Trending News

No trending news found.

Saturday, 10 January
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

BMC Election 2026 : ‘स्पीडब्रेकर’ आघाडी पुन्हा एकदा मुंबईच्या विकासाला कायमचे ‘ग्रहण’ लावणार!

मुंबई ही केवळ महाराष्ट्राचीच नाही, तर भारताची आर्थिक नाडी आहे. कोट्यवधी लोकांच्या स्वप्नांना कवेत घेणाऱ्या या महानगराची ओळख 'धावणारी मुंबई' अशी आहे.

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुंबई ही केवळ महाराष्ट्राचीच नाही, तर भारताची आर्थिक नाडी आहे. कोट्यवधी लोकांच्या स्वप्नांना कवेत घेणाऱ्या या महानगराची ओळख ‘धावणारी मुंबई’ अशी आहे. परंतु, गेल्या काही वर्षांचा इतिहास पाहिला तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते – जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप-महायुतीचे सरकार येते, तेव्हा मुंबई धावते; आणि जेव्हा जेव्हा महाविकास आघाडी (मविआ) नावाचा प्रयोग होतो, तेव्हा मुंबईच्या विकासाला ‘स्पीडब्रेकर’ लागतो. आज पुन्हा एकदा तीच स्थगिती देणारी प्रवृत्ती मुंबईच्या दारावर उभी आहे. Mumbai’s development!

फडणवीस काळ : मुंबईच्या पायाभूत सुविधांचे सुवर्णयुग

२०१४ ते २०१९ या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मुंबईने खऱ्या अर्थाने आधुनिकतेची कास धरली. दशकानुदशके कागदावर असलेले प्रकल्प जमिनीवर उतरले. मुंबई मेट्रोचे जाळे विणणे असो, कोस्टल रोडची आखणी असो किंवा ट्रान्स हार्बर लिंक (अटल सेतू) ची पायाभरणी असो; या सर्व कामांना फडणवीसांनी ‘रॉकेट गती’ दिली होती.

अहंकार आणि स्थगिती

२०१९ मध्ये अनैतिक तडजोड करून सत्तेत आलेल्या उद्धव ठाकरे सरकारने विकासाची ही गाडी रुळावरून खाली उतरवली. केवळ देवेंद्र फडणवीस यांचे श्रेय हिरावून घेण्याच्या सूडबुद्धीपोटी मेट्रो-३ चे कारशेड (आरे) रोखून धरण्यात आले. या एका अहंकारी निर्णयामुळे प्रकल्पाचा खर्च तब्बल १० हजार कोटींनी वाढला आणि मुंबईकरांचा हक्काचा प्रवास चार वर्षे लांबणीवर पडला.

जलयुक्त शिवारपासून ते मेट्रोपर्यंत प्रत्येक लोककल्याणकारी कामाला स्थगिती देणे, हेच मविआ सरकारचे मुख्य धोरण बनले होते. ज्या वेळी सामान्य मुंबईकर खड्डे आणि वाहतूक कोंडीत तासन् तास अडकला होता, तेव्हा ‘मातोश्री’वरून केवळ प्रकल्पांना खो घालण्याचे आदेश सुटत होते.

सामान्यांच्या वेदना आणि ‘उबाठा’ टोळीचा ऐशोआराम

लॉकडाऊनच्या काळात जेव्हा मुंबईकर हतबल होता, तेव्हा उबाठा टोळी आणि त्यांचे बगलबच्चे भ्रष्टाचाराच्या आरोपांत आणि आलिशान जीवनशैलीत दंग होते. ‘खिचडी’पासून ते ‘बॉडी बॅग’पर्यंतच्या घोटाळ्यांचे आरोप याच काळात झाले. सामान्यांचे प्रश्न त्यांच्यासाठी कधीच प्राधान्याचे नव्हते; त्यांना रस होता तो फक्त प्रकल्पांमधील अडथळे निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजण्यात.

महायुतीचे पुनरागमन: विकासाची एक्स्प्रेस पुन्हा धावली!

२०२२ मध्ये राज्यात महायुती सरकार आले आणि मुंबईने सुटकेचा निश्वास टाकला. रखडलेले सर्व अडथळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवघ्या काही दिवसांत दूर केले.

त्यामध्ये अनेक प्रोजेक्ट आपल्याला पाहायला मिळतात.



अटल सेतू

महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर फडणवीसांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईकरांना मोठी भेट मिळाली. ते म्हणजे, देशातील सर्वात लांब सागरी सेतू विक्रमी वेळेत पूर्ण करून जनतेसाठी खुला केला.

कोस्टल रोड

दक्षिण मुंबई ते वरळी हा प्रवास आता अवघ्या काही मिनिटांवर आला आहे, हे केवळ महायुती सरकारच्या इच्छाशक्तीमुळे शक्य झाले.

मेट्रो आणि बुलेट ट्रेन

ज्या बुलेट ट्रेनला ‘नको असलेला प्रकल्प’ म्हणून हिणवले गेले, त्याचे काम आज युद्धपातळीवर सुरू आहे. मेट्रोच्या नवनवीन मार्गिका मुंबईकरांच्या सेवेत दाखल होत आहेत.

त्यानंतर २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा महाराष्ट्रात श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार स्थापन झाले. तेव्हापासून पुन्हा महाराष्ट्र आता कधीच थांबणार नाही, असा विश्वास लोकांना आहे. परंतु, मुंबई महापालिकेत ज्या पद्धतीने पुन्हा एकदा स्पीडब्रेकर लावणारी आघाडी नशीब आजमावू लागली आहे, जर त्या आघाडीला चुकूनही संधी मिळाली तर मुंबईचा विकास पुन्हा मागे हटल्याशिवाय राहणार नाही.

सावध व्हा! पुन्हा ‘स्पीडब्रेकर’ नकोत!

उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मित्रपक्षांची कार्यपद्धती ही नेहमीच ‘विकासविरोधी’ राहिलेली आहे. जर ही ‘स्पीडब्रेकर’ आघाडी पुन्हा चुकून सत्तेत आली, तर पुन्हा एकदा मुंबईच्या प्रकल्पांना स्थगितीचे ग्रहण लागेल. त्यांचा वैयक्तिक अहंकार, टक्केवारीचे राजकारण आणि स्वार्थ मुंबईला पुन्हा २० वर्षे मागे नेईल.

मुंबईच्या प्रगतीला खीळ बसू नये आणि सर्वसामान्य मुंबईकरांचे आयुष्य पुन्हा एकदा नरकप्राय होऊ नये, यासाठी या ‘स्पीडब्रेकर’ प्रवृत्तीला कायमचे रोखणे ही आज काळाची गरज आहे. मुंबईकरांनो, विचार करा… तुम्हाला ‘गतिमान विकास’ हवा की ‘स्थगिती देणारे सरकार’?

The ‘speedbreaker’ alliance will once again cast a permanent ‘eclipse’ over Mumbai’s development!

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment