Trending News

No trending news found.

Thursday, 16 October
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

उद्धव ठाकरे म्हणाले, दोघांचा उपमुख्यमंत्री पदाचा दर्जा काढा; पण त्यामुळे भाजपच्या अंगावर कुठे उठतोय ओरखडा??

उद्धव ठाकरे म्हणाले, दोघांचा उपमुख्यमंत्री पदाचा दर्जा काढा; पण त्यामुळे भाजपच्या अंगावर कुठे उठतोय ओरखडा??, असा सवाल विचारायची वेळ उद्धव ठाकरे यांच्या आजच्या वक्तव्यामुळे आली.

नाशिक : उद्धव ठाकरे म्हणाले, दोघांचा उपमुख्यमंत्री पदाचा दर्जा काढा; पण त्यामुळे भाजपच्या अंगावर कुठे उठतोय ओरखडा??, असा सवाल विचारायची वेळ उद्धव ठाकरे यांच्या आजच्या वक्तव्यामुळे आली.Uddav Thackrey targets Eknath Shinde and Ajit Pawar

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने त्यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजी नगर मध्ये हंबरडा मोर्चा काढला. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनी त्या मोर्चाला चांगला प्रतिसाद दिला. त्या मोर्चाच्या अखेरीस उद्धव ठाकरे यांचे जोरदार भाषण झाले. उद्धव ठाकरेंनी नेहमीप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला घेरले. उद्धव ठाकरे यांनी आमच्यावर टीका करण्यापूर्वी आरशात बघावे, असा टोमणा देवेंद्र फडणवीस यांनी हाणला होता. त्या टोल्याला उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले. मी आरशात बघतो, पण तुमचे सरकार आहे, तर तुमची जबाबदारी आहे, ती पार पाडा आणि अतिवृष्टीमुळे आपत्तीग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांकडे पाहा, असा प्रतिटोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजला त्यांनी मान्यता दिली, पण त्यासाठी त्यांनी काही अटी शर्ती पण लादल्या.



उद्धव ठाकरेंची अजब मागणी

फडणवीस सरकार विरुद्ध जोरदार भाषण ठोकताना उद्धव ठाकरेंनी आज एक अजब मागणी केली. राज्यामध्ये तुम्ही दोन असंविधानिक पदे नेमली, पण आम्हाला संविधानाने दिलेले विरोधी पक्ष नेतेपद देत नाही सबब तुम्ही तुमच्या सरकार मधली दोन असंविधानिक पदे हटवा. तुमच्या मंत्रिमंडळातल्या दोन उपमुख्यमंत्र्यांचा दर्जा काढून घ्या. त्यांना साधे मंत्री ठेवा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. राज्य विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेते पद द्यायला सरकार तयार नाही म्हणून उद्धव ठाकरे चिडले. महाराष्ट्रात पाशवी बळाचे आणि बहुमताचे सरकार आले असताना ते विरोधी पक्षांना घाबरते, असा टोमणा त्यांनी मारला.

शिंदे आणि अजितदादांना धक्का

पण एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा उपमुख्यमंत्री पदाचा दर्जा काढून घ्यावा अशी मागणी करून उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला घेरायचा प्रयत्न केला. पण प्रत्यक्षात तसे घेरणे त्यांना जमले का??, या सवालाचे उत्तर मात्र नकारार्थी आले. कारण एक तर स्वतः मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांना उपमुख्यमंत्री म्हणून नेमले होते पण त्यावेळी संख्याबळाच्या आधारे देवेंद्र फडणवीस यांना विरोधी पक्षनेते पद द्यावे लागले होते.

आज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे आणि त्यांच्या सहकारी पक्षांकडे पुरेसे संख्याबळच नसल्यामुळे म्हणजेच विधानसभेमध्ये 50 आमदार नसल्यामुळे त्यांच्या आघाडीला विरोधी पक्षनेतेपद देणे फडणवीस सरकारने टाळले. फडणवीस सरकारने मनात आणले तरच उद्धव ठाकरेंच्या पक्षाला विरोधी पक्षनेते पद मिळू शकेल. पण फडणवीस मनात आणत नाहीत म्हणून विरोधी पक्षनेते पद मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर उद्धव ठाकरेंनी दोन उपमुख्यमंत्र्यांना टार्गेट केले. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा उपमुख्यमंत्री पदाचा दर्जा काढून घ्यायची मागणी त्यांनी केली.

भाजपवर ओरखडाच नाही

पण यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप यांच्या अंगावर कुठलाही राजकीय ओरखडा उठला नाही. कारण एक तर देवेंद्र फडणवीस लगेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा दर्जा काढून घेण्याची शक्यता नाही. कारण सध्या तशी राजकीय परिस्थिती आणि गरजही नाही, पण अगदी उद्धव ठाकरेंच्या मागणीनुसार देवेंद्र फडणवीस यांनी म्हणजेच भाजपने उपमुख्यमंत्री पदाचा दर्जा काढून घ्यायचे ठरविले, तरी ती पदे भाजपच्या नेत्यांकडे नाहीत तर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे असल्याने जे काही नुकसान व्हायचे ते त्या दोन पक्षांचे होईल. त्यामध्ये भाजपचे काही नुकसान व्हायची शक्यता नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी दोन उपमुख्यमंत्र्यांचा दर्जा काढून घेण्याची मागणी करून फार तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला टार्गेट केले असे म्हणता येईल. त्यापलीकडे उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याला दुसरा कुठलाही राजकीय अर्थ लावता येण्याची सध्या तरी शक्यता नाही.

Uddav Thackrey targets Eknath Shinde and Ajit Pawar

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment