Trending News

No trending news found.

Saturday, 7 March
Best Business , News Magazine

Banner Ad

760 x 90
आपला महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवारांची निवड; त्यांच्यासमोरच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंचे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांवर शरसंधान!!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी आज सुनिता पवारांची निवड झाली. त्यांच्यासमोरच कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांवर जोरदार शरसंधान साधले.

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी आज सुनिता पवारांची निवड झाली. त्यांच्यासमोरच कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांवर जोरदार शरसंधान साधले. अजितदादांच्या अकाली एक्झिट नंतर 28 दिवसांनी हे घडले. Sunetra Pawar

अजितदादांच्या अकाली एक्झिट नंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या नेत्यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाचा विषय लावून धरला होता. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस विलीन झाल्या की भाजपच्या सत्तेचा लाभ शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांना मिळेल, असा त्यांचा होरा होता. परंतु तो होरा खरा ठरू शकला नाही.

याच दरम्यानच्या काळात सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन आपले काम सुरू केले. अजित पवारांचा राजकीय वारसा स्वतःच्या खांद्यावर पेलला. पार्थ पवार यालाही राजकीय दृष्ट्या प्रस्थापित करण्यासाठी पावले उचलली त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांचे पापड मोडले.



– रोहित पवारांची आदळापट

रोहित पवारांनी अजित पवारांच्या अपघाताचा मुद्दा घातपात म्हणून लावून धरला त्यांनी मुंबई पासून बारामती पर्यंत पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांशी वाद घातला. घातपात आणि गुन्हेगारी दृष्टिकोनातूनच अजित पवारांच्या अपघाताचा तपास व्हावा असा हट्ट केला. त्याआधी दिल्ली आणि मुंबईत पत्रकार परिषदा घेऊन रोहित पवारांनी राहुल गांधींच्या स्टाईलने प्रेझेंटेशन देखील केले.

– विलीनीकरण टळलेच

पण या सगळ्याचा काहीही उपयोग झाला नाही. दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण झाले नाही. त्या उलट रोहित पवारांनी आज जेव्हा बारामतीतल्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांशी वाद घातला, त्याच दिवशी सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी निवड झाली. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईतल्या वरळी डोममध्ये पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन घेतले. तिथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली त्यानंतर अधिवेशन झाले या अधिवेशनातच प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा पवारांचे नाव अध्यक्षपदासाठी सुचवले त्याला सगळ्यांनी हात वर करून मान्यता दिली आणि सुनेत्रा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी एकमताने निवड केली.

यावेळी केलेल्या भाषणांमधून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांवर जोरदार शरसंधान साधले. शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या नेत्यांनी सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांना वगळून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील आदी नेत्यांवर दात धरला होता. पवार कुटुंबीयातल्या नेत्यांवर प्रहार करण्यापेक्षा त्यांनी बाकीच्याच नेत्यांवर प्रहार केले होते. या मुद्द्यावरून सुनेत्रा पवारांनी अद्याप पर्यंत कुठलेही भाष्य केले नव्हते, किंबहुना त्या राजकारणाविषयी काही जाहीरपणे बोलल्याच नव्हत्या. त्यांनी मंत्रालयातले काम केले जनता दरबार घेतले, पण राजकारणाविषयी कुठले भाष्य करणे त्यांनी आत्तापर्यंत टाळले होते.

– सुनेत्रा पवारांसमोरच पवारांच्या नेत्यांवर प्रहार

प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी आज सुनेत्रा पवार यांच्या समोरच सगळ्या प्रहारांचा वाचपा काढला. समोरच्यांबद्दल आम्ही काही बोलणार नाही पण आमच्याकडे उत्तरे द्यायला खूप काही आहे. तुम्ही तुमचे बोलणे थांबवा नाहीतर आम्ही सुद्धा उत्तरे द्यायला कमी पडणार नाही, असा इशारा या दोन्ही नेत्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना दिला. सुनेत्रा पवार यांच्या समोरच राष्ट्रवादी काँग्रेसच्या या दोन वरिष्ठ नेत्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर प्रतिप्रहार केल्याने त्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

Sunetra Pawar elected as National President of NCP

महत्वाच्या बातम्या

Latest News

Stay Connected With Us

Post Your Comment