Trending News

No trending news found.

Thursday, 14 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

सोनिया ते सुनेत्रा; शरद पवारांचा राजकीय आलेख चढला की घसरला??

शरद पवारांनी राजकीय आयुष्यात अनेक चढ - उतार पाहिले. अगदी तरुण वयातच ते आमदार मंत्री आणि नंतर मुख्यमंत्री बनले. त्यावेळी त्यांचे स्वतंत्र राजकीय व्यक्तिमत्व विकसित होत होते. पण 1985 नंतर शरद पवारांच्या राजकीय आयुष्याला जे वळण लागले, त्यानंतर त्यांचा राजकीय आलेख सोनिया ते सुनेत्रा असा उतरत गेल्याचेच चित्र समोर आले.

नाशिक : शरद पवारांनी राजकीय आयुष्यात अनेक चढ – उतार पाहिले. अगदी तरुण वयातच ते आमदार मंत्री आणि नंतर मुख्यमंत्री बनले. त्यावेळी त्यांचे स्वतंत्र राजकीय व्यक्तिमत्व विकसित होत होते. पण 1985 नंतर शरद पवारांच्या राजकीय आयुष्याला जे वळण लागले, त्यानंतर त्यांचा राजकीय आलेख सोनिया ते सुनेत्रा असा उतरत गेल्याचेच चित्र समोर आले.From Sonia to Sunetra; Has Sharad Pawar’s political graph risen or fallen??

1990 च्या दशकात शरद पवार पंतप्रधान पदाच्या रेस मध्ये उतरल्यानंतर त्यांचा मुकाबला काँग्रेसमधल्या अतिवरिष्ठ नेत्यांशी झाला. त्यावेळी त्यांनी सोनिया गांधींचा राजकीय आश्रय घेतला होता. शरद पवारांनी नरसिंह राव आणि सीताराम केसरी या दोघांची राजकीय मुकाबला करून पाहिला, पण त्यामध्ये त्यांना दारूण अपयश आले. शेवटी त्यांना या दोन्ही नेत्यांशी समझोता करूनच आपली राजकीय वाटचाल करावी लागली होती.



– आधी सोनियांना आव्हान, नंतर शरणागती

पण त्या पलीकडे जाऊन त्यांनी स्वतःचा स्वतंत्र राजकीय स्वाभिमान जपण्यासाठी ज्यावेळी परकीयत्वाचा मुद्दा काढला आणि सोनिया गांधी यांच्याशी संघर्ष मांडला, त्यावेळी मात्र पवार आता दीर्घकाळ खेळी करून देशाच्या राजकारणावर आपली मुद्रा उमटवतील, असे भासमान झाले होते. पण प्रत्यक्षात अवघ्या सहाच महिन्यांत शरद पवारांना सोनिया गांधींपुढे शरणागती पत्करून आपली भविष्यातली पुढची राजकीय वाटचाल करावी लागली होती. ही वाटचाल 10 वर्षे टिकली. मग भले त्यांनी स्वतःचे स्वतंत्र राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस नावाचा पक्ष काढला तरी, त्यांना सोनिया गांधी यांच्याबरोबरच समझोता करून किंबहुना सोनिया गांधी यांच्यापुढे शरणागती पत्करून आपले राजकारणातले अस्तित्व तगवून धरावे लागले होते.

पण काही झाले तरी शरद पवारांचा राजकीय संघर्ष हा काँग्रेसच्या अतिवरिष्ठ नेत्यांशी झाला होता आणि 2014 पर्यंत त्यांना काँग्रेसच्या अतिवरिष्ठ नेत्यांची समझोता करून वाटचाल करावी लागली होती.

– पवारांची समझोता एक्सप्रेस सुनेच्या स्टेशनवर थांबली

त्या उलट अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर मात्र शरद पवारांना त्यांच्या समझोत्याची एक्सप्रेस फारच खाली आणावी लागली. सोनिया ते सुनेत्रा असा प्रवास करावा लागला. हीच स्पष्ट राजकीय चिन्हे अजित पवारांच्या एक्झिट नंतर दिसून आली. शरद पवारांनी सोनिया गांधींना परकीयत्वाचा मुद्दा काढून विरोध केला होता. सोनिया गांधी या मूळच्या भारतीय नाहीत त्या जन्माने परदेशी आहेत. त्यामुळे त्यांचे नेतृत्व भारतीय जनता स्वीकारणार नाही. सबब त्यांनी पंतप्रधान बनता कामा नये, असे शरद पवार त्यावेळी म्हणाले होते. पण नंतर त्याच सोनिया गांधी यांच्याबरोबर शरद पवारांना समझोता करावा लागला होता.

– मुलीच्या political settlement ची गॅरंटी नाही

2024 च्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यातल्या राजकीय संघर्षात सुप्रिया सुळे या “मूळच्या पवार” आहेत, म्हणून त्यांना मते द्या. सुनेत्रा पवार या “बाहेरून आलेल्या पवार” आहेत, त्यामुळे त्यांना मते देऊ नका, असा प्रचार शरद पवारांनी केला होता. पण दोनच वर्षांमध्ये नियतीचे राजकीय चक्र असे काही फिरले की, शरद पवारांना आता त्याच “बाहेरून आलेल्या पवारांपुढे” म्हणजेच सुनेत्रा पवारांपुढे राजकीय शरणागती पत्करायची वेळ आली. शरद पवारांचा राजकीय सूर्य तळपत असताना सुद्धा त्यांना काँग्रेसच्या श्रेष्ठींशी संघर्ष करताना अपयश आले, म्हणून त्यांना समझोता करावा लागला होता. आता शरद पवारांचा राजकीय सूर्य अस्ताला जात असताना त्यांना आपल्या सुनेपुढे राजकीय शरणागती पत्करावी लागली आहे. पण ही शरणागती पत्करून सुद्धा शरद पवारांना आपल्या मनासारखी मुलीची political settlement करता येईलच, याची कुठलीही गॅरेंटी नाही!!

From Sonia to Sunetra; Has Sharad Pawar’s political graph risen or fallen??

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment