Trending News

No trending news found.

Thursday, 16 October
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
भारत माझा देश

Vice Presidential election : राहुल गांधी आणि विरोधकांचा मतचोरीच्या मुद्द्यावरून बाहेर बवाल; पण विरोधकांपुढे खासदारांचे संख्याबळ टिकवण्याचे खरे आव्हान!!

लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि विरोधकांनी मत चोरीच्या मुद्द्यावरून बाहेर मोठा बवाल चालवलाय; प्रत्यक्षात विरोधकांपुढे खासदारांचे सध्याचे संख्याबळच टिकवण्याचे खरे आव्हान आहे, हे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय सत्य समोर आले.

नाशिक : लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि विरोधकांनी मत चोरीच्या मुद्द्यावरून बाहेर मोठा बवाल चालवलाय; प्रत्यक्षात विरोधकांपुढे खासदारांचे सध्याचे संख्याबळच टिकवण्याचे खरे आव्हान आहे, हे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय सत्य समोर आले.Vice Presidential election: Rahul Gandhi and the opposition clash

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उद्या मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर सत्तारूढ NDA आघाडी आणि विरोधकांची INDI आघाडी यांनी आपापल्या खासदारांना मतदानाचे प्रशिक्षण दिले. सत्तारूढ एनडीए आघाडीने दोन दिवसांचे प्रशिक्षण शिबिर घेतले, तर INDI आघाडीने आज mock voting मग वोटिंग घेतले.



पण उद्याच्या मतदानात विरोधकांपुढे त्यांचे विद्यमान खासदार संख्याबळ टिकवून ठेवणे हे खरे आव्हान असेल. कारण राहुल गांधींनी आणि विरोधकांनी मतदान चोरीच्या मुद्द्यावरून बाहेर कितीही बवाल चालविला असला, तरी प्रत्यक्षात उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत cross voting ची भीती सत्ताधारी आघाडी पेक्षा विरोधी आघाडीला जास्त आहे. सत्ताधारी NDA आघाडीकडे 436 खासदारांचे बळ आहे, तर विरोधी INDI आघाडीकडे 324 खासदारांचे maximum बळ आहे. बिजू जनता दल आणि भारत राष्ट्र समिती या दोन पक्षांनी या निवडणुकीतल्या मतदानापासून दूर राहायचे ठरविले आहे. त्यामुळे त्यांच्या 11 खासदारांचा पाठिंबा दोन्ही उमेदवारांना गृहीत धरून चालणार नाही.

– राहुल गांधी मलेशियात

सत्ताधारी आघाडीचे संख्याबळ पाहता सी. पी. राधाकृष्णन यांचा विजय सोपा आहे. पण cross voting करून त्यांच्या विजयाचे अंतर कमी करण्याचा काँग्रेस आणि विरोधकांचा प्रयत्न आहे. पण या प्रयत्नांमध्ये आपल्याच खासदारांवर भरवसा ठेवण्याची विरोधकांची स्थिती उरलेली नाही. कारण उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत गुप्त मतदान होते. त्याचबरोबर कुठल्याही पक्षाला व्हिप जारी करायचा अधिकार नसतो. त्यामुळे cross voting झाले, तरी कुणाला तक्रार करता येत नाही. या पार्श्वभूमीवर वेगवेगळी कारणे देऊन वेगवेगळ्या पक्षांचे खासदार आपल्याला हवे तसे मतदान करू शकतात. सत्ताधारी NDA आघाडीने आखलेली छुपी रणनीती पाहता त्याला काटशह देणारी रणनीती विरोधी INDI आघाडीने आखणे अपेक्षित होते. पण विरोधी पक्षनेते राहुल गांधी बाहेर मतदान चोरीवर बबाल उभा करून मलेशियाला निघून गेले. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक सोडून देऊन त्यांना मोदी सरकार वेगळ्या मार्गाने पाडण्यात रस आहे. त्यामुळे राहुल गांधी मलेशियात बसून काही कारस्थान करत असल्याची बातमी आहे. उपराष्ट्रपती पदासाठी उद्या मतदान असले तरी ते अजून राजधानी नवी दिल्लीत परतल्याचे दिसलेले नाही. अशावेळी विरोधकांची रणनीती कोण आखणार आणि ती कोण अंमलात आणणार??, हा खरा सवाल आहे आणि त्याचे उत्तर सध्या तरी कुणाकडे नाही.

Vice Presidential election: Rahul Gandhi and the opposition clash over the issue of vote rigging; But the real challenge for the opposition is to maintain the number of MPs!!

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment