Trending News

No trending news found.

Friday, 9 January
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
विशेष

पुण्यात दिसले बदललेले राजकीय रंग; पुणेरी पगडी घालून अजितदादा प्रचारात सामील!!

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातल्या 29 महापालिकांपैकी फक्त पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक लक्ष केंद्रित करून तिथेच प्रचाराचा धुरळा उडवला आहे.

नाशिक : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रातल्या 29 महापालिकांपैकी फक्त पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक लक्ष केंद्रित करून तिथेच प्रचाराचा धुरळा उडवला आहे. कारण तिथेच त्यांच्या राजकीय अस्तित्वाची लढाई आहे. ही अस्तित्वाची लढाई खेळत असताना त्यांनी पुणे शहरात आपल्या शक्ति केंद्रांमध्ये रोड शो केले. महत्त्वाचे म्हणजे अजितदादा हे पुणेरी पगडी घालून या रोड शो मध्ये सामील झाले. Ajit Pawar

– पवारांनी निर्माण केला होता वाद

ज्यावेळी शरद पवारांनी मुद्दामून पुणेरी पगडी म्हणजेच टिळक पगडी विरुद्ध महात्मा फुले पगडी, असा सामाजिक वाद निर्माण केला होता, त्यावेळी अजित पवार हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीतच होते. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस अखंड होती. पण पवारांनी वाद निर्माण केला, तेव्हा अजित पवारांनी शरद पवारांना विरोध केला नव्हता. शरद पवारांनी ज्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांमधून पुणेरी पगडी घालण्याऐवजी फक्त महात्मा फुले पगडी घाला, असे आदेश दिल्यानंतर शरद पवारांचे आणि बाकीच्या नेत्यांचे महात्मा फुले पगडी घालूनच सत्कार व्हायला लागले, अजित पवारांचा सुद्धा त्यांच्यातच समावेश होता.

– बदलले राजकीय रंग

पण आता भाजपच्या सत्तेच्या वळचणीला आल्यानंतर अजित पवारांनी आपले बदललेले राजकीय रंग दाखविले. ते पुण्यातल्या प्रचारात पुणेरी पगडी घालून सामील झाले. यावेळी त्यांच्यासमवेत रूपाली पाटील ठोंबरे आणि अन्य उमेदवार देखील होते. हा फोटो त्यांनी स्वतःहून आपल्या वेगवेगळ्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केला.



– अजितदादांची सोशल मीडिया पोस्ट

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीच्या माध्यमातून पक्षाला सर्वसामान्य नागरिकांचा मिळालेला भरघोस प्रतिसाद हा खरोखरच समाधान देणारा आहे. पुणे हे फक्त शहर नाही, तर राज्याच्या प्रगतीत भर घालणाऱ्या महत्त्वपूर्ण शहरांपैकी एक मुख्य शहर आहे. पुणे महानगरपालिकेत काम करणारी, सक्षमपणे निर्णय घेणारी आणि जबाबदारी स्वीकारणारी माणसं हवीत, असे त्यांनी सोशल मीडियावर नमूद केले.

यंदाची ही निवडणूक म्हणजे भाषणांची नाही, तर कामांची परीक्षा आहे. पाणी, रस्ते, आरोग्य, स्वच्छता, शिक्षण हे मुद्दे तुमच्या रोजच्या आयुष्याशी जोडलेले आहेत. यावर ठोस काम करण्याची ताकद राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे.

सामान्य पुणेकराचा आवाज महापालिकेत पोहोचवण्यासाठी, भविष्यातील पुणे अधिक सुरक्षित, अधिक स्वच्छ आणि अधिक सक्षम बनवण्यासाठी, तुमचा विश्वास आणि पाठिंबा आम्हाला हवा आहे. मी शब्दांपेक्षा कामावर विश्वास ठेवतो. पुण्याच्या विकासासाठी जे आवश्यक आहे, ते करण्याची जबाबदारी माझी आहे आणि ती मी पार पाडणारच, असेही त्यांनी सोशल मीडियावर लिहिले.

The changing political landscape was visible in Pune. : Ajit Pawar

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment