Trending News

No trending news found.

Tuesday, 10 March
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचे पुन्हा आमदार होणे शिंदेसेनेच्या हातात; मेपूर्वी विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक

विशेष प्रतिनिधी मुंबई : Uddhav Thackeray मे महिन्यापूर्वी विधान परिषदेतील ९ जागांसाठी निवडणूक होत आहे. विधानसभेतील आमदार त्यात मतदान करतील. काँग्रेस आणि शरद पवार गटही आपल्याला प्रत्येकी एक जागा मिळावी असा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे महायुती आणि मविआचे संख्याबळ लक्षात घेता महायुतीचे ७, मविआचे २ जण निवडून येऊ शकतात. मात्र, यात उद्धव ठाकरेंना बिनविरोधपणे आमदार व्हायचे असेल तर त्यांना शिंदेसेनेचा पाठिंबा लागेल.Uddhav Thackeray परंतु, शिंदेंनी दहावा उमेदवार दिला तर मविआमध्ये फाटाफूट होऊन उद्धव ठाकरे अडचणीत येऊ शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे. विधान परिषदेत उद्धव ठाकरे आवश्यक आहेत, असे खा. संजय राऊत म्हणताच या चर्चेला तोंड फुटले. शिंदेसेनेचे खासदार नरेश […]

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Uddhav Thackeray मे महिन्यापूर्वी विधान परिषदेतील ९ जागांसाठी निवडणूक होत आहे. विधानसभेतील आमदार त्यात मतदान करतील. काँग्रेस आणि शरद पवार गटही आपल्याला प्रत्येकी एक जागा मिळावी असा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे महायुती आणि मविआचे संख्याबळ लक्षात घेता महायुतीचे ७, मविआचे २ जण निवडून येऊ शकतात. मात्र, यात उद्धव ठाकरेंना बिनविरोधपणे आमदार व्हायचे असेल तर त्यांना शिंदेसेनेचा पाठिंबा लागेल.Uddhav Thackeray

परंतु, शिंदेंनी दहावा उमेदवार दिला तर मविआमध्ये फाटाफूट होऊन उद्धव ठाकरे अडचणीत येऊ शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे. विधान परिषदेत उद्धव ठाकरे आवश्यक आहेत, असे खा. संजय राऊत म्हणताच या चर्चेला तोंड फुटले. शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्के म्हणाले, उद्धव यांना पुन्हा आमदार व्हायचे असेल तर आदित्य किंवा राऊतांनी पाठिंब्यासाठी एकनाथ शिंदेंना कॉल करावा. ते दिलदार आहेत, नक्की विचार करतील.Uddhav Thackeray



त्यावर उद्धवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक म्हणाले, उद्धव ठाकरे वाकणार नाहीत. फोन करणार नाहीत. तर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी सांगितले की, उद्धव विधान परिषदेत येणार असतील तर आम्हाला आनंदच आहे. काँग्रेस, उद्धवसेनेचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येईल.

हिशेब चुकता करण्यासह मविआत फुटीची बीजे पेरण्याचे शिंदेंचे डावपेच

चार वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून उद्धव ठाकरेंनी त्यांना सातत्याने टार्गेट केले आहे. आता विधान परिषद निवडणुकीत उद्धव यांचा हिशेब चुकता करण्याचे डावपेच शिंदे आखत असल्याचे दिसत आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांचे खासदार म्हस्के यांनी वक्तव्य केले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे महायुती दुसऱ्या पसंतीच्या मतांवर सातऐवजी आठ उमेदवार निवडून आणू शकते, अशी आकडेमोड केली जात आहे.

या ९ जागा रिक्त होणार

उद्धव ठाकरे : मविआतीले चलबिचलमुळे प्रतिष्ठा पणाला.
डॉ. नीलम गोऱ्हे : उपसभापतीपदामुळे ही जागा तांत्रिकदृष्ट्या महत्त्वाची.
अमोल मिटकरी : स्वपक्षीयांशीच संघर्ष होऊ शकतो.
रणजीतसिंह मोहिते पाटील (सोलापूर), संदीप जोशी (नागपूर – राजीनामा दिला), दादाराव केचे (वर्धा) आणि संजय केनेकर (छत्रपती संभाजीनगर) या ४ जागा भाजप पुन्हा सहज निवडून आणेल. शशिकांत शिंदे (शरद पवार गट) व काँग्रेसचे राजेश राठोड यांच्यापैकी एकाविषयी प्रश्नचिन्ह.

Uddhav Thackeray’s MLC Renomination: Dependence on Shinde Sena Support VIDEOS

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment