Trending News

No trending news found.

Tuesday, 3 February
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

Prakash Mahajan : प्रकाश महाजनांची ठाकरे बंधूंवर टोलेबाजी; म्हणाले- घरातील मासा मेला म्हणून सूतक पाळणारे कधीही लोकनेते होऊ शकत नाही

मी दोन भाऊ एकत्र येण्यासाठी संघर्ष केला, ते एकत्र झाले आणि मला बाहेर केले, त्यांनी मला बाहेरचा रस्ता दाखवला, हे लोकनेते होऊच शकत नाही, अशी टीका शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी केली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील देवगाव रंगारी येथे सभेत बोलताना महाजन यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली.

विशेष प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : Prakash Mahajan  मी दोन भाऊ एकत्र येण्यासाठी संघर्ष केला, ते एकत्र झाले आणि मला बाहेर केले, त्यांनी मला बाहेरचा रस्ता दाखवला, हे लोकनेते होऊच शकत नाही, अशी टीका शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी केली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील देवगाव रंगारी येथे सभेत बोलताना महाजन यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली. Prakash Mahajan

प्रकाश महाजन म्हणाले, कुत्र्याला सर्दी झाली म्हणून दुष्काळी दौरा रद्द करणारे, घरातील मासा मेला म्हणून सूतक पाळणारे कधीही लोकनेते होऊ शकत नाही, असा खोचक टोला महाजन यांनी ठाकरेंवर लगावला आहे. तसेच यावेळी बोलताना महाजन यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. एकनाथ शिंदे यांच्यात मला गोपीनाथ मुंडे यांची छबी दिसते. गोपीनाथ मुंडे देखील एकनाथ शिंदे यांच्यासारखे उशिरा यायचे. एकनाथ शिंदे यांच्याकडे लोकनेता म्हणून पाहू शकतो. लोकनेता शिंदे यांच्यासारखा असावा, असे महाजन यांनी म्हटले. Prakash Mahajan



पुढे बोलताना प्रकाश महाजन म्हणाले, माझे थोडे वय वाढले आहे आणि काही गोष्टी मनाविरुद्ध घडतात. त्यामुळे मी थांबायचे ठरवले आहे. माझा बाकी कोणावर राग नाही. तसेच नारायण राणेंना आव्हान देणे भोवले का? असे विचारले असता ते म्हणाले असे काहीही नाही. कुठेतरी थांबले पाहिजे. त्यामुळे मी थांबलेलो आहे. बाकी काही नाही. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा माणूस आहे. आम्ही कधी ते लपवले नाही. मी राज ठाकरेंना घाबरत नाही. संघ विचारांचा मी माणूस आहे, शाखेत देखील जातो, असे महाजन यांनी म्हटले.

दरम्यान, महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा राजकीय धक्का बसला होता. पक्षाचे आक्रमक प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी 13 सप्टेंबर रोजी आपल्या पदाचा अधिकृत राजीनामा दिला होता. गेल्या काही दिवसांपासून ते पक्षांतर्गत कारणांमुळे नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या, ज्या अखेर या राजीनाम्यामुळे स्पष्ट झाल्या. आता प्रकाश महाजन शिवसेना शिंदे गटात प्रवक्ते पदाची जबाबदारी सांभाळत आहेत.

Prakash Mahajan Slams Thackeray Brothers; Compares Eknath Shinde to Gopinath Munde

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment