Trending News

No trending news found.

Saturday, 10 January
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

महाराष्ट्रात निवडणुका महापालिकांच्या; पण पवारांच्या पासून हिजाब पर्यंत पंतप्रधान पदाची चर्चा!!

महाराष्ट्रात निवडणुका महापालिकांच्या; पण पवारांच्या पासून हिजाब पर्यंत पंतप्रधान पदाची चर्चा!!, असलाच प्रकार महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुकांच्या प्रचाराच्या निमित्ताने समोर आलाय. महापालिकांच्या निवडणुकात वेगवेगळ्या मुद्द्यांवर प्रचार केला जातोय. त्यात स्थानिक मुद्द्यांपासून ते नेत्यांच्या भ्रष्टाचारापर्यंत सगळे विषय चघळले जात आहेत. त्यातच काही नेत्यांनी शरद पवारांच्या पासून ते हिजाबवाल्या महिलेच्या पंतप्रधान पदापर्यंतची चर्चा या निवडणुकीत पुढे आणली. त्यामुळे ही निवडणूक जास्तच रंगतदार झाली.

नाशिक : महाराष्ट्रात निवडणुका महापालिकांच्या; पण पवारांच्या पासून हिजाब पर्यंत पंतप्रधान पदाची चर्चा!!, असलाच प्रकार महाराष्ट्रातल्या महापालिका निवडणुकांच्या प्रचाराच्या निमित्ताने समोर आलाय.While targetting Ajit Pawar Owaisi claims Muslim woman prime minister

महापालिकांच्या निवडणुकात वेगवेगळ्या मुद्द्यांवर प्रचार केला जातोय. त्यात स्थानिक मुद्द्यांपासून ते नेत्यांच्या भ्रष्टाचारापर्यंत सगळे विषय चघळले जात आहेत. त्यातच काही नेत्यांनी शरद पवारांच्या पासून ते हिजाबवाल्या महिलेच्या पंतप्रधान पदापर्यंतची चर्चा या निवडणुकीत पुढे आणली. त्यामुळे ही निवडणूक जास्तच रंगतदार झाली.

– महेश लांडगे यांनी जखमेवर चोळले मीठ

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत अजित पवारांनी लक्ष केंद्रित करून भाजपचे आमदार महेश लांडगे यांना “टार्गेट” केले. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे जोरदार आरोप केले. या आरोपांना उत्तर देताना महेश लांडगे यांनी पिंपरी चिंचवडच्या स्वाभिमानाबरोबरच शरद पवारांच्या पंतप्रधान पदाचा मुद्दा काढून सगळ्या पवार खानदानाला डिवचले. जो पवारांचा परिवार शरद पवारांना पंतप्रधान करण्याचे स्वप्न बघत होता, तोच पवार परिवार आज पिंपरी चिंचवड मध्ये स्वतःचा महापौर बसविण्यासाठी गल्ली बोळात फिरतोय, असे शरसंधान महेश लांडगे यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून साधले. हे बरोबर नाही, अध्यक्ष महोदय!! असा टोमणाही महेश लांडगे यांनी हाणला. यातून त्यांनी पवार परिवाराच्या राजकीय जखमेवर मीठ चोळले.



– हिजाब वाली महिला पंतप्रधान

एकीकडे महेश लांडगे यांनी पवारांच्या पंतप्रधान पदाचा मुद्दा काढून पवार परिवाराच्या राजकीय जखमेवर मीठ चोळले, तर दुसरीकडे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी एक दिवस हिजाब घातलेली महिला भारताची पंतप्रधान होईल, असे वक्तव्य करून महापालिकांच्या निवडणुकीमध्ये राजकीय राळ उडवून दिली. सोलापूर मध्ये घेतलेल्या सभेत त्यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मत देणे म्हणजे भाजपलाच मत देण्यासारखे आहे. कारण अजित पवार मोदींच्या मांडीवर जाऊन बसलेत. मी मात्र संसदेत मोदींच्या विरोधात ठामपणे बोलत असतो. पाकिस्तानात एकाच धर्माचा राष्ट्राध्यक्ष होतो, पण बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला जे संविधान दिले, त्यामुळे इथे कुठल्याही धर्माचा राष्ट्राध्यक्ष होऊ शकतो. एक दिवस असा येईल, की हिजाब घातलेली महिला या देशाची पंतप्रधान होऊ शकेल. हिजाब घातलेली महिला भारताची पंतप्रधान होईलच, असा दावा असदुद्दीन ओवैसींनी केला.

– गदारोळात मोठी भर

मुंबईमध्ये हिजाब वाली महिला महापौर होईल, असे वक्तव्य त्यांचेच समर्थक आमदार वारीस पठाण यांनी केले होते. त्यावरून मोठा राजकीय गदारोळ झाला होता. पण तो कमी पडला म्हणून की काय असदुद्दीन ओवैसी यांनी हिजाब घातलेली महिला भारताची पंतप्रधान होईल, असे वक्तव्य करून त्या गदारोळात मोठी भर घातली.

While targetting Ajit Pawar Owaisi claims Muslim woman prime minister

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment