Trending News

No trending news found.

Thursday, 14 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची सेना नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत कंबर कसून उतरल्या का नाहीत??

महाराष्ट्रातील नगरपंचायती, नगरपालिकांची निवडणूक शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी "सोडून" दिली.

नाशिक : महाराष्ट्रातील नगरपंचायती, नगरपालिकांची निवडणूक शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी “सोडून” दिली. महायुतीतल्या घटक पक्षांना “बाय” दिला याची चर्चा महाराष्ट्रातल्या मराठी माध्यमांनी केली. Sharad Pawar and Uddhav Thackeray

नगरपंचायती आणि नगरपालिकांच्या निवडणुकीच्या सुरुवातीला राहुल गांधींनी उपस्थित केलेला Vote Chori चा मुद्दा एवढा जोरदार चालला होता, की त्यांना शरद पवार आणि उद्धव ठाकरे या दोन्ही नेत्यांनी पाठिंबा देऊन बिहारप्रमाणेच महाराष्ट्रात मैदान मारण्याची तयारी चालवली होती. निदान तशी वातावरण निर्मिती केली होती. त्यातच ठाकरे बंधू एकत्र आल्याने त्यांची ताकद भरपूर फुगवून सांगितलीही होती.

त्यामुळे महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतल्या पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतले तिन्ही घटक पक्ष महायुतीतल्या घटक पक्षांसमोर आव्हान उभे करणार, असे चित्र निदान सुरुवातीला तरी निर्माण झाले होते.

– ठाकरे + पवारांना सक्षम उमेदवारच मिळेनात

पण बिहार निवडणुकीचा निकाल आला राहुल गांधींचा Vote chori चा मुद्दा डब्यात गेला. त्या पाठोपाठ स्थानिक पातळीवरची निवडणूक ही कार्यकर्त्यांची आहे त्यामुळे महाविकास आघाडी करण्यापेक्षा स्वतंत्रपणे निवडणूक लढविली पाहिजे असा विचार मांडणारे शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही नेते बरेच धास्तावले. महाराष्ट्रातले राजकीय वास्तव चित्र वेगळे आहे. आणि माध्यमांमधून वेगळे चित्र प्रस्तुत केले जात आहे याची पक्की जाणीव या दोन्ही नेत्यांना झाली. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्याकडे स्थानिक पातळीवरची निवडणूक लढवण्यासाठी सक्षम उमेदवार यायलाच तयार झाले नाहीत.



– स्वतःच्या खिशात हात घालायची नाही तयारी

पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा ओढा अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे गेला, तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील शिवसैनिकांचा ओढा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे गेला. कारण अजितदादा आणि एकनाथ शिंदे हे दोघेही उपमुख्यमंत्री असल्याने सत्तेचा सगळा force त्यांच्याकडे राहिला. त्या उलट शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस यांच्याकडे कुठला सत्तेचा फोर्स नसल्याने निवडणुकीच्या सगळ्या खर्चाचा भार सत्ताहीन पक्षांवर पडण्याची भीती निर्माण झाली. त्यामुळे निवडणूक लढवायची तर आपल्याला आपल्याच खिशात हात घालावा लागेल आणि निवडणूक खर्च चालवावा लागेल याची जाणीव पवार आणि ठाकरे यांना आणि त्यांच्या पक्षांच्या नेत्यांना झाली. पण स्वतःच्या खिशात हात घालून स्थानिक पातळीवरची कार्यकर्त्यांची निवडणूक लढविण्याची तयारी कुणाचीच नव्हती. म्हणून पवार आणि ठाकरे यांनी नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीतून लक्ष काढून घेतले. ज्यांना शक्य आहे, त्यांनी निवडणूक लढवावी. हवे तर पक्षाचे चिन्ह घ्यावे, नको तर वेगवेगळी शहर स्तरावरची पॅनल तयार करून वेगळ्या चिन्हांवर निवडणूक लढवावी, असा मध्यम मार्ग ठाकरे आणि पवारांनी आपापल्या नेत्यांना सांगून ते मोकळे झाले.

– पवारांनी अंग घेतले काढून

शरद पवारांच्या राजकीय आयुष्यातली ही कदाचित पहिली निवडणूक असेल जिच्या निवडणुकीच्या प्रचारात पवारांनी एकही सभा घेतली नाही किंवा निवडणुकीची रणनीती ठरविण्यात कुठला सहभाग नोंदविला नाही. त्यांनी एक दोन किरकोळ पत्रकार परिषदा घेऊन निवडणुकीत पैशाचा फार वापर होतोय, अशी तक्रार केली, पण त्या पलीकडे जाऊन त्यांचीच राष्ट्रवादी काँग्रेस नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत काय उतरली नाही या सवालाचे उत्तर देण्याच्या ते फंदात पडले नाहीत. खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा प्रचारातून पूर्ण अंग काढून घेतले आणि त्या युगेंद्र पवारांच्या लग्नात नाचल्या. Sharad Pawar and Uddhav Thackeray

उद्धव ठाकरे यांनी एखाद दोन पत्रकार परिषदा घेऊन मुंबई आणि ठाण्यापुरते आपले राजकीय अस्तित्व दाखवून दिले. राज ठाकरे आणि काँग्रेस हे बातम्यांमध्ये चर्चेत राहिले, पण प्रत्यक्ष जमिनीवर निवडणुकीच्या मैदानात ते कुठेही दिसले नाहीत. कारण स्वतःच्या खिशात हात घालून स्थानिक कार्यकर्त्यांच्या निवडणुका लढविण्याची त्यांचीही तयारी नव्हती. म्हणून भाजप सकट शिंदे आणि अजितदादांना मैदान मोकळे मिळाले. पवार आणि ठाकरे यांची स्वतःच्या खिशात हात घालण्याची तयारी नसल्यामुळे हे घडून आले.

Sharad Pawar and Uddhav Thackeray not ready to spend any money for local elections

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment