Trending News

No trending news found.

Thursday, 12 March
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

इस्लामला इतरांचे सहअस्तित्वच अमान्य; सहिष्णू समाजापुढे मुस्लिम प्रश्नाचे मोठे आव्हान!!

"सहिष्णू हिंदू समाजामध्ये इस्लामबद्दल कमालीचे अज्ञान आहे. कुराणातील आयतांचा अर्धवट संदर्भ देऊन केवळ सहिष्णूता दाखवण्याचा प्रयत्न केला जातो

 ज्येष्ठ अभ्यासक प्रा. शेषराव मोरे यांनी उलगडली मूलतत्त्ववादाची दाहकता Sheshrao More 

विशेष प्रतिनिधी

पुणे : “सहिष्णू हिंदू समाजामध्ये इस्लामबद्दल कमालीचे अज्ञान आहे. कुराणातील आयतांचा अर्धवट संदर्भ देऊन केवळ सहिष्णूता दाखवण्याचा प्रयत्न केला जातो; मात्र प्रत्यक्षात इस्लाममध्ये केवळ अल्लावरचीच श्रद्धा मान्य आहे, इतरांची नाही. त्यामुळे मूलभूत इस्लामचे सहिष्णू समाजासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे,” असे मत ज्येष्ठ अभ्यासक प्रा. शेषराव मोरे यांनी व्यक्त केले.

फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ॲम्फी थिएटर येथे आयोजित ‘मूलभूत इस्लामची शिकवण’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी राजेशिवराय प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश पवळे, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद रावत, कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा पुण्याचे माजी खासदार प्रदीप रावत आदी मान्यवर उपस्थित होते.



इस्लामची शक्ती वाढल्यानंतर काफिरांविरुद्ध जिहाद

कुराण समजून घेण्यासाठी प्रेषित पैगंबरांचे चरित्र वाचणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगून प्रा. शेषराव मोरे म्हणाले की, “प्रेषितांच्या चरित्रातून कुराणातील कोणती आयत कोणत्या प्रसंगात आली आहे, याचा बोध होतो. आज काही आयतांचा वापर ‘इस्लाम सहिष्णू आहे’ हे दाखवण्यासाठी केला जातो. मात्र, प्रत्यक्षात इस्लामला अल्लाशिवाय दुसरी कोणतीही श्रद्धा मान्य नाही. संपूर्ण जगाला इस्लामिक दृष्टिकोनातून श्रद्धावान करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. अल्लाला न मानणाऱ्यांना शिक्षा देण्याचा अधिकारही ते स्वतःकडेच घेतात. इस्लामची शक्ती वाढल्यानंतर ‘काफिरां’विरुद्ध जिहाद करणे तिथे अनिवार्य मानले जाते.”

असहिष्णु प्रवृत्तींशी संघर्ष अनिवार्य

अध्यक्षीय भाषणात प्रदीप रावत म्हणाले, “इस्लाम केवळ वेगळा पंथ किंवा पूजापद्धती नाही. त्यामुळे इस्लामच्या प्रश्नाकडे हिंदूंच्या सहिष्णू दृष्टिकोनातून पाहणे चुकीचे ठरते. मुस्लिमांकडे इस्लामच्या नजरेतूनच पाहायला हवे; कारण जगाच्या पाठीवर सहिष्णू समाजाचा असहिष्णू प्रवृत्तींशी संघर्ष अनिवार्य झाला आहे, तरच सहिष्णूता टिकेल. जोपर्यंत आपण आपला ‘सिव्हिलायझेशनल डीएनए’ (सांस्कृतिक वारसा) समजून घेत नाही, तोपर्यंत, हा प्रश्न आपल्याला उमजणार नाही.”

Veteran scholar Prof. Sheshrao More unraveled the searing intensity of fundamentalism.

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment