Trending News

No trending news found.

Tuesday, 9 June
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

बारामती बिनविरोध करण्यासाठी अख्खा पवार कुटुंबाची धडपड; भविष्यातल्या बेगमीसाठी काँग्रेस पुढे शरणागती!!

बारामती बिनविरोध करण्यासाठी अख्खा पवार कुटुंबाची धडपड आणि भविष्यातल्या बेगमीसाठी काँग्रेस पुढे शरणागती!!, ही राजकीय घडामोडी आज घडली.

नाशिक : बारामती बिनविरोध करण्यासाठी अख्खा पवार कुटुंबाची धडपड आणि भविष्यातल्या बेगमीसाठी काँग्रेस पुढे शरणागती!!, ही राजकीय घडामोडी आज घडली. Pawar family

बारामती विधानसभेची पोट निवडणूक बिनविरोध करण्यासाठी किंबहुना काँग्रेस पुन्हा बारामतीत उभीच राहता कामा नये, याकरिता पवार कुटुंबीयांची नवी धडपड आज समोर आली.

– सुनेत्रा पवारांचा सपकाळांना पुन्हा फोन

रोहित पवारांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली. त्यानंतर लगेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सुद्धा हर्षवर्धन सपकाळ यांना पुन्हा एकदा फोन केला. या दोन्ही नेत्यांच्या प्रयत्नांमध्ये वर उल्लेख केलेली भविष्यातल्या बेगमीसाठी काँग्रेस पुढे शरणागती!!, हीच राजकीय घडामोड आज घडलेली दिसली.

– रोहित पवारांची दिलगिरी

रोहित पवारांनी म्हणे पार्थ पवारच्या वतीने हर्षवर्धन सपकाळ यांच्यापाशी दिलगिरी व्यक्त केली. काँग्रेसने बारामतीत उमेदवार दिल्यामुळे काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू झाल्याचे वक्तव्य पार्थ पवारने केले होते. त्यानंतर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पार्थला राजकीय परिपक्वता विषयावरून बरेच जाहीर रित्या सुनावले. पण पार्थ पवारने आपल्या वक्तव्याविषयी दिलगिरी व्यक्त केली नाही. उलट अमोल मिटकरी हे सुद्धा पार्थ पवारच्या वक्तव्याच्या समर्थनासाठी बाहेर आले, तरीसुद्धा रोहित पवारांनी परस्परच पार्थ पवारच्या वतीने हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली.

– पवार कुटुंबीयांची काँग्रेसवर लाईन

पार्थ पवारच्या राजकीय परिपक्वतेच्या विषयावर वक्तव्य करून शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनी काँग्रेसवर लाईन मारून घेतली. कारण भविष्यात सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचे राजकीय बस्तान बसवायचे असेल, तर काँग्रेस शिवाय पर्याय नाही याची जाणीव शरद पवारांना झाली. आपल्या नंतर सुप्रिया सुळे किंवा रोहित पवार हे स्वतंत्रपणे राजकीय पक्ष चालवणे कठीण आहे. कारण त्यांची तेवढी क्षमता नाही. भाजप सुद्धा आपल्या स्वतःच्या अटींवर त्या दोघांना जवळ करण्याची शक्यता नाही हे शरद पवारांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी काँग्रेस पुढे वेगळ्या मार्गाने शरणागती पत्करायचा मार्ग पत्करला. त्यांनी काँग्रेस विषयी आणि त्या पक्षाच्या नेतृत्वाविषयी अनुकूल उद्गार काढले.



सुप्रिया सुळे यांनी तर त्यापुढे जाऊन “राजापेक्षा राजनिष्ठ” अशी भूमिका घेत काँग्रेसवर अफाट स्तुतिसुमने उधळली. तेवढी काँग्रेसच्या नेत्यांनी सुद्धा काँग्रेसवर उधळले नसती. देश आज स्वातंत्र्याचा मोकळा श्वास घेतोय तो काँग्रेस मुळेच!!, असे उद्गार सुप्रिया सुळे यांनी काढले.

– पवारांचे वर्चस्व टिकवण्यासाठी धडपडाट

त्यांच्या पाठोपाठ रोहित पवारांनी आज हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली. त्यांच्यापाशी दिलगिरी व्यक्त केली. सुनेत्रा पवारांनी सुद्धा हर्षवर्धन सपकाळ यांना पुन्हा फोन केला. बारामतीतून माघार घेण्याची विनंती केली. यातून पवार कुटुंबाचे वर्चस्व बारामती वर ठेवण्यासाठी केलेला धडपडाट तर समोर आलाच, पण पवारांवर जुन्या काँग्रेस कडेच आपल्यासाठी नवा राजकीय आश्रय शोधण्याची वेळ आल्याचे राजकीय वास्तव सुद्धा सगळ्या महाराष्ट्रासमोर उघड्यावर आले.

– दिल्लीची पाचर

पण एवढे सगळे होऊन सुद्धा हर्षवर्धन सपकाळ बधले नाहीत. बारामती पोटनिवडणूक काँग्रेसने लढवायचा निर्णय दिल्लीतून झालाय त्यामुळे इथून पुढचा निर्णय सुद्धा दिल्लीतूनच होईल, असे सांगून त्यांनी बारामतीच्या बिनविरोधात पाचर मारून ठेवली.

The entire Pawar family is striving to ensure Baramati is elected unopposed.

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment