Trending News

No trending news found.

Saturday, 7 March
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

अजितदादांच्या अकाली एक्झिटची सहानुभूती फक्त पुणे जिल्ह्यात??, ZP निवडणुकीत भाजपच नंबर 1, अजितदादांची राष्ट्रवादी नंबर 3, तर शरद पवारांची राष्ट्रवादी 6 नंबर वर!!

अजितदारांच्या अकाली एक्झिटची सहानुभूती फक्त पुणे जिल्ह्यापुरतीच उरली की काय??, अशी शंका येणारी आकडेवारी साम टीव्हीने घेतलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या एक्झिट पोल मधून समोर आली.

नाशिक : अजितदारांच्या अकाली एक्झिटची सहानुभूती फक्त पुणे जिल्ह्यापुरतीच उरली की काय??, अशी शंका येणारी आकडेवारी साम टीव्हीने घेतलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांच्या एक्झिट पोल मधून समोर आली. कारण जिल्हा परिषद निवडणुकीतल्या एक्झिट पोल नुसार भाजपाच पहिला नंबरचा पक्ष ठरेल, तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना दुसऱ्या नंबर वर अजितदादांचे राष्ट्रवादी तिसऱ्या नंबर वर तर शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस सहाव्या नंबर वरचा पक्ष असेल, अशी आकडेवारी समोर आली.

12 जिल्हा परिषदांच्या एकूण 731 जागांपैकी भाजपला 263, शिंदे सेनेला 156 अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 118, काँग्रेसला 61, ठाकरे सेनेला 48, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 41 मनसेला सहा आणि इतर पक्षांना 31 जागा मिळण्याची शक्यता साम टीव्हीच्या एक्झिट पोलनी वर्तविली. या आकडेवारीतून भाजप पहिल्या नंबरचा पक्ष ठरला.

– दोन्ही राष्ट्रवादी लढल्या एकत्र

अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर महाराष्ट्रातल्या 12 जिल्हा परिषदांची निवडणूक झाली. या निवडणुकीत सुरुवातीला अजितदादांनी प्रचारात आघाडी घेतली होती. त्यामुळे भाजप आणि शिंदे सेना सुद्धा हिरीरीने प्रचारात उतरली होती. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या बहुसंख्य उमेदवारांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या घड्याळा चिन्हावर निवडणूक लढविणे पसंत केले होते. त्यामुळे 12 पैकी जवळपास प्रत्येक जिल्हा परिषदेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येऊनच निवडणूक लढवत होत्या. पण अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर जिल्हापरिषद निवडणुकांना वेगळे वळण लागले. सर्वच पक्षांनी प्रचाराची पातळी घटवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर एकही प्रचारसभा घेतली नाही. एकनाथ शिंदे यांनी सुद्धा निवडक प्रचार सभा घेतल्या. पण या निवडणुकांच्या मतदानावर अजित पवारांच्या अकाली एक्झिटचा परिणाम होईल आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सहानुभूती मिळेल, असा होरा अनेक राजकीय निरीक्षकांनी बांधला होता. तो होरा एक्झिट पोल मध्ये तरी फोल ठरल्याचेच चित्र आज समोर आले.

– पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीची सत्ता, पण…

आज सर्व जिल्हा परिषदांचे मतदान संपल्यानंतर साम टीव्हीने घेतलेला एक्झिट पोल समोर आला. या एक्झिट पोल नुसार फक्त पुणे जिल्ह्यातच अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांची एकत्रित मिळून सत्ता येऊ शकते, असे चित्र समोर आले. बाकीच्या 11 जिल्हा परिषदांमध्ये राष्ट्रवादी सत्तेत सहभाग घेऊ शकते, पण भाजपची ज्युनिअर पार्टनर म्हणूनच त्या पक्षाला राहावे लागण्याची स्थिती आहे. पुणे जिल्हा परिषदेत सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसला एकहाती सत्ता मिळण्याची शक्यता नसून 73 पैकी दोन्ही राष्ट्रवादी म्हणून फक्त 30 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. पुणे जिल्हा परिषदेत भाजपला 20 तर शिंदे सेनेला 10 जागा मिळण्याची शक्यता असून ठाकरे सेनेला दोन आणि काँग्रेसला एक जागा मिळण्याची शक्यता आहे. अर्थातच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन त्यांनी भाजपवर संख्यात्मक पातळीवर मात केली असली, तरी दोन्ही राष्ट्रवादींना एकत्र येऊन बहुमत मिळालेले नाही. त्यामुळे पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली महायुतीची सत्ता येणे अपरिहार्य आहे, असे एक्झिट पोल मधली आकडेवारी दाखवते. याचा अर्थ असा की अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर निर्माण झालेली सहानभूती काही प्रमाणात पुणे जिल्ह्यापुरती चालली असली, तरी ती सहानुभूती राष्ट्रवादी काँग्रेसचे पूर्ण बहुमत आणण्यात यशस्वी ठरल्याचे निदान एक्झिट पोल मधून तरी दिसले नाही.

– पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा प्रभाव संपुष्टात

पश्चिम महाराष्ट्रातल्या सातारा, कोल्हापूर आणि सांगली या एकेकाळच्या राष्ट्रवादीचा एकहाती प्रभाव असणाऱ्या जिल्हा परिषदांमध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीची सत्ता येण्याची शक्यता साम टीव्हीच्या एक्झिट पोलने वर्तवली. यात कोल्हापूर जिल्ह्यात शिंदे सेनेला सर्वाधिक जागा मिळतील, तर सातारा आणि सांगली मध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळतील, असा अंदाज एक्झिट पोलने समोर आणला आहे. त्यामुळे अजित पवारांच्या अकाली एक्झिटची सहानुभूती फक्त पुणे जिल्ह्यात मर्यादित चालली पण उर्वरित महाराष्ट्रात ती फारशी चालली नाही असेच चित्र निदान एक्झिट पोलच्या आकड्यांमधून तरी समोर आले.

ZP elections exit Poll shows BJP number 1

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment