Trending News

No trending news found.

Saturday, 7 March
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

जोपर्यंत सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाची पक्की बसत नाही मांड, तोपर्यंत विलीनीकरणाला कात्रजचा घाट!!

जोपर्यंत सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाची अख्खी बसत नाही मांड तोपर्यंत विलीनीकरणाला कात्रजचा घाट!!, हीच राजकीय वस्तुस्थिती सुनेत्रा पवारांच्या गेल्या काही दिवसांमधल्या राजकीय कृती आणि हालचालींमधून समोर आली.

नाशिक : जोपर्यंत सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाची अख्खी बसत नाही मांड तोपर्यंत विलीनीकरणाला कात्रजचा घाट!!, हीच राजकीय वस्तुस्थिती सुनेत्रा पवारांच्या गेल्या काही दिवसांमधल्या राजकीय कृती आणि हालचालींमधून समोर आली.

एकीकडे शरद पवारांच्या गटाने विलीनीकरणाचा धोशा लावला असताना दुसरीकडे अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांनी राजकीय मोर्चे संभाळून विलीनीकरण थोपवून धरले आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी ती बाजू उचलून धरली आहे. पण त्याच वेळी सुनेत्रा पवार स्वतः काहीच बोलायला तयार नाहीत, मात्र म्हणून त्यांनी कुठलीच राजकीय कृती करणे थांबविलेले नाही.

– रोहित पवारांच्या आक्षेपानंतरही नरेश अरोरांशी संपर्क

उलट रोहित पवारांनी आक्षेप घेतल्यानंतर सुद्धा सुनेत्रा पवार यांनी आपल्या दोन मुलांसह अजित पवारांचे राजकीय सल्लागार आणि डिझाईन बॉक्स कंपनीचे प्रमुख नरेश अरोरा आणि त्यांच्या टीमशी सल्लामसलत केली. त्यानंतर त्यांनी बारामतीत जाऊन जनता दरबार घेतला. अगदी अजित पवारांच्या स्टाईलने त्यांनी आपली कार्यशैली विकसित करायचा प्रयत्न चालविला. आपल्यात अजित पवार नाहीत आणि त्यांची जागा कोणीही भरून काढू शकत नाही हे वास्तव असले, तरी आपण काम थांबवता कामा नये, हाच राजकीय संदेश सुनेत्रा पवारांनी आपल्या राजकीय कृतीतून सगळ्यांना दिला. त्यामुळेच जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या सदस्यांपासून ते बारामतीतल्या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सगळ्यांचाच राबता सहयोग सोसायटी मध्ये राहिला. या सर्व राजकीय प्रयत्नांमधून सुनेत्रा पवार आपल्या नेतृत्वाची पक्की मांड बसवायचा प्रयत्न करताना दिसतात. यासाठी त्यांना राष्ट्रवादीतल्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांची सुद्धा साथ मिळताना दिसते, पण म्हणूनच शरद पवारांच्या राष्ट्रवादीतली अस्वस्थता त्या प्रमाणात वाढलेली दिसते.



– नेतृत्व प्रस्थापित करण्यावर भर

पण जोपर्यंत सुनेत्रा पवार यांची नेतृत्वाची मांड पक्की बसवली जात नाही, तोपर्यंत राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा विषय सुद्धा त्या काढणार नसल्याची शक्यता आहे. कारण आपल्या नेतृत्वाची मांड पक्की बसविल्याखेरीज, जर त्यांनी विलीनीकरणाचा विषय काढला, तर शरद पवारांच्या गटातल्या नेत्यांना संपूर्ण पक्षावर कब्जा करायची आयती संधी मिळेल आणि तेच टप्प्याटप्प्याने आपल्या नेतृत्वाला सुरुंग लावू शकतील, याची जाणीव एकतर सुनेत्रा पवारांना स्वतःलाच आहे किंवा नरेश अरोरांनी त्यांना ती करून दिली आहे, म्हणूनच विलीनीकरणावर कुठलीच जाहीर प्रतिक्रिया न व्यक्त करता सुनेत्रा पवारांनी फक्त आपला राजकीय कृतीचा भर स्वतःचे नेतृत्व प्रस्थापित करण्यावर ठेवला आहे.

– दुहेरी नेतृत्व

पुढच्या 15 दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष निवडून म्हणजेच स्वतः त्यावर बसून किंवा पार्थ पवारला त्यावर नेमून सुनेत्रा पवार पुढची वाटचाल करणार आहेत. एकीकडे उपमुख्यमंत्री पद आणि दुसरीकडे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद असे दुहेरी नेतृत्व प्रस्थापित झाल्यानंतरच त्या कदाचित विलीनीकरणाचा विषय पुढे सरकवतील तोपर्यंत शरद पवारांच्या गटाने कितीही आदळ आपट केली तरी सुनेत्रा पवार त्या आदळ आपट करण्याला फारशी किंमत देण्याची शक्यता नाही. कारण त्यांना तसे करणे राजकीय दृष्ट्या परवडणार नाही.

सतीश मगर भेटून गेल्यानंतर रोहित पवारांच्या वर्तणुकीत फरक पडेल??

पण याच राजकीय घडामोडी दरम्यान रोहित पवारांचे सासरे सतीश मगर हे सुद्धा सुनेत्रा पवारांना भेटून गेले. त्यामुळे इथून पुढे रोहित पवारांच्या बोलण्यात काही राजकीय प्रगल्भता येते का??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Sunetra Pawar will not allow merger of NCPs until her leadership established

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment