
नाशिक : इंजिनात बसून मशालीने विरोधकांना जाळायची भाषा; पण ठाकरे बंधूंना आपल्या पक्षांमधली गळती रोखता येईना!!, अशी अवस्था मुंबईत झाली आहे. Thackrey brothers
ठाकरे बंधूंच्या ठाकरे बंधूंच्या शिवाजी पार्कच्या सभेचा टिझर सोशल मीडियावर जाहीर झाला. त्यामध्ये इंजिनात बसून मशालीने विरोधकांना जाळायची भाषा केली, पण प्रत्यक्षात याच ठाकरे बंधूंना आपल्या पक्षांमधली गळती काही रोखता आली नाही. राज ठाकरेंना त्यांचे निष्ठावंत संतोष धुरी यांना मनसेमध्ये टिकवून धरता आले नाही, तर संदीप देशपांडे यांच्या विषयीचा संशय दूर करता आला नाही. हे दोन्ही नेते राज ठाकरेंबरोबर कायम निष्ठेने राहिले. पण त्यांना राज ठाकरे आणि मोक्याच्या क्षणी बळ देऊ शकले नाहीत. संतोष धुरी यांनी भाजपची वाट धरली आणि संदीप देशपांडे हे नेहमीचा आक्रमकपणा सोडून ऐन मोक्याच्या क्षणी गप्प राहिले. पण या दोघांनाही राज ठाकरे नीट सांभाळू शकले नाहीत.
– दगडू सपकाळ शिंदे सेनेत
दुसरीकडे उद्धव ठाकरे यांना ज्येष्ठ शिवसैनिक आमदार दगडू सपकाळ यांचे मन राखता आले नाही. त्यांनी फक्त स्वतःच्या मुलीसाठी तिकीट मागितले होते पण तेही देता आले नाही. त्यामुळेच दगडू सपकाळ यांनी मनातली खंत बोलत अश्रू काढले ज्या शिवसैनिकांनी शिवसेनेसाठी रक्त सांडले, त्यांना उद्धव ठाकरेंनी तिकीटे दिली नाहीत. शरद पवारांनी शिवसेनेसाठी कधी रक्त सांडले नाही. पण त्यांच्या पक्षाला मुंबईत 11 जागा दिल्या, अशी खंत त्यांनी जाहीरपणे बोलून दाखविली. म्हणूनच त्यांनी आज एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला दादर शिवडी परिसर ढासळला.
– ठाकरे बंधूंच्या शाखा भेटी
ठाकरे बंधूंनी आपली सगळी शक्ती मुंबईत केंद्रित केली. पण ते प्रचाराची मोठी राळ उडवू शकले नाहीत. त्यांनी शिवसेना आणि मनसे यांच्या शाखांना भेटी दिल्या. पण त्याची वातावरण निर्मिती फक्त मराठी माध्यमांमध्ये झाली, त्या पलीकडे जाऊन ठाकरे बंधूंच्या ऐक्याचा किंवा या भेटीगाठींचा परिणाम पोहोचला, असे चित्र निर्माण होऊ शकले नाही. कारण एकीकडे ठाकरे बंधू माध्यमांना मुलाखती देत होते त्यानंतर शाखांना भेटी देत होते, पण त्याचवेळी रोज दोन्ही पक्षांमधून गळती सुरू राहिली होती. ती त्यांना रोखता आली नाही. यातून ठाकरे बंधूंच्या ऐक्याची वातावरण निर्मिती मर्यादित राहिली.
– आदित्य – अमित यांच्याकडे उत्तरे नाहीत
आदित्य आणि अमित ठाकरे यांनी सुद्धा फारच दुय्यम भूमिका घेत प्रचाराचे सगळे लक्ष फक्त मुंबईत केंद्रित केले पण जिथे उद्धव आणि राज ठाकरे यांच्या ऐक्याचा मर्यादित परिणाम राहिला तिथे आदित्य आणि अमित ठाकरे यांचा परिणाम होऊन होऊन होणार किती??, हा सवाल मात्र समोर आला. पण या सवालाला आदित्य आणि अमित हे दोन्ही ठाकरे बंधू चपखल प्रत्युत्तर देऊ शकले नाहीत.
– शिंदे – आंबेडकरांची पुढची पिढी मैदानात
एकीकडे एकनाथ शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांनी आपली पुढची पिढी महापालिका निवडणुकीच्या राजकारणात आणली. श्रीकांत शिंदे आणि सुजात आंबेडकर यांनी आपापली राजकीय कार्यक्षेत्रे सोडून महाराष्ट्रात इतरत्र सुद्धा जाहीर सभा घेतल्या त्याचा थोडाफार परिणाम त्यांच्या पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या उत्साहावर निश्चित झाला. जर एकनाथ शिंदे आणि प्रकाश आंबेडकर आपली पुढची पिढी महाराष्ट्रभर फिरवत असतील तर ठाकरे बंधूंना सुद्धा त्यांची पुढची पिढी महाराष्ट्रभर फिरवायला काही हरकत नव्हती पण त्यांनी तसे केले नाही त्यांनी आपल्याबरोबरच आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा मुंबईवरच लक्ष केंद्रित करायला सांगितले त्यामुळे ठाकरे मुंबई पुरतेच मर्यादित राहिले.
Thackrey brothers couldn’t keep their parties together
महत्वाच्या बातम्या
- महापालिका निवडणुकांमध्ये विरोधकांची हाराकिरी; पण भाजपवाल्यांना “सेल्फ गोल” करण्याची हौस लै भारी!!
- पुणेकरांना मोफत बस आणि मेट्रो प्रवासाची लालूच दाखवताना अजितदादांची “गेम”; महापालिकेला अधिकारच नसताना परस्पर दिले आश्वासन!!
- David Eby : भारत-कॅनडा संबंध सुधारल्याने खालिस्तान समर्थक चिडले; बीसी प्रीमियर डेवी एबी यांच्या दौऱ्यामुळे संतप्त
- Canada : कॅनडा सरकारचा पंजाबी लोकांना मोठा धक्का; ज्येष्ठांच्या पीआरवर 2028 पर्यंत बंदी; केअरगिव्हर कार्यक्रमही थांबवला



Post Your Comment