Trending News

No trending news found.

Friday, 15 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

Nitesh Rane : महायुतीच्या नावावर कमळ पाडणाऱ्यांना सोडणार नाही; अदृश्य हातांना बाजूला करण्याची वेळ आलीय, नीतेश राणेंचा बंडखोरांना इशारा

सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालात भाजपच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले असले तरी, अंतर्गत गटबाजीवरून राजकीय वातावरण तापले आहे. "देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर सिंधुदुर्गाच्या जनतेने विश्वास दाखवला आहे, मात्र काही लोकांनी महायुतीत राहूनच 'कमळ' पाडण्याचे काम केले," असा खळबळजनक आरोप मंत्री आणि आमदार नितेश राणे यांनी केला आहे. विशेषतः सावंतवाडी येथील बंडखोर अपक्षांच्या मुद्द्यावरून त्यांनी स्वपक्षातील आणि महायुतीतील काही नेत्यांना जाहीर इशारा दिला आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Nitesh Rane सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालात भाजपच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले असले तरी, अंतर्गत गटबाजीवरून राजकीय वातावरण तापले आहे. “देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर सिंधुदुर्गाच्या जनतेने विश्वास दाखवला आहे, मात्र काही लोकांनी महायुतीत राहूनच ‘कमळ’ पाडण्याचे काम केले,” असा खळबळजनक आरोप मंत्री आणि आमदार नितेश राणे यांनी केला आहे. विशेषतः सावंतवाडी येथील बंडखोर अपक्षांच्या मुद्द्यावरून त्यांनी स्वपक्षातील आणि महायुतीतील काही नेत्यांना जाहीर इशारा दिला आहे.Nitesh Rane

नितेश राणे यांनी या विजयाचे श्रेय देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाला दिले. सत्तेचा वापर करून ग्रामीण भागातील शेवटच्या टोकापर्यंत विकास पोहोचवणार असल्याचे ते म्हणाले. राणे साहेबांनी जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न साडेचार लाखांपर्यंत नेण्याचा संकल्प केला आहे, तो जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून साध्य करू, असा विश्वासही नीतेश राणे यांनी व्यक्त केला.Nitesh Rane



सावंतवाडीतील अपक्षांवरून तीव्र नाराजी

जिल्ह्यात निवडून आलेल्या पाच अपक्ष उमेदवारांवर बोलताना नितेश राणे यांनी त्यांची ‘भाजप बंडखोर’ अशी ओळख करून दिली. “या अपक्षांनी रवींद्र चव्हाण यांच्या नावाचा गैरवापर करून भाजपचे अधिकृत उमेदवार पाडले. शर्टावर कमळ लावायचे आणि दुसरीकडे कमळ पाडण्यासाठी ताकद लावायची, हा प्रकार महायुतीला गालबोट लावणारा आहे,” असा संताप नीतेश राणे यांनी व्यक्त केला. जर या लोकांनी खोडा घातला नसता, तर सिंधुदुर्गातील ५० पैकी ५० जागांवर महायुतीचा एकतर्फी विजय झाला असता, असा दावाही त्यांनी केला.

विरोधकांकडे ताकद नाही, शत्रू घरचाच!

नितेश राणे यांनी शिवसेना ठाकरे गट आणि महाविकास आघाडीवर सडकून टीका केली. “सिंधुदुर्गात भाजप किंवा महायुतीला हरवण्याची ताकद ना उबाठामध्ये आहे, ना महाविकास आघाडीत. महायुतीचा पराभव करण्यासाठी ज्या ‘अदृश्य हातांनी’ पडद्यामागून हालचाली केल्या, त्या मस्ती करणाऱ्या लोकांना आता बाजूला करण्याची वेळ आली आहे,” असे म्हणत त्यांनी स्वकीयांनाच निर्वाणीचा इशारा दिला आहे.

Sindhudurg ZP Results: Nitesh Rane Warns Rebels Over ‘Lotus’ Sabotage

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment