Trending News

No trending news found.

Thursday, 14 May
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

Supriya Sule : अजितदादांना मतदानातून श्रद्धांजली द्या; बारामतीत सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुप्रिया सुळेंचे भावनिक आवाहन

विशेष प्रतिनिधी बारामती : Supriya Sule  महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामती विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीतील उमेदवार व उपमुख्यमंत्री सुनेत्रवाहिनी यांच्या प्राचारार्थ असलेल्या सांगता सभेला राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित राहून उपस्थितांशी संवाद साधला. तसेच अजितदादांना मतदानातून श्रद्धांजली द्या, असे आवाहनही सुळे यांनी केले आहे.Supriya Sule यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, याठिकाणी येत असताना मी आशाकाकींची भेट घेतली. पण मी सांगता सभेला जात आहे हे त्यांना सांगण्याची हिंमत मला झाली नाही. मागील दोन अडीच महिने आपल्यासाठी खूप कठिण होते, असे सांगितले. आपण वहिनींच्या प्रचारासाठी येथे जमलेले आहोत‌. अजितदादा आज आपल्यात […]

विशेष प्रतिनिधी

बारामती : Supriya Sule  महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर बारामती विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीतील उमेदवार व उपमुख्यमंत्री सुनेत्रवाहिनी यांच्या प्राचारार्थ असलेल्या सांगता सभेला राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित राहून उपस्थितांशी संवाद साधला. तसेच अजितदादांना मतदानातून श्रद्धांजली द्या, असे आवाहनही सुळे यांनी केले आहे.Supriya Sule

यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, याठिकाणी येत असताना मी आशाकाकींची भेट घेतली. पण मी सांगता सभेला जात आहे हे त्यांना सांगण्याची हिंमत मला झाली नाही. मागील दोन अडीच महिने आपल्यासाठी खूप कठिण होते, असे सांगितले. आपण वहिनींच्या प्रचारासाठी येथे जमलेले आहोत‌. अजितदादा आज आपल्यात नाहीत यावर अजूनही विश्वास बसत नाही. घरातील एक कर्ता पुरुष, एक भाऊ आज आपल्यात नाही याचे दुःख कायम राहील असे सांगितले. तसेच महाविकास आघाडीतील नेते, प्रत्येक कार्यकर्ता, आणि बारामतीतील मतदार या निवडणुकीत वहिनींसोबत ताकतीने उभा राहील असा शब्द दिला.Supriya Sule



बारामती आणि पवार कुटुंबाचे एक वेगळे नाते

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, मागील सहा दशकापासून बारामती आणि पवार कुटुंबाचे एक वेगळे नाते राहिलेले आहे. बारामतीकरांचे प्रेम आणि विश्वासामुळे येथे एक मोठा विक्रम होणार आहे. ज्या आदरणीय पवार साहेबांना बारामतीने सहा दशके साथ दिली, तेथे या देशात सगळ्यात जास्तवेळा निवडणून येण्याचा मान हा बारामतीकरांना मिळणार आहे. ही परंपरा आपल्या आशीर्वादाने सुरू झाली असे नम्रतापूर्वक नमूद केले.

आदरणीय पवार साहेब येथे कार्यरत होते, त्यानंतर दादांवर येथील जबाबदारी आली. त्यांनी पूर्ण निष्ठेने ३५ वर्षे या भागाची सेवा केली आणि बारामतीची वेगळी ओळख निर्माण केली. अनेक आरोप प्रत्यारोप झाले, संघर्ष झाला पण बारामतीकरांनी कधीही साथ सोडली नाही, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

आता होणारे मतदान विक्रमी होईल

याच बारामतीकरांसमोर नतमस्तक होऊन महाविकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने या निवडणुकीत वहिनी विजयी होतील असा शब्द दिला. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी इच्छा होती. त्यामुळे आम्ही उमेदवार देणार नाही, अशी भूमिका घेतली होती. पण काही लोकांचे अर्ज राहिल्यामुळे ही निवडणूक होत आहे. पण आता होणारे मतदान विक्रमी होईल याबाबत माझ्या मनात कोणतीही शंका नाही, असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.

तसेच यावेळी मतदान यंत्रावरील एक नंबरवरील वहिनींचे नाव आणि घड्याळ चिन्हासमोरील बटण दाबून दादांना आदरांजली श्रद्धांजली द्या, आणि वहिनींना साथ द्या, असे आवाहनही सुप्रिया सुळे यांनी केले.

Baramati Bypoll: Supriya Sule Urges Voters to Pay Tribute to Ajit Dada via Ballots

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment