Trending News

No trending news found.

Thursday, 16 October
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

भाजप काँग्रेसमय झाल्याची सुप्रिया सुळेंना चिंता; पण वडिलांनी आयता हाती दिलेला पक्ष ताईंना वाढवता येई ना!!

भाजप काँग्रेसमय झाल्याची सुप्रिया सुळेंना चिंता; पण वडिलांनी आयता हाती दिलेला पक्ष ताईंना वाढवता येई ना!

नाशिक : भाजप काँग्रेसमय झाल्याची सुप्रिया सुळेंना चिंता; पण वडिलांनी आयता हाती दिलेला पक्ष ताईंना वाढवता येई ना!!, अशीच खासदार सुप्रिया सुळे यांची अवस्था झाली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आमदार संग्राम जगताप यांनी कट्टर हिंदुत्ववादी भूमिका घेतल्यानंतर अजित पवारांची गोची झाली आमदाराला काढता येईना आणि पक्षात ठेवता येईना अशी त्यांची अवस्था झाली. त्यामुळे त्यांनी थातूरमातूर नोटीस पाठवून संग्राम जगतापांना वेसण घालायचा प्रयत्न केला. मी मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे कर, असलाच हा प्रकार ठरला पण संग्राम जगताप अजितदादांच्या असल्या नोटिशीला घाबरले नाहीत. त्यांनी हिंदुत्ववादी भूमिका सोडली नाही.

त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांना अजित पवारांना राजकीय दृष्ट्या टोमणा मारायची संधी मिळाली संग्राम जगताप यांनी हिंदुत्ववादी भूमिका घेतली, तर नुसती नोटीस पाठवून भागणार नाही. त्यांची पक्षातून हाकालपट्टी करा. कारण ते समाजातील पसरवणारी वक्तव्य करीत आहेत. राज्यघटनेच्या विरोधात बोलत आहेत, असा दावा सुप्रिया सुळे यांनी केला. एकीकडे अजितदादा राष्ट्रवादी परिवारात मिलनाच्या निमित्ताने बेरजेचे राजकारण करत असताना दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनी त्यांना आमदाराची वजाबाकी करायला सांगितले.



– भाजप काँग्रेसमय झाल्याची खंत

पण त्याचवेळी सुप्रिया सुळे यांनी मोठे तत्त्वज्ञान सांगत असल्याचा आव आणत भाजप काँग्रेसमय झाल्याची खंत व्यक्त केली. विधानसभेत जाऊन जरा नजर टाका. सत्ताधारी भाजपमध्ये तुम्हाला बहुतेक काँग्रेसचे नेतेच आमदार झालेले दिसतील. जुना भाजप वेगळा होता. नवीन भाजप वेगळा आहे. नवीन भाजप पूर्ण काँग्रेसमय होऊन गेला आहे. तिथे निष्ठावंत कार्यकर्त्यांना आता संधी राहिलेली नाही. ज्यांनी सतरंज्या उचलल्या पक्षावर निष्ठा दाखविली त्यांना आता भाजपमध्ये किंमत राहिली नाही त्यांच्या ऐवजी काँग्रेसच्या नेत्यांना भाजपने संधी दिली, असा टोमणा सुप्रिया सुळे यांनी मारला.

– टोमणे मारण्यातच कारकीर्द सुरू

बाकी टोमणे मारण्यातच सुप्रिया सुळे यांच्या खासदारकीची चौथी टर्म पुढे चालू राहिली आहे. पण वडिलांनी आयता हातात दिलेला पक्ष त्यांना वाढविता येत नाही. शरद पवारांनी निवृत्तीची हूल देऊन अखंड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडू दिली. आपल्या ठिकठिकाणीच्या शिलेदारांना अजितदादांच्या बरोबर पाठवून भाजपच्या सत्तेच्या वळचणीला जाऊन बसू दिले. त्याचवेळी स्वतःची संघटना वेगळी ठेवून तिची सगळी सूत्रे सुप्रिया सुळे यांच्या हाती राहतील, याची सगळी “राजकीय नेपथ्य रचना” केली पण ही “नेपथ्य रचना” व्यर्थ ठरली. कारण सुप्रिया सुळे यांना शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पुढाकार घेऊन नेतृत्व देऊन वाढविताच आली नाही. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत आणि त्यानंतरही आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटवताच आला नाही. फक्त पत्रकार परिषदा घेणे किंवा सभांमध्ये दुय्यम भाषणे करणे यापलीकडे सुप्रिया सुळेंना राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक पातळीवर कुठली चमक दाखवता आली नाही. म्हणून तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 288 जागांच्या विधानसभेत फक्त 10 आमदार निवडून आणता आले. हे 85 वर्षांच्या शरद पवारांच्या अपयशाबरोबरच 56 वर्षांच्या खासदार सुप्रिया सुळे यांचेही तितकेच मोठे अपयश होते. 56 वर्षांच्या सुप्रिया सुळे यांना पुढाकार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसला स्वतःचे नेतृत्व देऊन अजून संघटना बांधणी करता आलेली नाही.

पण आज त्याच सुप्रिया सुळे यांनी आमदार संग्राम जगताप यांच्या हकालपट्टीची मागणी करून भाजप काँग्रेसमय झाल्याची खंत व्यक्त केली, पण त्याचवेळी त्या स्वतःचे तोकडे राजकीय कर्तृत्व विसरल्या.

Supriya Sule is worried that BJP has become Congress-like.

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment