या भेटीगाठींच्या वेळी प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार आणि जय पवार सुद्धा उपस्थित होते, पण दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाविषयी किंवा कुठल्याही राजकारणाविषयी मोदी आणि शाह या दोन्ही नेत्यांशी चर्चा झाली नाही असा स्पष्ट खुलाचा सुनील तटकरे यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस भाजपबरोबर सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील होईल हा निर्णय अजितदादा हयात असतानाच झाला होता तो आजही कायम आहे सुनेत्रा पवार आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व करत आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी आहोत, असेही सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.

– विलीनीकरणाचा मुद्दा सुटलाच नाही

शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस भाजप बरोबर यायला तयार असेल तर तुम्ही विलीनीकरणाचे स्वागत करणार का??, असा सवाल पत्रकारांनी विचारल्यानंतर मी जर तरच्या प्रश्नाला उत्तरे देत नाही. विलीनीकरणाच्या विषयावर आज चर्चा झाली नाही, विलीनीकरण कुणाचे एकूण कुठल्या पक्षात??, या सवालाचे उत्तर अजून समोरून आलेले नाही. त्यामुळे रोहित पवार यांनी उद्या जर काही मुद्दे मांडले काही पुरावे सादर केले, तर त्यावर नंतर बोलू, असे स्पष्ट करून सुनील तटकरे यांनी विलीनीकरणाचा मुद्दा फेटाळून लावला. त्यामुळे सुनेत्रा पवारांच्या दिल्ली दौऱ्यानंतर सुद्धा विलीनीकरणाचा मुद्दा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या इच्छेनुसार सुटला नाही.

Sunil tatkare downplays both NCPs unification

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment