विशेष प्रतिनिधी
नाशिक : इराणने होर्मूजची खाडी बंद करून तुमचीच कोंडी केली आहे. तुम्ही विमानांचे इंधन अमेरिकेकडून घ्या, नाहीतर हिंमत असेल, तर होर्मूजची खाडी कब्जात घेऊन दाखवा, शब्दांमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाटो देशांना दमबाजी केली.Take fuel for aircraft from America, otherwise if you have the courage, capture the Strait of Hormuz; Donald Trump’s threat to NATO countries!!
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या ट्रूथ अकाउंट वर नाटो सदस्य देशांच्या राजकीय वर्तणुकीवर शरसंधान साधले. डेन्मार्क, फ्रान्स आणि ब्रिटन यांनी इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिकेला सहकार्य करायचे नाकारले. त्यामुळे ट्रम्प यांनी त्या देशांवर आगपाखड केली. या तिन्ही देशांनी अमेरिकेच्या विमानांना आपल्या हवाई हद्दीचा वापर करून इराणवर हल्ले करायला नकार दिला. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प चिडले.
US President Donald Trump posts on Truth Social, "All of those countries that can’t get jet fuel because of the Strait of Hormuz… I have a suggestion for you: Number 1, buy from the US, we have plenty, and Number 2, build up some delayed courage, go to the Strait, and just take… pic.twitter.com/uwzoNFhs8H
— ANI (@ANI) March 31, 2026
डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला सगळा राग ट्रूथ अकाउंट वर काढला. इराणने होर्मूजची खाडी बंद करून तुमचीच कोंडी केली आहे. त्याकडे विमानांना पुरेल एवढे इंधन नाही. तुम्ही अमेरिकेला सहकार्य केले नाही, तरीसुद्धा तुम्हाला विमानांचे इंधन हवे असेल तर अमेरिकेकडून घ्या. आमच्याकडे विमानांसाठी भरपूर इंधन आहे. नाहीतर तुमच्याच हिंमत असेल, तर होर्मूजच्या खाडीवर हल्ला करून तिच्यावर कब्जा करून दाखवा त्यासाठी तुम्हाला अमेरिका मदतीला येणार नाही हे लक्षात ठेवा, अशी दमबाजी डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ अकाउंट वरून केली. पण या दमबाजीचा काही परिणाम त्या देशांवर काही झाल्याचे दिसून आले नाही.
Take fuel for aircraft from America, otherwise if you have the courage, capture the Strait of Hormuz; Donald Trump’s threat to NATO countries!!
महत्वाच्या बातम्या
- ठाकरे ठेकेदारांना मराठी भाषेची ठेकेदारी दिली तरी कुणी??; वंचित बहुजन आघाडीचा बोचरा सवाल
- केरळात म्हणे भाजप B Team; पण नेमकी कुणाची??
- एकटे पवार मालक आणि बाकीचे बटाईदार!!; हेच का पवारांच्या 60 वर्षांच्या संसदीय कारकीर्दीचे लोकशाही संस्कार??
- उमेद संस्थेच्या सेवाकार्याला समाजाच्या संवेदनशीलतेची साथ हवी; भय्याजी जोशींची संस्थेला भेट



Post Your Comment