Trending News

No trending news found.

Sunday, 8 March
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
माहिती जगाची

Ghaziabad : मोबाइल गेमच्या व्यसनामुळे यूपीमध्ये 3 बहिणींची आत्महत्या, 9व्या मजल्यावरून मारली उडी

उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये तीन सख्ख्या बहिणींनी नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. मंगळवारी रात्री 2 वाजता तिन्ही बहिणींनी एकमेकींचा हात धरून बाल्कनीतून उडी मारली. पडण्याचा आवाज ऐकून कॉलनीतील लोक तिथे पोहोचले आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली.

वृत्तसंस्था

गाझियाबाद : Ghaziabad उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये तीन सख्ख्या बहिणींनी नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. मंगळवारी रात्री 2 वाजता तिन्ही बहिणींनी एकमेकींचा हात धरून बाल्कनीतून उडी मारली. पडण्याचा आवाज ऐकून कॉलनीतील लोक तिथे पोहोचले आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली.Ghaziabad

तिन्ही बहिणींचे वय 12 ते 16 वर्षांच्या दरम्यान आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिन्ही बहिणींना टास्क-आधारित कोरियन लव्ह गेमचे व्यसन होते. त्या कोरोना काळापासून हा गेम खेळत होत्या. वडिलांनी त्यांना गेम खेळण्यास मनाई केली आणि त्यांना फटकारले. यामुळे तिन्ही बहिणींनी हे पाऊल उचलले. मात्र, कुटुंबीय सध्या काहीही बोलत नाहीत.Ghaziabad



ही घटना भारत सिटी बी-1 टॉवरमधील फ्लॅट नंबर 907 मधील आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) आलोक प्रियदर्शी यांनी सांगितले की, पोलीस प्रत्येक पैलूवर तपास करत आहेत. आतापर्यंतच्या तपासात तिघींनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. तिघी एकत्रच राहत होत्या. त्या मोबाईलवर गेम खेळत होत्या. कोणत्या परिस्थितीत त्यांनी आत्महत्या केली, याचा तपास सुरू आहे.

सुसाइड नोटमध्ये लिहिले होते- गेम सोडता येत नाहीये

तिन्ही बहिणी ज्या खोलीत झोपत होत्या, तिथे डायरीत एक सुसाइड नोट सापडली. त्यात लिहिले होते, ‘मम्मी-पप्पा सॉरी…गेम सोडता येत नाहीये.’

वडील ऑनलाइन ट्रेडिंगचे काम करतात

एसपी अतुल कुमार सिंह यांनी सांगितले- मुलींची नावे निशिका (16), प्राची (14) आणि पाखी (12) अशी आहेत. त्यांचे वडील चेतन ऑनलाइन शेअर ट्रेडिंगचे काम करतात. पोलिसांना रात्री 2:18 वाजता माहिती मिळाली, त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले.

तिन्ही मुली जमिनीवर पडलेल्या आढळल्या आणि गंभीर जखमी होत्या. त्यांना रुग्णवाहिकेतून लोणी येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी तिघींनाही मृत घोषित केले.

कोरियन लव गेमबद्दल जाणून घ्या

कोरियन लव गेम हा एक प्रकारचा ऑनलाइन गेम आहे. हे इंटरनेटवर चालणाऱ्या अशा ऑनलाइन चॅट सिस्टीमचे नाव आहे, ज्यात समोरची व्यक्ती स्वतःला कोरियन किंवा परदेशी मुलगा-मुलगी असल्याचे सांगून बोलणे सुरू करते. हा गेम बहुतेक सोशल मीडिया आणि मेसेजिंग ॲप्सद्वारे पसरतो.

सुरुवातीला समोरची व्यक्ती मैत्री आणि प्रेमाच्या गोष्टी करते. विश्वास निर्माण व्हावा यासाठी सोपे सोपे टास्क दिले जातात. हळूहळू टास्क वाढत जातात. मानसिक दबाव निर्माण होऊ लागतो. अनेक प्रकरणांमध्ये, बोलणे न ऐकल्यास धमकावले जाते. यामुळे खेळणारी व्यक्ती तणावात येते. तिचे/त्याचे वर्तन बदलू लागते.

Ghaziabad Tragedy: 3 Sisters Jump from 9th Floor Over Korean Game Addiction

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment