Trending News

No trending news found.

Thursday, 16 October
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

युती दोन ठाकरे बंधूंची; पण माध्यमांमध्ये लढाई रंगली जागावाटप फॉर्म्युलाची!!

युती दोन ठाकरे बंधूंची; पण माध्यमांमध्ये लढाई रंगली जागावाटपाच्या फॉर्मुल्याची!!, असे आज घटस्थापनेच्या म्हणजेच शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घडले. दोन ठाकरे बंधूंनी एकमेकांच्या अनेक भेटीगाठी घेतल्या

नाशिक : युती दोन ठाकरे बंधूंची; पण माध्यमांमध्ये लढाई रंगली जागावाटपाच्या फॉर्मुल्याची!!, असे आज घटस्थापनेच्या म्हणजेच शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घडले. दोन ठाकरे बंधूंनी एकमेकांच्या अनेक भेटीगाठी घेतल्या, तरी अद्याप अधिकृतरित्या राजकीय युती जाहीर केलेली नाही. तरी देखील माध्यमांनी घायकुतीला येत शिवसेना आणि मनसे यांच्यातल्या जागावाटप फॉर्मुलाची चर्चा घडवायला सुरुवात केली. मुंबई महापालिकेत शिवसेना आणि मनसे यांची परस्पर युती जाहीर करून माध्यमांनी 60 : 40 आणि 70 : 30 असे फॉर्म्युले जाहीरही करून टाकले, ज्याला दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी अजून तरी मान्यता दिलेली नाही. Thackrey brothers

महाराष्ट्रात घडलेल्या प्रचंड उलथापालथीनंतर राजकीय अपरिहार्यता लक्षात घेऊन दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले. कारण दोघांचेही पक्ष राजकीय दृष्ट्या गाळात गेले. उद्धव ठाकरेंचा भाजप द्वेष एवढा वाढला की त्यांनी शरद पवारांच्या नादी लागून भाजपशी कायमचा सवतासुभा मांडला. यात शरद पवारांच्या पक्षाचे काही नुकसान झाले नाही. त्यांनी घरामध्ये फूट पाडून पुतण्याला भाजपच्या सत्तेच्या वळचणीला धाडून दिले.

आपल्या अनुयायांची राजकीय सोय लावून घेतली. पण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे अपरिमित नुकसान केले. हे सगळे उघड राजकारण घडले तरी उद्धव ठाकरेंचे डोळे उघडले नाहीत. त्यांनी भाजपशी जुळवून घेण्याऐवजी राजकीय दृष्ट्या नगण्य असलेले आपले बंधू राज ठाकरे यांच्याशी जुळवून घेतले. दोघे एकमेकांकडे गणपतीच्या दर्शनाला गेले. उद्धव ठाकरेंनी तर दोनदा शिवतीर्थाची वारी केली. पण तरीदेखील दोन्ही ठाकरे बंधूंनी अधिकृतरित्या अजून युती जाहीर केलेली नाही.



– माध्यमांचे सूत्रे आणि परस्पर जागावाटप

पण दोन्ही ठाकरे बंधू वारंवार एकत्र आल्याचे पाहून माध्यमांना काही राहावले नाही. त्यांनी त्यांच्या सूत्रांच्या हवाल्याने दोन्ही ठाकरे बंधूंच्या पक्षांची परस्पर राजकीय युती जाहीर करून टाकली. ही युती झाली याची खात्री लोकांना व्हावी म्हणून शिवसेना आणि मनसे यांच्यातल्या जागा वाटपाचा फॉर्म्युला सुद्धा जाहीर केला. कुणी 60 : 40 तर कुणी 70 : 30 अशी आकडेवारी दिली. मुंबई महापालिकेच्या हे 147 जागा उद्धव ठाकरेंची शिवसेना लढेल तर 80 जागा राज ठाकरेंची मनसे लढेल, असे दावे मराठी माध्यमांनी केले. दादर, माटुंगा, सायन, परळ, शिवडी, विक्रोळी, दहिसर यापैकी ज्या भागांमध्ये दोन्ही पक्षांची ताकद समसमान आहे तिथे 50 – 50 % जागा वाटून घेतल्या जातील असेही माध्यमांनी परस्पर जाहीर केले. मात्र दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी अद्याप कुठल्याही फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब केलेले नाही. किंवा माध्यमांनी दिलेल्या आकड्याला पुष्टीही दिलेली नाही. पण नवरात्रीच्या पहिल्या दिवशी ठाकरे बंधूंच्या युतीची बातमी देऊन माध्यमांनी आधीच स्वतःची “राजकीय दिवाळी” साजरी केली.

Thackrey brothers yet to announce their alliance, but media pitch on formula

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment