Trending News

No trending news found.

Monday, 12 January
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
भारत माझा देश

ममतांकडे ३५ ते ४० लाख बनावट मतदार, काँग्रेसचा आरोप; पश्चिम बंगालमध्ये ५८ लाख मतदारांची नावे डिलीट!!

राहुल गांधींनी Vote Chori आणि मतदार यादी सुधारणा अर्थात SlR विरोधात कितीही आदळआपट केली, तरी Vote Chori चा मुद्दा भाजपच्या बाबतीत खरा नाही, तर तो इतर प्रादेशिक पक्षांच्याच बाबतीत खरा आहे. इतर प्रादेशिक पक्ष बनावट मतदार बनवून वाट चोरी करत आहेत, असा अप्रत्यक्ष आरोप काँग्रेसच्याच नेत्यांनी करून राहुल गांधींच्या आरोपांमधली हवा काढून टाकली

नाशिक : राहुल गांधींनी Vote Chori आणि मतदार यादी सुधारणा अर्थात SlR विरोधात कितीही आदळआपट केली, तरी Vote Chori चा मुद्दा भाजपच्या बाबतीत खरा नाही, तर तो इतर प्रादेशिक पक्षांच्याच बाबतीत खरा आहे. इतर प्रादेशिक पक्ष बनावट मतदार बनवून वाट चोरी करत आहेत, असा अप्रत्यक्ष आरोप काँग्रेसच्याच नेत्यांनी करून राहुल गांधींच्या आरोपांमधली हवा काढून टाकली. west bengal

यातला किस्सा पश्चिम बंगाल मधून समोर आला.

पश्चिम बंगाल मधले काँग्रेसचे महत्त्वाचे नेते, मुर्शिदाबादचे माजी खासदार आणि लोकसभेतले काँग्रेसचे माजी गट नेते अधीर रंजन चौधरी यांनी ममता बॅनर्जींच्या तृणमूळ काँग्रेसच्या Vote Chori ची भर पत्रकार परिषदेत पोलखोल केली.

ममता बॅनर्जी मतदार याद्यांमध्ये कशा फेरफार करतात, त्यांच्या तृणमूळ काँग्रेसचे नेते कुठे कुठे घुसतात आणि कशा पद्धतीने बनावट मतदारांची नावे वेगवेगळ्या मतदार याद्यांमध्ये घुसवतात, याचे तपशीलच अधीर रंजन चौधरी यांनी त्या पत्रकार परिषदेत जाहीर केले.

ममता बॅनर्जींनी प्रत्येक निवडणुका घोटाळा करूनच जिंकल्या. माझी माहिती तर अशी आहे की, ममता बॅनर्जी यांच्याकडे ३५ ते ४० लाख बनावट मतदार आहेत. लोकांना लुभावण्यासाठी जसे वेगवेगळे भंडारे चालतात, जसे की लक्ष्मी भंडार वगैरे तसेच ममता बॅनर्जी यांच्याकडे बनावट मतदारांचे भंडार आहे. त्यांच्या मतदानांमधूनच ममता बॅनर्जी निवडणुका जिंकत आल्यात, असा आरोप अधीर रंजन चौधरी यांनी केला.

– SIR ची आकडेवारी जाहीर

पण महत्त्वाचे म्हणजे याच दरम्यान निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल मध्ये केलेल्या मतदार यादी पुनरीक्षण अर्थात SIR मधून चार दोन हजार नाही तर तब्बल ५८ लाख मतदारांची नावे बनावट आढळली. त्यामुळे निवडणूक आयोगाने ती नावे डिलीट करून टाकली. निवडणूक आयोगाने ५८ लाख नावे डिलीट करून प्रारूप मतदार यादी जाहीर केली. त्यामध्ये भारतीय नागरिकत्वाचे सगळे निकष पूर्ण करून नवीन मतदार नोंदणीची सुद्धा तरतूद करून ठेवली.

– विदारक राजकीय वास्तव

त्यामुळे पश्चिम बंगालमधले एक विदारक राजकीय वास्तव सगळ्यांसमोर आले. एकाच वेळी अधीर रंजन चौधरी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने ममता बॅनर्जींच्या ३५ ते ४० लाख बनावट मतदारांची पोलखोल केली आणि त्याचवेळी निवडणूक आयोगाने तब्बल ५८ लाख मतदारांची नावे मतदार यादीतून डिलीट केली. याचा अर्थ पश्चिम बंगाल मध्ये बनावट मतदारांच्या आधारे ममता बॅनर्जी आणि तृणमूळ काँग्रेस यांनीच Vote Chori केली, पण राहुल गांधी मात्र भाजप आणि निवडणूक आयोगाच्या नावाने आगपाखड करत राहिले.

Why SIR was needed in west bengal??

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment