Trending News

No trending news found.

Friday, 15 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

PM Modi : महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे अभिनंदन; महाराष्ट्राने पुन्हा आम्हाला पाठिंबा दिला, PM नरेंद्र मोदींची ट्विट करत ZP निकालावर प्रतिक्रिया

राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव व लातूर या 12 जिल्ह्यांतील जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. यात भाजप व महायुतीला घवघवीत यश मिळाले असून भाजप पुन्हा एकदा नंबर वनचा पक्ष बनला आहे. या निकालावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : PM Modi  राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव व लातूर या 12 जिल्ह्यांतील जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. यात भाजप व महायुतीला घवघवीत यश मिळाले असून भाजप पुन्हा एकदा नंबर वनचा पक्ष बनला आहे. या निकालावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.PM Modi

नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटले की, पुन्हा एकदा, महाराष्ट्राने भाजप आणि महायुतीला पाठिंबा दिला आहे. महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकांमधील भाजप आणि महायुतीच्या घवघवीत यशानंतर, महाराष्ट्रातील जनतेने जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही आम्हांला भक्कम जनादेश दिला आहे. ग्रामीण असो वा शहरी, महाराष्ट्र राज्यातील जनतेला सुशासन आणि राज्याच्या गौरवशाली संस्कृतीचा आदर करणारे युतीचे सरकार हवे आहे, हे यावरून स्पष्ट होते. मी महाराष्ट्रातील माझ्या तमाम बंधू-भगिनींचे आभार मानतो. ​महाराष्ट्र सरकारच्या ठोस कामगिरीबद्दल तसेच एनडीएच्या सुशासनाच्या दृष्टिकोनाबद्दल जनतेपर्यंत माहिती पोहोचवत, स्थानिक स्तरावर अथक परिश्रम करणाऱ्या महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करतो.PM Modi



विरोधकांमध्ये लढण्याच्या इच्छाशक्तीचा अभाव- देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया देताना विरोधकांवर टोलेबाजी केली आहे. ते म्हणाले, आम्ही या विचारांचे आहोत की कोणीही पर्मनन्ट जिंकत नसते आणि कोणीही पर्मनन्ट हारत नसते. पण जे लोक आपल्या पराभवाचे कारणे शोधण्याच्या ऐवजी कोणावर तरी खापर फोडतात ते मात्र कधीच जिंकू शकत नाहीत, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे. तसेच महाविकास आघाडी फारशी कुठे दिसत नाही. रोज सकाळी 9 वाजता त्यांचे प्रवक्ते जे बोलतात, त्याने आम्हाला फायदाच होतो. त्यामुळे आम्हाला फारसे काही करायची गरजच पडत नाही. लोकांचा त्यांच्यावरचा विश्वासही आता रोज कमी होत चालला असल्याचे फडणवीस म्हणाले.

विरोधकांमध्ये जी लढण्याची इच्छाशक्ती पाहिजे त्याचा अभाव दिसत आहे. जनतेत जाऊन काम करावे लागते, पण विरोधी पक्ष हा केवळ माध्यमांमध्ये दिसतो. जोपर्यंत तो माध्यमांमध्ये आहे तोपर्यंत जनता त्यांच्यासोबत जाणार नाही, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Maharashtra ZP Results 2026: PM Modi Hails Mahayuti’s ‘Solid Mandate’

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment