Trending News

No trending news found.

Saturday, 20 June
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
भारत माझा देश

अयोध्येत श्रीराम जन्मभूमी मंदिरावर धर्म ध्वज फडकला; त्यानंतर बाबरी मशिदीचा मुद्दा पुन्हा उकरून काढला!!

अयोध्येत श्रीराम जन्मभूमी मंदिरावर धर्म ध्वज फडकला; त्यानंतर बाबरी मशिदीचा मुद्दा पुन्हा उकरून काढला!!, हे वादग्रस्त राजकारण देशात घडले.

नाशिक : अयोध्येत श्रीराम जन्मभूमी मंदिरावर धर्म ध्वज फडकला; त्यानंतर बाबरी मशिदीचा मुद्दा पुन्हा उकरून काढला!!, हे वादग्रस्त राजकारण देशात घडले.Religious flag hoisted on Shri Ram Janmabhoomi temple in Ayodhya; After that, the issue of Babri Masjid was raised again!!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी अयोध्या श्रीराम जन्मभूमी मंदिरावर धर्म ध्वज फडकवला. त्याचा मोठा सोहळा झाला. जगभरातील कोट्यावधी नागरिकांनी तो पाहिला. हिंदू समाजाने पाहिलेले मोठे स्वप्न 500 वर्षांच्या संघर्षानंतर साकार झाले.

– मौलाना मेहमूद मदनींची चिथावणी

पण त्या पाठोपाठ मुस्लिम समाजातल्या काही घटकांनी मुद्दामून बाबरी मशिदीचा मुद्दा पुन्हा उकरून काढला. भोपाळ मध्ये जमीयत उलेमा ए हिंद संघटनेचे मोठे अधिवेशन झाले. त्या अधिवेशनात बोलताना मौलाना मेहमूद मदनी यांनी राम मंदिर बाबरी मशिदीच्या वादात सुप्रीम कोर्टाने दबावाखाली निर्णय दिला, असा आरोप केला जोपर्यंत मुसलमानांवर अन्याय होत राहील तोपर्यंत जिहाद होतच राहील, अशी दमबाजीची भाषा मौलाना मेहमूद मदनी यांनी वापरली. त्याचबरोबर त्यांनी वंदे मातरमला सुद्धा विरोध केला. देशाची राज्यघटना धर्मनिरपेक्ष असताना सुप्रीम कोर्टाने राम मंदिराचा निर्णय एकतर्फी दिला. तीन तलाक विरोधातला निर्णय सुद्धा असाच दबावापोटी दिला. सुप्रीम कोर्ट भाजपशी काही जुळवून घेते का, असा संशय तयार झाला. त्यामुळे आता कोर्टाला “सुप्रीम” म्हणून घेण्याचा अधिकार नाही, असे वक्तव्य मौलाना मेहमूद मदनी यांनी केले.



– बंगाली मंत्राचे समर्थन

पश्चिम बंगालचे मंत्री सादिकउल्ला चौधरी यांनी मौलाना मेहमूद मदनी यांच्या वक्तव्याचे समर्थन केले. राम मंदिर आणि बाबरी मशीद यांच्यातला वाढ धार्मिक नव्हता तो राजकीय स्वरूपाचाच होता. सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय आम्हाला म्हणजेच पश्चिम बंगाल मधल्या मुस्लिमांना मान्य नव्हता आणि नाही, असे चौधरी म्हणाले.

– political timing

त्या वक्तव्यांनंतर देशभरात त्याच्या प्रतिक्रिया उमटल्या. पश्चिम बंगाल, आसाम आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर दोन मुस्लिम नेत्यांनी मुद्दामून बाबरी मशिदी संदर्भातल्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा उल्लेख करत तो वाट पुन्हा उकरून काढला. यासाठी त्यांनी political timing सुद्धा असे निवडले की जेव्हा अयोध्येतल्या श्रीराम जन्मभूमी मंदिरावर धर्म ध्वज फडकला. त्यामुळे पुढील काही महिने राजकीय दृष्ट्या संवेदनशील असू शकतात, याची चुणूक दिसून आली.

Religious flag hoisted on Shri Ram Janmabhoomi temple in Ayodhya; After that, the issue of Babri Masjid was raised again!!

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment